न्हावेलीसाठी स्वतंत्र वायरमन नसल्याने गैरसोय
न्हावेलीसाठी स्वतंत्र वायरमन नसल्याने गैरसोय
सावंतवाडी ( सुखदेव राऊळ)
गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या स्थितीत गावा-गावात विजेचा खेळखंडोबा सुरु आहे. वाहिन्यांना चिकटणारी झाडी झुडपे त्रासदायक ठरत आहेत.यामुळे वेळी अवळी वीज गायब होत आहे.वीजेच्या या समस्या संदर्भात विचारणा केली असता वायरमन (वीज जोडणी धारक) कडून उध्दट उत्तरे मिळत असल्याने न्हावेली येथील ग्रामस्थांकड होत आहे,
या मागणी अंतर्गत न्हावेली गावासाठी स्वतंत्र वायरमनची नियुक्ती करावी,अशी मागणी ग्रामस्थानी केली आहे.गावातील विजेसंदर्भात तक्रारीसाठी ठेवण्यात आलेले तक्रार बुक 2017 पासून वायरमनने पाहिलेले सुध्दा नसल्याची किंवा तक्रार निवारण केल्याचा कोणताही उल्लेख नाही असे येथील ग्रामस्थांकडून या नोंद वहीत नमूद करण्यात आले आहे.या नोंद वहीत,वीज वाहिन्यांना लागणारी झुडपे प्रशासनाने सफाई न केल्यामुळेच हा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याची नोंद या वहीत आहे.याचा परिणाम नळपाणी योजनेवर होत असून पावसळ्यात पाण्यासाठी महिलांना भटकावे लागत आहे. उन्हाळ्यात वाहिन्यांना लागणारी झाडी झुडपे न तोडल्यामुळे वीजपुरवठा खंडित होत आहे. वीजबिल वेळेवर भरुनही अखंडित वीजपुरवठा होत नसल्याने आम्हांला लोकशाहिचा मार्ग पत्करावा लागणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.अन्यथा तीव्र आंदोलन उभे करावे लागेल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.