भोसले इंटरनॅशनल स्कूल च्या मुलांचा राज्याबाहेरही डंका
भोसले इंटरनॅशनल स्कूल च्या मुलांचा राज्याबाहेरही डंका
दहाविच्या पहिल्याच बॅच चे श़भर नंबरी यश
भोसले इंटरनॅशनल स्कूल सी, बी, एस, ई, ची मुले प्रत्येक परिक्षेत दाखवितात चमकदार कामगिरी
संस्थापक अध्यक्ष अच्यूत सावंत भोसले,व शाळेच्या शिक्षकांचे,व्यवस्थापनाचे योगदान आले फळास
सावंतवाडी
इवलेसे रोप लावियेले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या संत तुकाराम महाराजांच्या अभंग ओवी प्रमाणे सावंतवाडी तालुक्यातील, सावंतवाडी शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चराठे वझरवाडी येथील माळरानावर अच्युत भोसले नावाच्या ध्येय्यवेढ्या माणसाने
शिक्षणाचे नंदनवन फुलवले अब्जाधीश लोकांना जमणार नाही अशा प्रकारच्या अफाट कल्पना शक्ती च्या जोरावर सर्व सोयी उपलब्ध असलेले शैक्षणिक दालन खुले केले. या ठिकाणी सुरुवातीला पॉलीटेक्निक कॉलेज त्या मध्ये मॅकॅनीक, सिव्हिल, इलेक्ट्रीकल,साॅफ्टवेअर इंजिनिअरींग व डि फार्म ,बी फार्म हे आयुष्याला कलाटणी देऊन हाताला रोजगार देणारे कोर्स सुरू केले.एवढ्यावर न थांबता २०१६ साली नव्या पिढीला आधुनिक व भविष्यात उपयोगी पडेल असे शिक्षण मिळावे म्हणून सी,बी,एस,ई ,स्कूल सुरु केले,या साठी नागपूर येथून अर्चना जोशी पाटील या सी बी एस ई स्कूल मध्ये प्राचार्य असलेल्या या भोसले इंटरनॅशनल स्कूल मध्ये प्राचार्य म्हणून दाखल झाल्या व सुरवातीच्या काळात प्रचंड मेहनत घेऊन या संकुलात भक्कम पाया उभा केला,
सुरुवातीला पाचवीच्या वर्गामध्ये फक्त पंधरा मुले होती, ती दहावी पर्यंत तीस मुले झालीत व या स्कूलने असा काय आकार घेतला की मागे वळून पाहवे लागले नाही, आज या स्कूलला सहा वर्ष पूर्ण झालीत प्रत्येक वर्गात विद्यार्थी संख्या झपाट्याने वाढत आहे ,कारन स्पर्धात्मक युगात टीकायचे असेल तर सी बी एस ई शिक्षणा शिवाय तरणोपाय नाही हे पालक वर्ग ही समजून चुकले आहेत,
या वर्षी पहिल्याच दहावीचा निकाल शंभर टक्के लागला, या दहावीच्या निकालामध्ये शाळेने पहिल्याच फेरीत 100 नंबरी यश मिळविले, या शाळेतील चार मुलांनी 90% च्या वर गुण मिळवून भोसले इंटरनॅशनल स्कूल कुठे मागे नाही हे दाखवून दिले
चराटा वजरवाडी सारख्या ग्रामीण भागात अशा प्रकारचे सीबीएसई इंटरनॅशनल स्कूल चालेल काय असा सर्वानाच प्रश्न पडला होता, मात्र या स्कूलचे मॅनेजमेंट सांभाळणाऱ्या अर्चना जोशी पाटील व त्यांना त्यावेळी भक्कम साथ देणाऱ्या सर्व शिक्षक वर्ग व सर्वात महत्त्वाचा दुवा असणारे संस्था अध्यक्ष अच्युत भोसले यांनी अतिशय मेहनत घेऊन ही शाळा नावा रुपाला आणली, या शाळेचा यावर्षी ही पहिलीच दहावीची बॅच व दहावीच्या वर्गामध्ये जवळपास 30 मुले त्यात जवळपास दोन वर्ष कोरोनाचा काळ, मुलांचा ऑनलाईन अभ्यास, नंतर पुढचे सहा महिने ऑफलाईन यामध्ये खरी कसरत होती ती विद्यार्थी व शिक्षकांची मात्र शिक्षक व विद्यार्थी या कसोटीत उतरले शिक्षकांची चिकाटी विद्यार्थ्यांची मेहनत व शाळेचे मुख्याध्यापक बक्षी सर यांचे महत्त्व पूर्ण योगदान या सर्वांच्या जोरावर मुलांनी शंभर नंबरी यश मिळविले, फक्त यश मिळवले नाही तर या भोसले इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकणारी सर्व मुले अर्थातच जी दहावी पास होऊन इतर ठिकाणी या गेली आहेत त्यांचा मागोवा घेतला तर ते कुठेही कमी पडले नाहीत.
अनेक ठिकाणी स्पर्धात्मक परीक्षेमध्ये या मुलांनी उज्वल यश संपादन केले, याचे एकमेव कारण म्हणजे या मुलांना पायाभूत शिक्षण दिले गेले, एनसीआरटी चा अभ्यासक्रम म्हणजे मुलांचे भवितव्य घडवणारा गुरु ,मुलांचे भविष्याचा वेध घेणारा गुरु, स्पर्धात्मक युगात कसे टिकायला पाहिजे हे शिकवणारे शिक्षण या शाळेमध्ये दिले गेले त्यामुळे ही शाळा व या शाळेतले मुले आज पुण्या, मुंबई, कोल्हापूर ,सातारा ,या सारख्या भागातील मोठ मोठ्या कॉलेजमध्ये स्पर्धात्मक परीक्षेमध्ये टिकू शकलीत हे सुर्य प्रकाशा एवढे सत्य आहे. माझामुलगा कुमार साईश याच्या अनेक बौद्धिक चाचण्या घेतल्या गेल्या या बौद्धिक चाचणीत त्यांनी दिलेली उत्तरे,सोडविलेले पेपर पाहून समोरचे परीक्षक हे अचंबित झाले अशा प्रकारचे शिक्षण सिंधुर्गात मिळते यावर त्यांचा विश्वास बसेना मलाही माझ्या मुलाला मी भोसले स्कूलमध्ये सी बी एस ई शिकण्यासाठी घातले याचा सर्वार्थाने अभिमान वाटला, व खरा अभिमान वाटला तो या सर्वांचे प्रणेते या सगळ्या गोष्टी घडून आणणारे या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अच्युत सावंत भोसले यांचा,साधी राहणी, उच्च विचारसरणी ,जिद्द ,मेहनत, चिकाटी, महत्त्वाकांक्षा, या गुणांच्या जोरावर त्यांनीही ही जी गरुड झेप घेतली आहे ,त्यामुळे आज चराठा वझरवाडी येथे हे शैक्षणिक नंदनवन फुलले गेले आहे.
या परिसराला भेट दिल्यावर या नॉलेज सिटी चा परिसर पाहून मनमोहन जाते, स्वच्छता, सुंदरता, या परिसरात ठासून भरलेली आहे, आणि कडक शिस्त हे या भोसले नॉलेज सिटी चे खरे वैशिष्ट्य आहे,या या नॉलेज सी टी च्या आवारात त्यांच्या वसतिगृहात राहणारी मुलं ही शिस्तबद्धच असणार व पालकांनी जो विश्वास दाखवून मुलांना त्यांचे भवितव्य घडविण्यासाठी भोसले नॉलेज सिटी मध्ये प्रवेश दिला तो विश्वास शंभर टक्के सार्थकी लावणार याची शंभर टक्के खात्री या परिसराला भेट दिल्यावर मिळेल. म्हणून पुन्हा एकदा या सर्वांचे प्रणेते संस्थापक अध्यक्ष अच्यूत सावंत भोसले सर्व शिक्षक, कर्मचारी,वर्ग यांचे मनापासून अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा.