कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा कुडाळच्या वतीने विद्यार्थी व शैक्षणिक सामाजिक व्यवसायिक कलाक्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार

*सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा कुडाळच्या वतीने विद्यार्थी व शैक्षणिक सामाजिक व्यवसायिक कलाक्षेत्रातील व्यक्तींचा सत्कार*

*प्रतिनिधी सुनील आचरेकर*

*सिंधुदुर्ग*

सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज उन्नती मंडळ शाखा-कुडाळच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थी तसेच शैक्षणिक,
सामाजिक व्यावसायिक,कला क्षेत्रात व कोव्हीड काळात सेवा करून नावलौकिक केलेल्या ५५ समाज बांधवांचा सत्कार सोहळा तुळसुली तेलीवाडी जिल्हा परिषद शाळेच्या व्यासपीठावर पार पडला या वेळी सिंधुदुर्ग जिल्हा तेली समाज अध्यक्ष लक्ष्मण तेली,उपाध्यक्ष निलेश कामतेकर ,खजिनदार .चंद्रकांत तेली कुडाळ तालुका अध्यक्ष दिलीप तिवरेकर,सचिव .अमित धामापुरकर, कार्यकारिणी सदस्य .शैलेश डिचोलकर,.शेर्लेकर,माजी पंचायत समिती सदस्य सौ.सुप्रिया वालावलकर, तुळसली सरपंच सौ.सुचिता तुळसुलकर,उपसरपंच .विजय वारंग,साईनाथ आंबेरकर,सौ.लक्ष्मी आरोंदेकर,.प्रशांत आजगावकर,सुहास आजगावकर, .धोंडी सातार्डेकर,सौ.साक्षी वेंगुर्लेकर व्यासपीठावर उपस्थित होते
कार्यक्रमाच्या प्रसंगी बोलताना सौ.सुप्रिया वालावलकर यांनी शासकीय योजनांन संदर्भात मार्गदर्शन करून समाज बांधवांच्या मागे खंबीर पणे उभे राहण्याचे आश्वासन दिले तर सिंधुदुर्ग तेली समाज उन्नती मंडळाचे खजिनदार श्री.चंद्रकांत तेली यांनी गेल्या ३० वर्षाचा लेखाजोगा मांडला व पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात तेली समाज संपर्क अभियान राबविण्यात येणार आहे असे हि सुचित केले.
जर्मनी येथे भारताविरुद्ध मोर्चा निघाला होता त्या वेळी भारताच्या विरोधात घोषणा देत असता .प्रशांत वेंगुर्लेकर यांनी प्रत्युत्तर म्हणून आपल्या मायभुमीच्या समर्थनार्थ प्रती ( बाप बाप होता है..बेटा बेटा होता है..) घोषणा दिल्या अश्या भारत देशाच्या तेली समाजातील वाघाच्या मातोश्री सौ.शुभांगी वेंगुर्लेकर यांचा विषेश सत्कार करण्यात आला.
गुणगौरव कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी .दिगंबरआजगावकर,
.गणपत वेंगुर्लेकर,.गोपाळ वेंगुर्लेकर,.विलास वेंगुर्लेकर,गीतेश आजगावकर, योगेश इब्रामपुरकर,समीर आजगावकर,प्रवीण वेंगुर्लेकर, सचिन इब्रामपूरकर, सुनील वेंगुर्लेकर,निवास सतार्डेकर, सिद्धेश आजगावकर, आल्हाद वेंगुर्लेकर, सूचित वेंगुर्लेकर व कुडाळ तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहुन सहकार्य व मार्गदर्शन केले..
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव अमित धामापुरकर यांनी केले तर आभार खजिनदार . प्रशांत आजगावकर यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!