सिंधुदुर्गातील “पारंपरिक दशावतार नाट्य स्पर्धा २०२२” या कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री मा.श्री. नारायणराव राणे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेवून देण्यात आले निमंत्रण ; राजन रेडकर
🟥 सिंधुदुर्गातील “पारंपरिक दशावतार नाट्य स्पर्धा २०२२” या कार्यक्रमाचे केंद्रीय मंत्री मा.श्री. नारायणराव राणे यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेवून देण्यात आले निमंत्रण ; राजन रेडकर
_*🎥 Kokan Live Braking News*_
*✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सिंधुदुर्ग, दि-१६ :- पंचतत्व ग्लोबल मीडिया एलएलपी (नियोजित) व अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ (रजि) यांच्या संयुक्त विद्यमाने वेंगुर्ला तालुक्यातील आरवली येथील साळगांवकर मंगल कार्यालय येथे नटसम्राट कै. मच्छीन्द्र कांबळी व दशावतारी नटसम्राट लोकराजा कै. सुधीर कलिंगण या दिग्गज कलाकारांना “भावपूर्ण श्रद्धांजली” अर्पित करून, कोकणातील दशावतार या लोककलेचा प्राधान्याने विकास व्हावा व उदयोन्मुख दशावतार कलावंतांना या लोककलेच्या माध्यमातून स्पर्धात्मक दृष्टीकोनातून आपला अभिनय रसिकांपर्यंत पोहोचवता यावा, त्याचप्रमाणे कलाकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ मिळावे या उदात्त हेतूने दिनांक ७ व ८ मे २०२२ रोजी “पारंपरिक दशावतार नाट्य स्पर्धा २०२२” या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या पारंपरिक दशावतार नाट्य स्पर्धेतील दशावतार कलावंतांना प्रोत्साहन द्यावे याकरिता केंद्रीय मंत्री मा.श्री. नारायणराव राणे यांची मुंबईतील निवासस्थानी आयोजन समिती कार्यकारी सदस्य राजन रेडकर व केतन चव्हाण यांनी भेट घेतली. भेटी दरम्यान केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी कार्यक्रमाचे निमंत्रण स्वीकारले असून कार्यक्रमास उपस्थित राहणार असल्याची माहिती दिली. तसेच माजी खासदार निलेश राणे व आमदार नितेश राणे यांनाही या सांस्कृतिक पारंपरिक दशावतार नाट्य स्पर्धेचे निमंत्रण देण्यात आले आहे .
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

