🛑संजू परब यांचं अस्तित्व निलेश राणेंमुळेच; टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करा!” – साक्षी वंजारींचा घणाघात
*🛑संजू परब यांचं अस्तित्व निलेश राणेंमुळेच; टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करा!” – साक्षी वंजारींचा घणाघात*
*🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL*
*✍️ ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*🎴सावंतवाडी, दि- २६:-* शिंदे शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांच्यावर सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्षा साक्षी वंजारी यांनी जोरदार पलटवार केला आहे. “संजू परब यांचं राजकीय अस्तित्व हे पूर्णतः निलेश राणे यांच्या आशीर्वादावर उभं आहे. त्यांनी डोक्यावरून हात काढला तर परब यांचं अस्तित्व शून्य होईल,” असा घणाघात वंजारी यांनी केला.
वानजारी म्हणाल्या, “परब यांच्या टिकेला आम्ही फारसं महत्त्व देत नाही. मात्र त्यांना वास्तवाची जाणीव करून देणं आवश्यक आहे. दीपक केसरकर यांच्यावर यापूर्वी परब यांनीच खालच्या स्तरावर टीका केली होती. ‘आमचं टाकलेलं खरकटं आमदार उचलतील’ अशा वक्तव्यांची आठवण त्यांनी ठेवावी. आज विरोधकांवर टीका करताना त्यांनी स्वतःच्या भूमिकेचा विसर पडू नये.”
परब यांच्या राजकीय प्रवासावर सवाल उपस्थित करत वंजारी म्हणाल्या, “नगराध्यक्ष म्हणून ते कोणाच्या आशीर्वादाने निवडून आले, हे सर्वांना ठाऊक आहे. स्वतःचं कर्तृत्व काय? किती ‘मिठाई’ वाटून निवडणूक जिंकली, याचंही आत्मपरीक्षण त्यांनी करावं. मतं मिळणं म्हणजे सर्व काही नसतं; समाजकारण आणि नैतिकता यापलीकडे मोठी असते.”
काँग्रेसची परंपरा सांगताना त्यांनी विलासराव देशमुख यांचा दाखला देत म्हटलं, “आरोप झाल्यानंतर त्यांनी तत्काळ मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जाण्याची भूमिका घेतली होती. हीच काँग्रेसची संस्कृती आहे.”
दीपक केसरकर प्रकरणावर बोलताना वंजारी म्हणाल्या, “विधिमंडळाच्या शिस्त समितीचे अध्यक्ष म्हणून केसरकरांनी त्वरित राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जावं, ही अपेक्षा होती. आमची भूमिका वैयक्तिक नाही, तर नैतिकतेवर आधारित आहे.”
याशिवाय त्यांनी सावंतवाडी व वेंगुर्ला येथील स्थानिक निवडणुकांतील निकालांचा उल्लेख करत शिंदे शिवसेनेच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. “सावंतवाडी नगरपरिषदेत २० पैकी फक्त ७ नगरसेवक, वेंगुर्ल्यात शून्य नगरसेवक, जिल्हा परिषदेत अत्यल्प सदस्य – हेच परब यांचं ‘लेटेस्ट कर्तृत्व’ आहे,” असा टोला त्यांनी लगावला.
शेवटी वंजारी म्हणाल्या, “संजू परब यांनी टीका करण्यापूर्वी आत्मपरीक्षण करावं. सावंतवाडीकर आणि जनतेला सर्व काही ठाऊक आहे. त्यामुळे अशा टीकांना उत्तर देण्याची गरज आम्हाला वाटत नाही.”
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*
_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*
https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–
💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊
🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻♀️🤷🏻♀️🤷🏻♀️
🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞
श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️
🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०
👉👉आमची हमी 🤷🏻♀️
जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !
🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪
☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫
🌞१ किलोवॅट ३०,०००/-
🌞२ किलोवॅट ६०,०००/-
🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-
🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️
💫₹18,000/- प्रती किलोवॅट
💫कमास ५०० ₹90,00,000
☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞
🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !
🤷🏻♀️🤷🏻♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा
📱0888 999 8824
📱0777 592 1004
☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

