इंधन दरवाढ विरोधात रिक्षा संघटनेचे १ रोजी धरणे आंदोलन
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्गनगरी*
सीएनजी गॅस पेट्रोल डिझेल या इंधनाच्या दरात भरमसाठ दरवाढ विरोधात १ ऑगस्ट रोजी रिक्षा टॅक्सी बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज रवळनाथ मंदिर ओरोस येथे झालेले सिंधुदुर्ग जिल्हा रिक्षा चालक-मालक संघटनेच्या बैठकीत घेण्यात आला कशा प्रकारे पेट्रोल डिझेल उच्चांक गाठला आहे कधी नाही एवढे रिक्षा टॅक्सी चालक अडचणी झाली असून ते बेदर झाले आहेत महाराष्ट्र शासन व परिवहन प्रशासन याकडे सर्व रिक्षा टॅक्सी चालकांचे गेले अनेक वर्षंपासूनचे ज्वलंत प्रश्न न्याय मागणे भाडे दरवाढ प्रलंबित आहे. दरवेळी रिक्षा टॅक्सी चालक कष्टकरी यांच्या न्याय मागण्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे. अशी भावना तमाम कष्टकरी रिक्षा टॅक्सी बांधवांची झाली आहे त्या प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १ ऑगस्ट २०२२ रोजी रिक्षा टॅक्सी बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे याविषयी आज श्री रवळनाथ मंदिर ओरोस येथे चालक-मालक संघटनेची बैठक झाली त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्हा परिवहन कार्यालय सिंधुदुर्ग येथे त्यानंतर अधिकारी सचिन पालांडे यांच्याशी चर्चा करण्यात आली यावेळी जिल्हाध्यक्ष संजय शारब्रिदे सचिव सुधीर पराडकर खजिनदार राजन गाडी माजी अध्यक्ष मामा ओरोसकर उपाध्यक्ष नागेश ओरोसकर कोकण ऑटो रिक्षा चालक महासंघाचे कार्यअध्यक्ष संतोष नाईक आदी उपस्थित होते.