सिंधुदुर्गातील रस्त्यांची अतिशय गंभीर दुर्दशा
🛑 राज्य मार्गासह जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्गावर खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले.*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : सुनील आचरेकर*
🎴 सिंधुदुर्ग- महाराष्ट्रामध्ये कोकणात सर्वाधिक पाऊस पडतो मात्र रस्ते खराब होण्यास केवळ पाऊस कारणीभूत नाही तर अनेक रस्ते निकृष्ट कामामुळे खराब होतात . बऱ्याचदा निकष डावलून कामे उरकली जातात आणि नंतर हे रस्ते एक दोन वर्षात पुन्हा जैसे थे होतात अशी अनेक उदाहरणे सिंधुदुर्गात आहेत तसे पाहिले तर गेल्या पाच वर्षापासून सिंधुदुर्गात रस्ते दुरुस्तीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी प्राप्त झालेला नाही आणि परिणामी गेल्या दोन वर्षात झालेल्या अनेक कामांची बिले शासनाकडून अद्याप झालेली नाहीत .पावसाने आता परतीचा रस्ता धरला आहे मात्र अनेक रस्त्यांची दुर्दशा केली असून पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहेत सार्वजनिक बांधकाम विभाग या रस्त्याची दुरुस्ती कधी करणार? व खड्डे कधी भरणार? असा सवाल जनतेकडून केला जात आहे आधीच गेल्या दोन वर्षांपासून केलेल्या कामांची बिले थकीत आहेत त्यामुळे नवीन कामे करण्यास ठेकेदार तयार नाही यावर्षी जवळपास मध्येच काही दिवस सोडले तर जवळपास साडेचार ते पाच महिने पाऊस झाला त्यामुळे जिल्ह्यातील 65 ते 70 टक्के अधिक रस्तेवर खड्ड्यांमुळे खराब झाले आहेत स्थानिकांनी काही ठिकाणी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर ते खड्डे तूर्तास बुजवण्यात आले आहेत मात्र अनेक राज्यमार्ग ,प्रमुख जिल्हा मार्ग ,ग्रामीण मार्ग यांची स्थिती बिकट आहे रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता एवढी दुर्दशा रस्त्यांची झाली आहे. खड्ड्यांमुळे अपघात वाढले असून वाहनचालकांना कसरत करत वाहने चालवावी लागत आहेत आता पाऊस गेल्याने रस्त्यांवरील खड्डे दिसत आहेत. पावसाळ्यात तर पावसामुळे खड्डे भरलेले असल्याने वाहनचालकांचे मोठे हाल होत होते. गेली दोन वर्ष कोरोना संकटामुळे रस्त्याच्या दुरुस्तीला पुरेसा निधी मिळत नाही. असे बांधकाम विभागाकडून सांगितले जाते याचा फटका रस्त्यांना बसला आहे मात्र रस्त्यांची कामे दोन चार वर्षात झालेले रस्ते खड्डेमय झाले आहेत मुळात जे निकषानुसार रस्त्यांची कामे करायला हवीत या निकषानुसार ती कामे केली जात नाहीत .पूर्वी रस्त्याची कामे करणाऱ्या ठेकेदाराचा एक वेगळा वर्ग होता निकषानुसार बांधकाम यंत्रणा यांच्याकडून कामे करून घेत असे. आता बऱ्याच ठिकाणी मूळ ठेकेदार वेगळा आणि काम करणारा उपठेकेदार वेगळा असतो काम सुरू असताना खात्याचे सुपरवायझर अपवादात्मक दिसतात. यामुळे काम रेटून नेले जाते काही अपवाद वगळता अनेक रस्त्यांची कामे निकृष्ट होतात अगदी पाऊस पडला तरी कामे चालूच असतात मग अति पावसाचे कारण देऊन ठेकेदाराने संबंधित यंत्रणा मोकळी होते .त्यामुळे रस्त्याची दुर्दशा होत आहे गणेश चतुर्थीच्या आधी काही दिवस जांभ्या दगडांच्या फुटिने आणि ग्रिट ने खड्डे बुजवले जातात मात्र अति पावसात ते टिकत नाही यामध्ये डबकी तयार होऊन मोठे खड्डे तयार होतात आणि अपघात होतात मुळात ते खड्डे पावसाळी डांबरीकरणाने बुजविण्याची आवश्यकता आहे खरे तर जे ठेकेदारी कामे करतात त्यांच्यावर काही वर्ष या रस्त्यांची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी असते. मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत संबंधित ठेकेदाराला पाठीशी घातले जाते. राजकीय पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठेकेदार असल्याने यांच्या दुरवस्थेबाबत आवाज कोण उठवणार हा खरा प्रश्न आहे याचा फटका मात्र सर्वसामान्य जनतेला बसत आहे .वर्षानुवर्ष असलेली ही खड्डयांची समस्या कायमस्वरूपी थांबवायची असेल कामे दर्जेदार व्हायला हवीत निकृष्ट कामे करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हायला हवी तरच रस्त्यांची स्थिती सुधारेल आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम होईल अन्यथा खड्ड्यांमुळे दरवर्षी जीवघेणे अपघात होत राहतील निष्पापांचा यामध्ये बळी जातो काहीजण जायबंदी होतात हे दुष्टचक्र थांबायला हवे .
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FscYSe8iOv2AJpJjbWSgJv
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_