आमदार अमोल मिटकरी यांचा सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजावतीने व्यक्त करण्यात आला जाहीर निषेध

 

सिंधुदुर्ग, दि.२१:-दिनांक 17 एप्रिल 2022 रोजी सांगली येथे राष्ट्रवादी चे आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या चुकीच्या (आक्षेपार्ह) विधानाचा निषेध करण्यासाठी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समस्त ब्राह्मण समाजने निषेध व्यक्त केला यावेळी आमदार मिटकरी हे सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर होते.
यावेळी जमलेल्या ब्राह्मण समाज च्या लोकांनी आमदार मिटकरी यांचा निषेध म्हणून जोरदार घोषणा पण दिल्या.
यावेळी फक्त ब्राह्मण समाजाला आमदार मिटकरी यांनी केलेल्या निषेधाचे निवेदन द्याचे होते मात्र आमदार मिटकरी निवदन न स्वीकारता नियोजित मार्गांवरून निघून गेले. यावेळी उपस्थित ब्राह्मण समाजाने निवेदन देण्यासाठी गेले असता पोलीस प्रशासनाने त्यांना जाण्यास रोखले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमोल मिटकरी “हाय हाय” च्या घोषणा देत ब्राम्हण समाजाच्यावतीने तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्हा ब्राम्हण समाजाचे जयेश चींचळकर, अॅड लक्ष्मण बाकरे, विवेक गोखले, मंजुनाथ फड़के, आशुतोष मुंडले, हर्षद कशाळीकर, सदाशिव सादले आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!