ज्या गावातून अवैध दारू वाहतूक होते, त्या गावातील नागरिकच देणार गाड्या पकडून; ‘कोकण लाईव्ह’ला दिला शब्द

▪️राज्य उत्पादन शुल्क अधिकारी हप्ता खाऊन झाले निद्रिस्त..

▪️आजच्या ‘ढोल बजाव, जिल्हा बचाव’ आंदोलनाने येईल का जाग?

▪️’मनसे’चे आंदोलन कधी होणार?

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे

*🎴सावंतवाडी,दि.०२:* अवैध धंद्याविरुद्ध कोकण लाईव्ह च्या सततच्या मोहिमेमुळे दारू तस्करांचे धावे दणाणले असून आता गावागावातून दारू तस्करांच्या गाड्यांचे नंबर कोकण लाईव्ह कडे दिले जात आहेत. त्यामुळे सख्या, मक्या, बाबल्या, आपी, कापी, बाबूसो, यांच्या पापाचे घडे आता भरले आहेत.

गोव्याहून होणारी ही दारु वाहतूक कधी बांदा, विलवडे, ओटवणे मार्गे सावंतवाडी तर कधी बांदा, सातोळी मार्गे सावंतवाडी होत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदरची वाहतूक ही मारुतीच्या स्विफ्ट कार, झेन कार, अल्टो, एट हंड्रेड, डंपर व छोटे तस्कर स्कुटर यांच्या मधून केली जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क अधिकारी म्हणतात आमच्याकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. त्यासाठी पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्यास  गोव्याहून येणारे  दोनच मार्ग बंद केले तर दारूची वाहतूक थांबू शकते. त्यासाठी फक्त दहा कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, ‘नाचता येईना, अंगण वाकडे’ म्हणी प्रमाणे कारवाई करायची नाही म्हणून कारणे सांगा असा प्रकार राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांचा झाला आहे. दिवसाघणीक भेसळ दारु मुळे युवक मरत आहेत आणि त्यांच्या टाळू वरील लोणी खाण्याचे काम हे अधिकारी करत आहेत.

खाऊन खाऊन पोटे सुटली. आता ती फुटतील. माणूसकी थोडी जरी जिवंत असेल व आपल्या मुलाबाळांना या शापापासून वाचवायचे असेल तर अजूनही वेळ गलेली नाही. आता तरी सरकारी पगारावर समाधान मानून धडक-बेधडक कारवाई करावी व ती फक्त सावंतवाडी पूर्ती मर्यादित न ठेवता, पूर्ण जिल्ह्यात राबवावी, असे आमचे स्पष्ट मत आहे.

पण हे करण्याचे धाडस खालचे अधिकारी करणार नाहीत, कारण या अधिकाऱ्यांना पूर्वीपासून परंपरागत मोठा हप्ता मिळत असल्याने त्यांचे हाताखालचे कर्मचारी, पंच हे गब्बर झाले आहेत. त्यामुळे एखादा नवीन अधिकारी आला की, त्याला पद्धतशीरपणे आपल्या पाशात अडकवले जाते. जेणेकरून आपला हेतू साध्य करून घेतला जाईल.

आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनी जो अवैद्य मध्याचा साठा जप्त केला, तो जप्त केलेला साठा त्यावेळेच्या पंचनामेनुसार आहे का? की, तो लाॅकडाऊन च्या काळात चढ्या दराने विकला गेला. याची शहानिशा होणे गरजेचे आहे. त्यासाठीच कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल उठाव करणार आहे. लॉकडाऊन च्या काळात अशाप्रकारची अवैध दारू दारु सुमारे ७२ लाखाची विकली गेल्याचा संशय आहे. त्यादृष्टीने स्वतंत्र यंत्रणा तयार करून तपास करण्याची आम्ही मागणी केली आहे. एवढ्या तक्रारी होऊन सुद्धा दारू बंदी राज्य उत्पादन शुल्क अधिकारी आयुक्तांचे दारु बंदी मोहीम राबविण्याचे आदेश देऊन सुद्धा सिंधुदुर्गात गोव्याची अवैध दारु मोठ्या प्रमाणात येत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाचा कोट्यवधी रुपयांचा महसूल त्या अधिकाऱ्यांच्या अकार्यक्षमतेमुळे बुडत आहे. त्यामुळे या खात्यातील हे पांढरे हत्ती पोसण्यापेक्षा हे खातेच बंद करावे व ते पोलिसांकडे वर्ग करावे, अशी यापुढे आमची मागणी राहणार आहे.

गोव्यातील सिंधुदुर्गात चोटी दारू वाहतूक करणारे वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवून सिंधुदुर्गात अवैध दारू घेऊन येतात. एकदा पैशाची चटक लागलेले चटकू शांत बसतीलच  कसे? कधी-कधी तर अशी  युक्ती करतात कि, चक्क डंपर मध्ये अर्धी वाळू भरून त्याच्याखाली गोवा बनावटीची दारू टाकून आणली जाते व हे  डंपर रात्री १२ नंतर गोव्याहून सिंधुदुर्गू हद्दीत येतात, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.

याकडे राज्य उत्पादन शुल्क व पोलिसांनी लक्ष देणे गरजेचे आहे. नाहीतर गावागावातील नागरीक आता जागृत झाले आहेत व त्यांनी कोकण लाईव्ह ला मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. ज्या मार्गावरून ही वाहतूक होते, त्या मार्गावरील गावातील ग्रामस्थांनी गाड्या पकडून ठेवण्याचीही तयारी दर्शवली आहे. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. याबाबत राज्य उत्पादन शुल्क व पोलीस प्रशासन यांनी अशा चोरट्याचा वाहतूकीवर करडी नजर ठेवून कारवाई करावी व अवैद्य दारू धंद्याचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने या अवैध धंद्यांविरोधात जी मोहीम उघडली आहे. त्याचे मूळ कारण एका महिलेचा मृत्यू आहे. आणि त्या महिलेचा मृत्यू मागे अडकलेली सोळा सतरा वर्षाची मुले, ज्या मुलांनी आपल्या आई-वडिलांना म्हातार पणात आधार द्यायला पाहिजे तीच मुले अशा अनैतिक प्रकरणात अडकली जातात. ती फक्त झटपट मिळालेल्या दारूच्या पैशामुळेच, त्यामुळे पुढची पिढी बरबाद होऊ नये, म्हणून ही मोहीम उघडली आहे. अधिकारी येतील हप्ता खाऊन निघून जातील. दारू मात्र, सिंधुदुर्गातील युवकांचे जीवन  उध्वस्त करणार हे मात्र निश्चित आहे. त्यासाठी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलने हा लढा उभारलाआहे.

काहींना वाटले कोकण लाईव्ह एक दोन दिवस बातम्या देईल व नंतर शांत होईल. मात्र, कोणत्याही आमीषाला कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज बळी पडणार नाही. असे अनेकांनी प्रयत्न केले ते देशोधडीला  लागले. हा इतिहास आहे. तीस वर्षे पत्रकारितेत आम्ही प्रामाणिक राहिलो, म्हणून परमेश्वर आमच्या बाजूने आहे. व त्याच आशीर्वादावर आजही त्याच जिद्दीने उमेदीने पत्रकारिता करीत आलो आहोत.

एक सत्य आहे, श्री देव पाटेकर व उपरकर यांच्या भूमीत अवैध मार्गाने मिळालेला पैसा कधीच टीकणार नाही. जे आज करोडपती आहेत, ते रोडपती होतील. कारण या पाटेकरच्या भूमीत कधी अती टिकली नाही. ज्याने अती केली, तो मातीमोल झाला व जो लीनतेने राहिला, तो उच्च पदावर पोहोचला. हा इतिहास आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज सावंतवाडी नागरी कृती समितीचे अध्यक्ष माजी नगरसेवक सुनील पेडणेकर व अंध, अपंग, निराधार व्यक्तींचे ‘ढोल बजाओ, जिल्हा बचाव’ आंदोलन आहे. प्रशासनाला जागे करण्यासाठी मनसेनेही  आंदोनाचा इशारा दिला होता. ते आता कधी आंदोलन करतात, या कडे लक्ष लागून राहिले आहे.

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
http://kokanlivebreaking.live

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
https://twitter.com/livekokan

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4

*💥 प्रतिभा संपन्न कोकणच्या प्रत्येक हालचालींवर अतिसुक्ष्म नजर ठेवणारे कोकणातील सुपरफास्ट चॅनल….🔥*

🖥️ *कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज….💥*

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*♦न्यूज एडिटर : गुरुनाथ राऊळ*
*📱संपर्क : +919422686976*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!