कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती

*🟥.प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समिती*

*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴 सावंतवाडी, दि.:२६जुलै*
स्वातंत्र्यदिनाच्या काळात प्लास्टिकच्या राष्ट्र्रध्वजाच्या माध्यमातून होणारी राष्ट्रध्वजाची विटंबना रोखण्याच्या मागणीसाठी हिंदु जनजागृती समितीच्या व सनातन संस्था वतीने दि. २५ जुलै या दिवशी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रशासनाला तसेच माध्यमिक विद्यालय, महाविद्यालय यांना निवेदन देण्यात आले.
राष्ट्रीय अस्मितेचे विस्मरण सामाज्याकडून होत असल्यामुळे प्रजासत्ताकदिनी आणि स्वातंत्रदिनी मोट्ठ्या अभिमानाने मिरवले जाणारे ‘प्लास्टिक आणि कागदी राष्ट्रध्वज रस्त्यावर गटारात पढलेले आढळतात प्लास्टिकचे ध्वज तर लगेच नष्टही होत नाहीत त्यामुळे अनेक दिवस या राष्टध्वजांची विटंबना पाहावी लागते .
निवेदनात म्हटले आहे कि ,राष्ट्रध्वज म्हणजे राष्ट्राची अस्मिता ! 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी हे राष्ट्रध्वज मोठ्या अभिमानाने मिरवले जातात; मात्र हेच राष्ट्रध्वज त्या दिवशीच रस्त्यावर, कचरापेटीत आणि गटारात फाटलेल्या अवस्थेत आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लगेच नष्ट न झाल्याने या राष्ट्रध्वजांची विटंबना अनेक दिवस पहावी लागते. राष्ट्रध्वजाची ही विटंबना रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये जनहित याचिका (क्र.१०३/२०११) दाखल केली होती. तिची सुनावणी करतांना न्यायालयाने
प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाद्वारे होणारा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिले. त्यानुसार केंद्रीय अन् राज्य गृह विभाग, तसेच शिक्षण विभाग यांनी याविषयीचे परिपत्रकही काढले आहे. याचसमवेत केंद्र शासनानेही ‘प्लास्टिक बंदी’चा निर्णय घेतल्याने त्यानुसारही ‘प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करणे’, हे कायदाविरोधी आहे
,यंदा देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे झाली म्हणून केंद्र शासनाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाला ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्याचे आवाहन केले आहे. यात १३ ते १५ आगॅस्ट २०२२ या कालावधीत भारतभर प्रत्येक घरावर तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले आहे. ही एक आनंदाची बाब आहे; मात्र हे करतांना राष्ट्रध्वजाचा कोणत्याही प्रकारे अवमान होणार नाही, याचीही दक्षता सर्व राष्ट्रप्रेमींनी घेतली पाहिजे. तशा सूचना सर्वांना दिल्या पाहिजेत अशी मागणी सनातन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
क्षगेल्या दोन वर्षांपासून दुकानातून, तसेच ‘ऑनलाईन’ पद्धतीने तिरंग्याच्या रंगातील ‘मास्क’ची विक्री होत असल्याचेआढळून आले आहे. तिरंग्याचा मास्क वापरल्याने राष्ट्रध्वजाचे पावित्र्य राखले जात नाही. अशोकचक्रासह तिरंग्याचा मास्क बनवणेआणि वापरणे, हा ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा अवमानच आहे. असे करणे हे ‘राष्ट्रीय मानचिन्हांचा गैरवापर रोखणे कायदा१९५०’, कलम २ व ५ नुसार; तसेच ‘राष्ट्र प्रतिष्ठा अवमान प्रतिबंध अधिनियम १९७१’चे कलम २ नुसार आणि ‘बोधचिन्ह व नाव(अनुचित वापरास प्रतिबंध) अधिनियम १९५०’ या तिन्ही कायद्यांनुसार दंडनीय अपराध आहे. त्यामुळे ‘तिरंगा मास्क’ची खरेदी नकरण्याविषयी विद्यार्थ्यांचे प्रबोधन करावे.देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी देशभक्तांनी इंग्रजांचे अत्याचार चालू असतांना हातातील राष्ट्रध्वज जमिनीवर पडू नये,यासाठी लाठ्या खाल्ल्या, अत्याचार सहन केले, प्रसंगी प्राणाचेही बलीदान दिले. असे असतांना मुलांना खेळण्यासाठी घेतलेले,वाहनांवर लावलेले कागदी आणि प्लास्टिकचे ध्वज, रस्त्यावर आणि नंतर कचराकुंडीत पहायला मिळतात, पायदळी तुडवलेजातात. यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे विद्यार्थ्यांच्या मनावर आताच बिंबवायला हवे. अनावधानेही राष्ट्रध्वजाचा अवमानतथा विटंबना विद्यार्थ्यांकडून होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांचे प्रबोधन होणे आवश्यक आहे.आजचे विद्यार्थी ही देशाची भावी पिढी ! ही भावी पिढी राष्ट्राभिमानी व्हावी, या उदात्त हेतूने समिती गेली 19 वर्षे राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा !’ हा उपक्रम राबवत आहे. या अंतर्गत व्याख्याने घेणे, प्रश्नमंजुषा घेणे, हस्तपत्रके वाटणे, फ्लेक्स
लावणे, रस्त्यावर पडलेले राष्ट्रध्वज गोळा करणे, प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री रोखणे आदी प्रयत्न करत आहे. या दृष्टीने आपल्या शाळेत याविषयी जागृती करण्याची आम्हाला अनुमती मिळावी अशी मागणी केली आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼

———————————————————–
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥
💥🎁 🇴 🇫 🇫 🇪 🇷  🎁💥

सिंधुदुर्गातील अग्रगण्य कॉम्प्युटर आणि लॅपटॉप विक्रेते *सावंतवाडी येथील 🔺आस्था कॉम्प्युटर शॉपी* 💻घेऊन आले आहेत खास आपल्या ग्राहकांसाठी
🇶 🇺 🇮 🇨 🇰 – 🇭 🇪 🇦 🇱 Ⓡ︎
📀 *Antivirus Software*📀
🇴 🇫 🇫 🇪 🇷  🛡️🛡️🛡️

*Quick heal मान्सून 🌈आणि*
*Independence day ऑफर 2022*
🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

*25 जुलै ते 15 ऑगस्ट* या कालावधी मध्ये खरेदी केलेल्या *Quick heal* आणि *Guardian antivirus* च्या कोणत्याही प्रॉडक्ट सोबत
मिळवा 👇🏼👇🏼👇🏼👇🏼
🇴 🇫 🇫 🇪 🇷  1️⃣
*650/- किमतीचा SanDisk® 32GB पेनड्राईव्ह*
(5 वर्ष वॉरंटीचा ) FREE FREE FREE 📣
🔥 *किंवा 🔥किंवा 🔥 किंवा*🔥 (एकच ऑफर मिळेल )
🇴 🇫 🇫 🇪 🇷  2️⃣
*699/- किमतीचा वायरलेस Mouse* 🖱️🖱️
📣 FREE FREE FREE

📞📞☎️☎️📞📞☎️
*चला तर उचला phone आणि कॉल करा किंवा व्हाट्सअँप वर संपर्क करा 9405099961 / 9405099963 / 7410594392 आणि मिळवा घरबसल्या Antivirus चे इंस्टॉलेशन आणि ॲक्टिव्हेशन*
(ग्राहकांच्या घरी किंवा ऑफिस मध्ये स्पीड चे इंटरनेट असणे आवश्यक) **
*Google Pay/ Phone Pay/ UPI app/ Internet Banking*
या मार्फत payment स्वीकारले जाईल आणि ऑफर्स च्या भेटवस्तू ग्राहकांच्या सोयीनुसार मागाहून कधीपण देण्यात येतील
🎁🎁🎁🎁🎁🎁
वरील ऑफर्स इतर आमच्या कुठल्याही ऑफर सोबत club केल्या जाणार नाहीत / पूर्व सुचनेशिवाय ऑफर्स बंद किंवा त्यामध्ये बदल करायचा हक्क आम्ही राखून ठेवला आहे
🎁🎁🎁🎁🎁🎁🎁
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!