जखमी पानकावळ्याला माडखोल येथे जीवदान
*🟥जखमी पानकावळ्याला माडखोल येथे जीवदान*
*🟥 धुरीवाडी शाळेचे सहाय्यक शिक्षक दत्ताराम सावंत यांची भूतदया*
*🎥 KOKAN LIVE BREAKING*
_अचूक बातमी थेट हल्ला_
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 सावंतवाडी, दि२५जुलै.:*
माडखोल धुरीवाडी शाळेचे सहाय्यक शिक्षक दत्ताराम सावंत यांना सकाळी शाळेमध्ये येत असताना रस्त्यावर जखमी अवस्थेतील हा पानकावळा सापडला त्वरित त्या पक्षाला रस्त्याच्या बाजूला असलेल्या गोवेकर यांच्या घरात निवारा देऊन त्याच्यावर प्रथमोपचार करण्यात आले. व याची कल्पना वन विभाग सावंतवाडी यांना देण्यात आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी याची त्वरित दखल घेत माडखोल धुरीवाडी येथे धाव घेतली व या जखमी पान कावळ्याला पुढील उपचारासाठी पशुवैद्यकीय दवाखाना सावंतवाडी येथे घेऊन गेले त्याच्यावर अधिक उपचार करून त्याला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. माडखोल धुरीवाडी शाळेचे सहाय्यक शिक्षक दत्तराम सावंत यांच्या तत्परतेमुळे या पक्षाचा जीव वाचवण्यात मदत झाली. तसेच गोवेकर दांपत्याने ग्रामपंचायत सदस्य सिद्धेश शिरसाट शाळेचे मुख्याध्यापक तसेच नागेश सावंत अरविंद परब यांनी मदत केली तसेच धुरीवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना भूतदया म्हणजे काय याचा व वन्य जीवावर प्रथमोपचार कसे करावे याचा अनुभव मिळाला. धुरीवाडी येथील ग्रामस्थांनी यासाठी दत्तराम सावंत व वनविभाग सावंतवाडी तसेच दानोली वनविभाग कार्यालयातील कर्मचारी यांचे आभार मानले.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼👇🏼
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

