कोकणमहाराष्ट्रराजकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध-आमदार दिपक केसरकर

*🟥 सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटीबद्ध-आमदार दिपक केसरकर*

*🟥 आंबोली,गेळे कबुलायतदार प्रश्न,मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल,याची सुरुवात हे वाढदिवसाचे गिफ्ट*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

*🎴 सावंतवाडी, दि.:१८ जुलै*
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध आहे असे आमदार दीपक केसरकर यांनी वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले, संधी मिळाल्यानंतर त्या संधीचा फायदा जनकल्याणासाठी करण्याचा मी आतापर्यंत प्रयत्न केला आहे तो तसाच यापुढे सुरू राहील.
आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस आज सोमवार दि. १८ जुलै रोजी आहे. मात्र या दिवशी राष्ट्रपती पदासाठी निवडणूक होत असून मतदानासाठी मुंबई येथे थांबावे लागल्याने ते सावंतवाडी येथे येणार नाहीत असे म्हणाले. मात्र सिंधुदुर्गच्या जनतेने मला आतापर्यंत भरभरून प्रेम दिले आहे ते वृध्दिंगत होण्यासाठी आपण जनकल्याणाच्या योजना आणण्यासाठी कटिबद्ध आहोत असे वचन त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा वासियांना दिले.
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास योजना आणि रोजगारासाठी विविध प्रकल्प आणण्यासाठी आपण कटिबद्ध होतो. ज्या ज्या वेळी संधी मिळाली त्या त्यावेळी या कामासाठी प्राधान्य दिलेले आहे असे त्यांनी सांगितले. जिल्ह्यातील जनतेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकार निश्चितच गिफ्ट देतील असे त्यांनी सांगितले ते म्हणाले, माझ्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आंबोली गेळे आणि चौकोळ येथील कबुलातदार जमीन प्रश्न, मुंबई विद्यापीठाला आंबोली येथे आवश्यक असणारी ५० एकर जागा सावंतवाडी चे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अशा प्रकल्पांना चा न गिफ्ट दिल्याचे मी मानतो.
*आंबोली चौकुळ आणि गेळे हे गाव माझे दुसरे कुटुंबासारखे गाव*
असल्याचे मी मानतो त्यामुळे कायमच या भागाला मी प्राधान्य दिले
असून कबुलातदार गावकर जमीन प्रश्न सुटल्यानंतर निश्चितच राजकारणात प्रवेश केल्याचे सार्थकी लागल्याचे मानणार आहे. चौकुळ मधील जमीन गावकर प्रश्न स्वतंत्रपणे हाताळण्यात येणार असून मुख्यमंत्री आणि महसूल खात्याचे अतिरिक्त सचिव माझ्यासह गावात जाऊन लोकांची विचारपूस करणार आहेत. त्यामुळे पुढील काळात या तिन्ही गावांचा हा प्रश्न सुटेल असे ते म्हणाले मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला आंबोली येथे ५० एकर जमीन दिली जाणार आहे भविष्यात विद्यापीठाचे या केंद्राला विद्यापीठ दर्जा मिळाला तर ते सिंधुदुर्गाचे भाग्य असेल आंबोली जैवविविधतेने नटलेली असून विदेशातील कॅनडा इस्राईल सारख्या देशांना आकर्षण ठरेल. आंबोली विद्यापीठाचे केंद्र आंतरराष्ट्रीय दर्जाचे होऊ शकेल. आंबोली विद्यापीठ केंद्रातून अभ्यासक्रम शाळेतून सुरू व्हावा यासाठी इंटरनॅशनल स्कूल होऊन मुलांच्या भवितव्याच सुधारणा होऊ शकते हा शैक्षणिक क्रांतीचा योग असेल असे ते म्हणाले.
आंबोली येथील मेनन कंपनीच्या ठिकाणी गोल्फ कोर्स प्रकल्प विचारात आहे. आंबोलीत पर्यटनच्या जागेवर हॉटेल केटरिंग मॅनेजमेंट असे प्रकल्प देखील मुंबई विद्यापीठाच्या माध्यमातून राबविण्यासाठी प्राधान्य देण्यात येणार आहे असे प्रकल्प राबवून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उच्च दर्जाचे पर्यटन व्हावे यासाठी प्रयत्न आहे त्यासाठी पायाभूत सुविधा आणि प्रकल्प देखील प्राधान्याने आणले जातील सागरी संशोधन केंद्र, सागरी पर्यटन, तिलारी येथील पर्यटन प्रकल्प असे विविध प्रकल्प होण्यासाठी प्रयत्न केले जाणार असून काही खाजगी गुंतवणूकदार पर्यटन क्षेत्रात गुंतवणूक करण्यात तयार आहेत असे आमदार केसरकर म्हणाले. सातार्डा येथील प्रकल्प आणि आडाळी येथील एमआयडीसी देखील मूर्त स्वरूपात यावी म्हणून प्रयत्न आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आमचे प्रयत्न सुरू असून त्याला आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून चालना दिली जाईल. सावंतवाडी शहरात बालोद्यान निर्माण केल्यानंतर जिल्ह्यामध्ये तसे प्रकल्प साकार होत आहेत असे त्यांनी सांगितले.
या पुढील काळात विकासाच्या प्रश्नावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी जुळवून घेण्याची आपली तयार असून विकास करायचा असेल तर टीका टीपणी थांबवून प्रत्यक्षात फलोद्यान मच्छीमार पर्यटन या क्षेत्रात विकास केला पाहिजे चांदा ते बांदा योजना देखील या विकासाची एक संकल्पना आहे असे देखील ते म्हणाले ,जिल्ह्यातील मच्छीमार पर्यटन व्यापारी शेतकरी उद्योजक अशा प्रत्येक घटकासाठी काम करायचे आहे असे त्यांनी सांगताना बांदा संकेश्वर हा मार्ग सावं मधून जाणार आहे त्यामुळे निश्चितच मुंबई गोवा महामार्गाची कमी होईल असे ते म्हणाले.
सावंतवाडी राजघराण्याचा मी आदर करतो श्रीमंत शिवराम राजे भोसले यांच्यामुळे मी राजकारणात आलो आहे श्रद्धा व सबुरी ठेवून मी काम करत असून प्रत्येकाने श्रध्दा व सबुरी ठेवून काम केले तर विकास साध्य होऊ शकतो असे ते म्हणाले. मी माझ्या राजकीय जीवन प्रवासामध्ये काम करताना कुटुंबाला देखील कमीच वेळ देतो मात्र करण्यासाठी मी अहोरात्र मेहनत घेतो. माझ्या कुटुंबाने माझ्या पाठीशी खंबीरपणे राहून साथ दिली आहे त्यामुळे हे करू शकतो. या पुढील काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेची साथ मिळेल अशी आशा व्यक्त करतो आहे असे ते म्हणाले.
राज्यात नव्याने आलेले शिंदे सरकार हे कोकणाचे हक्काचे सरकार आहे त्यामुळे येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यासह कोकणात सुखाचे दिवस येतील असा विश्वास शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दीपक यांनी बोलून दाखवला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री ही जोडी येणाऱ्या काळात महाराष्ट्राला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जाईल माझ्या मतदारसंघातील राहिलेली अर्धवट विकास कामे व नव्याने विकासात्मक बदल घडून आणण्यासाठी माझा नेहमीच प्रयत्न असणार आहे माझ्या वाढदिवसाला मी माझ्या मतदारसंघात जनतेमध्ये उपस्थित राहू शकत नाही याची आपल्याला खंत असून माझे प्रेम नेहमीच माझ्या जनतेवर राहणार आहे.
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

————————————-
*💐वाढदिवस अभिष्टचिंतन💐*
_सावंतवाडी विधानसभा आमदार तथा माजी पालकमंत्री *मा. श्री. दिपकभाई केसरकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!_

*▪️शुभेच्छुक:*

*🌷खेमराज उर्फ बाबू कुडतरकर*
_शिवसेना शहर प्रमुख,माजी नगरसेवक_

*🌷सुरेंद्र बांदेकर*
_माजी नगरसेवक_

*🌷अशोक दळवी*
_शिवसेना उपजिल्हाप्रमुख_

*🌷राघोजी सावंत*
_शिवसेना उपतालुकाप्रमुख_

*🌷गणेशप्रसाद गवस*

*🌷नारायण उर्फ बबन राणे*
_माजी पं. स सदस्य_

*🌷आनंद सावंत*
_देवसू_

*🌷पंकज परब*
_शिवसेना शाखाप्रमुख_

*🌷दया परब*
_शासकीय ठेकेदार_

https://m.facebook.com/photo.php/?fbid=1050511552260384
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!