कर्तुत्वाचा महामेरु-आमदार दिपक केसरकर
*🟥कर्तुत्वाचा महामेरु-आमदार दिपक केसरकर*
*🟥मराठी, इंग्रजी,हिंदी भाषेवर प्रभुत्व,शांत ,संयमी, चिकाटी, अभ्यासू वृत्ती ,या गुणांमुळे केसरकर सर्वोत्तम प्रवक्ते म्हणून देशभरात पोहचले*
*_🎥 Kokan Live Breaking News_*
*✍🏻 संपादकीय : सीताराम गावडे*
*🎴 सावंतवाडी, दि.:१८जुलै*
परमेश्वराला पहाटेला पडलेले स्वप्न म्हणजे सावंतवाडी,असं सावंतवाडी शहराचे वर्णन कविवर्य डॉक्टर वसंत सावंत यांनी केलं होतं, खरोखरच दृष्ट लागावे असं सावंतवाडीचे मोती तलाव आणि या मोती तलावाच्या अवतीभवती वसलेलं हे सुंदर शहर… शैक्षणिक अध्यात्मिक वारसा लाभलेले शहर…या शहराचे नेतृत्व अनेक दिग्गज मंडळी केलं.. या शहरात शांतता, व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम केलं गेलं, या शहरावर खऱ्या अर्थाने विकासाचा कळस चळवला तो वसंत शेठ केसरकर यांचे चिरंजीव दीपक केसरकर यांनी, १९९० च्या दशकात राजकारणात प्रवेश केल्यावर स्वीकृत नगरसेवक ते लोकनियुक्त नगरसेवक या पदावर पोहोचल्यानंतर ते सावंतवाडीचे नगराध्यक्ष झाले, या नगराध्यक्ष पदाच्या काळात त्यांनी सावंतवाडी शहराला विकासाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवले.
सावंतवाडी शहरात जगन्नाथराव भोसले बालोद्यान, शिल्प ग्राम, हेल्थ फार्म, भटक्या जमातीतील लोकांसाठी अभिनव अशी घरकुल योजना, अशा महत्त्वाकांक्षी योजना राबवून दीपक केसरकर यांनी आपल्या नगराध्यक्ष पदाच्या काळात सावंतवाडी शहराचा चेहरा मोहरा बदलून टाकला, सावंतवाडी शहरावर वीस वर्ष अभाधित सत्ता राखली यानंतर ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार झाले,त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलेच नाही.
शांत, संयमी, चिकाटी, जिज्ञासू, नवनवीन कला अवगत करण्याची वृत्ती,समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची कला,त्याच्यावर प्रभाव टाकण्याची जादू, या केसरकरांच्या गुणांमुळे ते प्रत्येकाला हवे हवेसे वाटू लागलेत.
नारायण यांच्यावर दहशतवादाच्या मुद्यावर उघड उघड बंड केल्यानंतर त्यांनी त्यांचा मुलगा डाॅ निलेश राणे यांघा लोकसभेत पराभव करुन खासदार म्हणून विनायक राऊत यांना लोकसभेत पाठवले,त्या नंतर आमदार केसरकर यांनी सेनेत प्रवेश केला व शिवसेनेच्या तिकिटावर ते विक्रमी मतांनी विजयी झालेत.
त्यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री गृहराज्यमंत्री, वित्तमंत्री, अशी महत्त्वाची पद ही भूषवली या कारर्कीदीत त्यांनी आपल्या चारित्राला कुठेही डाग लावू दिला नाही,तर आपल्या स्वच्छ कपड्याप्रमाणे स्वच्छ कारभार केला.सिंधुदुर्गात चांदा ते बांदा ही महत्वाकांक्षी योजना राबवली व यातून अनेक शेतकरी सधन झालेत,शेतीची आवड निर्माण झाली, विकासाच्या दृष्टीने अनेक योजना आणल्या,करोडो रुपयांचा निधी आणला मात्र निधीचे योग्य नियोजन करण्यात अधिकारी कमी पडले,
बहुतेक राजकीय लोकप्रतिनिधींचे राजकारणात आल्यानंतर किंवा आमदार, खासदार मंत्री, झाल्यानंतर मालमत्तेत वाढ होते, मात्र दीपक केसरकर यांच्या बाबतीत ही गणिते उलटी फिरलीत सुरुवातीची मालमत्ता नंतर आमदार मंत्री झाल्यानंतर ची मालमत्ता घट होताना दिसून आली.
राजकारण करत असताना त्यांनी प्रसंगी आपली मानमत्ता विकली मात्र कुठेही आपल्या तत्त्वाशी तडजोड केली नाही ,म्हणून सावंतवाडी मतदारसंघाचा सतत तीन वेळा विजयी न होण्याचा इतिहास बदलून त्यांनी विजयाची हॅट्रिक साजरी केली. या काळात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आली मात्र दीपक केसरकर यांना मंत्री पद दिले गेले नाही.
तरीही केसरकर नाराज न होता काम करत राहिलेत या जिल्ह्यावर रत्नागिरी जिल्ह्याचा आमदार पालकमंत्री म्हणून लादला गेला या जिल्ह्यात सक्षम दोन आमदार असताना रत्नागिरी जिल्ह्याच्या आमदाराला सिंधुदुर्ग जिल्ह्याची जबाबदारी देताना पक्ष श्रेष्ठींनी विचार करायला हवा होता ,मात्र तो झाला नाही ,भाजपची युती झाली नाही म्हणून सुरुवातीपासून नाराज असलेले दीपक केसरकर यांना एकनाथ शिंदे यांच्या बंडाने अधिक ताकद मिळाली व एकनाथ शिंदेंच्या गटाचे राज्यात नव्हे तर देशाचे प्रवक्ते म्हणून नेतृत्व करण्याची संधी केसर कराना मिळाली व या संधीचे केसरकर यांनी सोने केले.
शिंदे गटाच्या आमदारांविषयी असलेला गैरसमज ,राग त्यांनी जनतेच्या मनातून दूर करण्याचा प्रयत्न केला व त्यात ते यशस्वीही झालेत, शिवसेनेची प्रवक्ते मुलुख मैदान तोफ असलेल्या संजय राऊत यांनाही दिपक केसरकर प्रवक्ते म्हणून पुरुन उरलेत व सिंधुदुर्गाच्या या सुपत्राने आपल्या अभ्यासू, शांत, संयमी ,व गोड वृत्तीने आपले नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले.
एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात केसरकर यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळेल अशी सर्वांनाच आशा आहे ,त्यांच्या पुढील वाटचालीस कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल कडून हार्दिक शुभेच्छा व वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा..
*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻
————————————-
*💐वाढदिवस अभिष्टचिंतन💐*
_सावंतवाडी विधानसभा आमदार तथा माजी पालकमंत्री *मा. श्री. दिपकभाई केसरकर* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..!!!_
*▪️शुभेच्छुक:*
*🌷खेमराज उर्फ बाबू कुडतरकर*
_शिवसेना शहर प्रमुख,माजी नगरसेवक_
*🌷सुरेंद्र बांदेकर*
_माजी नगरसेवक_
*🌷अशोक दळवी*
_शिवसेना उपजिल्हाप्रमुख_
*🌷राघोजी सावंत*
_शिवसेना उपतालुकाप्रमुख_
*🌷गणेशप्रसाद गवस*
*🌷नारायण उर्फ बबन राणे*
_माजी पं. स सदस्य_
*🌷आनंद सावंत*
_देवसू_
*🌷पंकज परब*
_शिवसेना शाखाप्रमुख_
*🌷दया परब*
_शासकीय ठेकेदार_
https://m.facebook.com/photo.php/?fbid=1050511552260384
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

