कणकवली बसस्थानकात खड्डे जांभ्या दगडाने भरताना केली मलमपट्टी..
बसस्थानकात येता, जाता प्रवाशांना होतोय त्रास;खड्यात बस गेल्यानंतर अनेकांच्या अंगावर उडतोय चिखल..
कणकवली दि.१३ जुलै
कणकवली बसस्थानक परिसरात खड्ड्यांचे साम्राज्य झाले होते.त्यावर जांभ्या दगडाची मलमपट्टी जेसीबीच्या सहाय्याने केली गेली आहे.बसस्थानकात येता,जाता प्रवासी तसेच शालेय विद्यार्थ्यांना खड्यातील पाण्याशी सामना करावा लागत आहे. खड्यात बस गेल्यानंतर अनेकांच्या अंगावर चिखल उडतो आहे.
कणकवली एस्टी बसस्थानक हे जिल्ह्यातील प्रमुख प्रवाशी केंद्र आहे.या ठिकाणी मोठ्या संख्येने प्रवाशी वर्ग आहे.मात्र,या बसस्थानक परिसरात मोठे मोठे खड्डे पडले आहेत.त्यामुळे सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत.एसटी प्रशासनाने आज जेसीबीच्या सहाय्याने खड्डे बुजवण्याचं काम हाती घेतले आहे.मात्र,केवळ मलमपट्टी ठरली आहे.