ना.नारायण राणे यांच्या घराकडे जाणार्या खाजगी रस्त्यासाठी नगरपालिकेचा खर्च का?- कन्हैया पारकर
*_🛑ना.नारायण राणे यांच्या घराकडे जाणार्या खाजगी रस्त्यासाठी नगरपालिकेचा खर्च का?- कन्हैया पारकर*
*🛑 कणकवली नगरपंचायत ची सभा झाली वादळी*
*🎥कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*_
*✍️ प्रतिनिधी:-रविकांत जाधव*
*🎴 कणकवली,दि,:-२५ नोव्हेंबर*
ना. नारायण राणे यांच्या
घरापर्यंत जाणाऱ्या रस्त्यासाठी नगरपंचायतीने २५ लाखाचा निधी का खर्च करावा, असा सवाल आजच्या नगरपंचायती सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवक कन्हैया पारकर यांनी उपस्थित केला. सदर ठरावाला आमचा विरोध असून सत्तेचा गैरवापर करत नगरपंचायतीला भुर्दंड घालू नका. खासगी क्षेत्रातील रस्त्यासाठी कणकवली शहरवासीयांच्या करातून जमा झालेल्या निधी खर्च करणे हे चुकीचे आहे, असे पारकर यांनी सुनावले. त्यावर उत्तर देताना सभाध्यक्ष बंडू हर्णे यांनी नगरपंचायत ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे सर्वांना पायाभूत सुविधा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत, असे सांगितले. याविषयावरून सभागृहातील राजकीय वातावरण गरम झाल्याचे पाहायला मिळाले.
कणकवली नगरपंचायतीची सर्वसाधारण सभा आज उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह इतर नगरसेवक या सभेला उपस्थित होते. सभेत सर्वप्रथम नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या मातोश्रींच्या निधनाबद्दल तसेच कोरोना कालावधीत बळी पडलेल्या नागरिकांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली. या सभेत सभेत राणेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनाचा विषय गाजला. शहरातील नाथ पै नगर येथील केंद्रीय मंत्री राणेंच्या घराकडे जाणाऱ्या परिसरात अंतिम रेखांकन मंजूरी नसताना घरांना परवानगी देण्यात आली. त्यामुळे येथील रस्ते जमीन मालकांच्या नावे राहिले आहेत.
हे रस्ते नगरपंचायतीकडे वर्ग करून घेण्यासाठी २५ लाख रूपये निधी देण्याबाबतचा मुद्दा आजच्या सभेत चर्चेला आला. यावेळी नगरसेवक कन्हैया पारकर यांनी जनतेचा पैसा राणेंच्या घराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी खर्च करण्याला तीव्र विरोध केला. तर येथील घरांना ग्रामपंचायत काळात परवानगी देण्यात आली. त्यावेळी नियम पाहण्यात आले नव्हते. त्या त्रुटी आता आम्हाला दुरूस्त कराव्या लागत आहेत. त्यामुळे स्थानिक जमीन मालकांना भूसंपादनाचे पैसे देऊन रस्ता ताब्यात घ्यावा लागत असल्याची माहिती उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी दिली. तसेच यावेळी इतर विषयांवरही चर्चा करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थलांतरणाकरिता शासन मालकीच्या उपलब्ध जागेत संबंधित विभागांकडून कणकवली नगरपंचायतकडे वर्ग करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
*👇👇सविस्तर बातमी साठी खालील लिंक वर क्लिक करा👇👇*
________________________
*🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..🤩धमाका आँफर..*
🎉दिवाळीच्या शुभमुहूर्तावर सावंतवाडीतील प्रसिद्ध *Raut and Company* आणि *Rovastra* ग्राहकांसाठी घेऊन आले आहेत
*😍धमाका आँफर😍*
_🤩वेळ दवडू नका आजच राऊत अँड कंपनी आणि रोवस्त्र ह्या दालनाला भेट द्या🤩_
_*🛑राऊत अँड कंपनी मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा २०% पर्यंत सूट..!*_
*_🟡रोवस्त्र मध्ये कपडे खरेदी करा, आणि मिळवा तब्बल ५०% पर्यंत सूट..!_*
(आँफर फक्त मर्यादित दिवसांसाठी)
*🏤आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग, गांधी चौक, ता.सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग ४१६५१०
*🎴संपर्क:-*
02363272709 ,272254
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*