बांदा नं.१ केंद्र शाळेत मातांचे पुजन करून गुरुपौर्णिमा साजरी

 

 

बांदा:प्रतिनिधी:शैलेश गवस

 

भारतीय संस्कृतीत गूरू शिष्याच्या नात्याला महत्त्व आहे.गुरूविषयी कृतज्ञता व्यक्त करणेसाठी दरवर्षी गुरुपौर्णिमा मोठ्या उत्साहाने‌ साजरी केली जाते.

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत आईची भूमिका महत्वपूर्ण असते,आई ही विद्यार्थ्यांचा गुरू असते या आपल्या आईविषयी कृतज्ञता व्यक्त करणेसाठी जिल्हा परिषद बांदा नं.१केंद्र शाळेतील इयत्ता पहितील विद्यार्थ्यांनी आपल्या माता पालकांचे पूजन करून वंदन‌ केले.या कार्यक्रमाला पहितील 45महिला माता उपस्थित होत्या.

यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या घराच्या परीसरातील‌ उपलब्ध पाने‌ फुले यांचा वापर करून बनवून आणलेला पुष्प गुच्छ आपल्या आईला दिला तसेच आपल्या मातेचे औक्षण करून गोड मिठाईचा घास भरविला.

यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व शिक्षकांना पुष्पगुच्छ देऊन‌ शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळेतील सर्वज्ञ‌ वराडकर व नैतिक मोरजकर‌ विद्यार्थ्यांनी भाषणातून‌ महती विषद‌ केली.केंद्र प्रमुख संदीप गवस यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षिकांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!