पेंडुर येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ उपक्रम साजरा

सावंतवाडी ः पेंडूर येथील पेंढऱ्याची वाडी शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी पालकांसमवेत ‘एक दिवस बळीराजासाठी’ या उपक्रमांतर्गत प्रत्यक्ष शेतीचा अनुभव घेतला.
पेेंडूर येथील स्मिता चव्हाण यांच्या शेतात मुलांनी तरवा काढणे, त्याची पेंढी बांधणे, रोपांची चिखलात लावणी करणे यासारख्या शेतीविषयक कामांचा प्रत्यक्ष व मनमुराद आनंद लुटला. यावेळी चव्हाण काकी व जयश्री जगन्नाथ चव्हाण काकी यांनी सर्व मुलांना, शिक्षकांना चहापाणी देऊन पाऊणचार केला.
त्यानंतर संजना गावडे यांनी सर्व मुलांना चविष्ट अशी चवळ्याची उसळ व पोटभर आंबोळ्या खाऊ घातल्या. या कामी त्यांना त्यांचे कुटुंबीय, स्मिता चव्हाण, समीक्षा बरकुटे, जयश्री चव्हाण व शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष गौरी फटनाईक यांनी मोलाची मदत केली.
यावेळी रानभाज्यांचे प्रदर्शन भरवण्यात आले. या उपक्रमासाठी प्रांजल हरमलकर, संजना गावडे, स्मिता चव्हाण, रेश्मा साटेलकर वहिनी यांनी रानातून गोळा केलेल्या पेवा, एकपानी भाजी, शेवग्याचा पाला, काळे अळू, सफेद अळू, तेरा, भारंगी, शतावरी, दिंडा, कुर्डू, रताळे, भोपळा, घोटवेल, ओवा, इ . रानभाज्यांचे प्रदर्शन मांडले. या कामी त्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका देवयानी आजगावकर यांचे सुंदर मार्गदर्शन लाभले.
तसेच तेंडोलकर गुरुजी आणि काळोजी गुरुजी यांनी शेतीसंदर्भातील विविध शब्द, अवजारे यांची सोदाहरण मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!