कुडाळमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता..
कुडाळमध्ये राजकीय भूकंप होण्याची शक्यता..
जोरदार राजकीय हालचालींना वेग
Kokan Live Breaking News
प्रतिनिधी : समीर म्हाडेश्वर
सिंधुदुर्ग,१२ जुलै: महाराष्ट्र राज्यातील झालेल्या राजकीय भूकंपाचे पडसाद आता काहीसे सिंधुदुर्गात सुद्धा उमटण्याची परिस्थिती निर्माण झालीय. कुडाळ तालुक्यात शिवसेनेत सुद्धा बंड होण्याची शक्यता असून किमान अनेक नगरसेवक शिंदे गटात जाणार असल्याची चर्चा जोरदारत सुरु झाली आहे. तर असं झाल्यास कुडाळ नगरपंचायतीत सत्तापालट होण्याची शक्यता . एकनाथ शिंदेंच्या बंडाची झळ कुडाळला बसल्याची खात्रीशीर चर्चा सुरु आहे. विशेषतः कुडाळ नगरपंचातीमध्ये शिवसेनेच्या काही नगरसेवकांना ‘शिंदेशाही’ जवळची वाटू लागली असल्याच बोललं जातंय. आणि तस झालं तर अगोदरच काँग्रेसबरोबर काठावरच्या बहुमतात असलेली शिवसेनेची सत्ता धोक्यात आलीय. कारण, कुडाळ नगरपंचायतीमध्ये एकूण १७ नगरसेवक असून त्यात भाजप ८, शिवसेना ७ आणि काँग्रेसचे २ असं पक्षीय बलाबल आहे. शिवसेनेनं काँग्रेसला नगराध्यक्ष पद देऊन आपली सत्ता कुडाळ नगरपंचायतीवर स्थापन केली. पण शिवसेनेचा एक जरी नगरसेवक शिंदे गटात गेला तर तो साहजिकच भाजपला जाऊन मिळणार त्यामुळे नगरपंचायतीत भाजप ८ आणि शिंदे गट १ असे मिळून ९ आणि शिवसेना ६ आणि काँग्रेस २ असे मिळून ८ असं पक्षीय बलाबल होईल.
_________________________
*_कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..
_*
*_गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..
_*
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग
*
* जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….
*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*संपर्क : +919405475712*
*कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप
*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
* कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_