कोकणमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सीच्या अध्यक्षपदी ला. तेजल पेढांबकर यांची निवड..

🟥लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सीच्या अध्यक्षपदी ला. तेजल पेढांबकर यांची निवड..

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर

🎴चिपळूण,५ : लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सीच्या अध्यक्षपदी चिपळूण मधील उच्चशिक्षित शिक्षिका सामाजिक कार्यकर्त्या. सौ.तेजल यशवंत पेढांबकर यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. कोरोना संक्रमण काळ ,महापूर संकट काळातही पेढांबकर यांनी उल्लेखनीय कामगिरी केली होती कोरोना काळात थेट रस्त्यावर सेवा बजावणाऱ्या पोलीस,आरोग्य कर्मचारी,पोलीस मित्र ,सामाजिक कार्यकर्ते यांना तेजल पेढांबकर यांनी स्वतः घरात बनविलेला आयुर्वेदिक चहाचा काढा यांचे पती आदर्श शिक्षक श्री.यशवंत पेढांबकर ठीक ठिकाणी जाऊन मोफत वाटपाचा कार्यक्रम करीत होते.प्रत्येक दिवसाला सुमारे ७० कप चहा वाटप होत होता.हे सामाजिक कार्यही उल्लेखनीय ठरले होते.
२०८ देशांमध्ये सेवाभावी संस्था म्हणून कार्यरत व प्रसिद्ध असलेल्या लायन्स क्लब या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सी या संस्थेच्या २०२२-२३ या लायनेस्टीक वर्षी अध्यक्ष पदाकरीता उच्चविद्याविभूषित, राज्यस्तरीय आदर्श शिक्षिका पुरस्काराने सन्मानित असलेल्या ला. तेजल पेढांबकर सचिव पदी बुध्दीबळाच्या प्रशिक्षक असलेल्या ला. रश्मी सावर्डेकर तसेच खजिनदार पदी पंचायत समिती विषयतञ म्हणून कार्यान्वित असलेल्या ला. श्रुती सावर्डेकर यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. निवड प्रक्रियेसाठी संस्थेची सर्वसाधारण सभा सद्य अध्यक्षा ला. स्वाती देवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच क्लब अँडमिनिस्ट्रेटर ला प्रांजल गुंजोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच संप्पन्न झाली.
महिलांचे न्याय हक्क आणि महिलां सबलीकरण या विषयात आपण लक्ष देऊन काम करणार असल्याचे सांगून
लायन्स क्लब चिपळूण गॅलेक्सीच्या वतीने समाज उपयोगी विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले जातील असे नवनिर्वाचित अध्यक्षा तेजल पेंढाबकर यांनी सांगितले.लायनेस व लायन मिळून मागील ३१ वर्षे कार्यरत असलेल्या या संस्थेचा चढता आलेख अबाधित ठेवून गरजूंपर्यत पोहचण्याचा मानसही ला. पेढांबकर यांनी व्यक्त केला. यावेळी निवड कमिटी म्हणून ला. एकता मुळ्ये, ला. सीमाताई चाळके व ला. सोनल कारेकर यांनी काम पाहीले.ला तेजल पेढांबकर यांच्या निवडीचे वृत्त कळताच सर्वच स्थरावर त्यांचे कौतुक आणि अभिनंदन होत आहे.

———————————————————–

*प्रवेश..! प्रवेश..!! प्रवेश..!!!*
*✍🏻१०वी नंतर इंजिनिअरिंगला प्रवेश सुरु!*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील *NBA मानांकन* मिळालेले एकमेव तंत्रनिकेतन
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक🏠*

*भारत सरकार व महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त* आणि *100% नोकरीची हमी* देणारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट पॉलिटेक्निक

*▪️उपलब्ध कोर्सेस▪️*👇

🔹मेकॅनिकल इंजिनिअरिंग
🔹इलेक्ट्रीकल इंजिनिअरिंग
🔹सिव्हील इंजिनिअरिं
🔹कॉम्युटर इंजिनिअरिंग

*🔴प्रमुख वैशिष्ट्ये🔴*
👇🏻
🔸3 वर्षांचा अभ्यासक्रम
🔸अनुभवी व तज्ञ प्राध्यापक
🔸उत्कृष्ट पायाभूत सुविधा, प्रयोगशाळा व वर्कशॉप
🔸उत्तम निकालाची परंपरा
🔸नामांकित कंपन्यांसोबत सामंजस्य करार
🔸 *100% नोकरीची हमी*
🔸 *OPEN/OBC* प्रवर्गातील विद्यार्थ्‍यांना *50% शासकीय फी सवलत*
🔸 *SC/ST/SBC/NT* प्रवर्गातील विद्यार्थ्यांना संपूर्णपणे *मोफत शिक्षण*
🔸बाहेरगावच्या विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल व मेस सुविधा उपलब्ध

*आजच आपला प्रवेश निश्चित करा…*

भेट द्या –
*यशवंतराव भोसले पॉलिटेक्निक*
*प्रवेश सुविधा व मार्गदर्शन केंद्र*
*चराठे, सावंतवाडी🛣️*
*जि. सिंधुदुर्ग*
*संपर्क -☎️*
*02363273535/273456*
*📱मोबा.9421718850/9130003477*

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!