.. प्रशासनाने गोठवेवाडीतील ४८ घरांची पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा जनआंदोलन करू…सुरेश शिर्के यांचे नायब तहसीलदार यांना निवेदन..
🛑.. प्रशासनाने गोठवेवाडीतील ४८ घरांची पर्यायी व्यवस्था करावी अन्यथा जनआंदोलन करू…सुरेश शिर्के यांचे नायब तहसीलदार यांना निवेदन
🛑शिरशिंगे गोठवेवाडी तील ग्रामस्थांना महसूल प्रशासनाच्या स्थलांतराच्या नोटीसा दिल्याने ग्रामस्थ संतप्त..
🖥️ Kokan Live Breaking News*
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,३० : नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत शिरशिंगे गोठवेवाडी येथील रहिवाशांना प्रशासनाकडून स्थलांतराच्या संदर्भातील नोटिसा देण्यात आल्या आहेत.
यामध्ये नागरिकांनी सुरक्षित स्थळी स्थलांतर न केल्यास नागरिकांचे कोणत्याही स्वरूपाचे नुकसान झाल्यास शासनाकडून आपणास नुकसान भरपाई दिली जाणार नाही अशा प्रकारचा आशय घातल्याने नागरिक संतप्त झाले होते.
डोंगर पावसाळयात खचण्याच्या पार्श्वभूमीवर या वाडीतील ४८ घरांना धोका निर्माण होतो. याबाबत ग्रामस्थांच्या पुनर्वसनाच्या मागणीबाबत गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही कार्यवाही न करता महसूल प्रशासनाने स्थलांतराच्या नोटिसा बजावल्याने गोठवेवाडीवाडीतील संतप्त रहिवाशांनी आज गुरूवारी सकाळी सावंतवाडी तहसिल कार्यालय गाठून याचा जाब विचारला. पावसाळ्याच्या तोंडावर आम्ही जायचे कुठे? आणि या दिवसात आम्हाला निवारा कोण देणार? असा संतप्त सवाल नायब तहसिलदार मनोज मुसळे यांना केला.
भितीदायक डोंगरामुळे आपले पुनर्वसन करण्याची ग्रामस्थांची दोन वर्षांची मागणी आहे. मात्र याबाबत कोणतीही कार्यवाही न करता महसूल प्रशासनाने चक्क स्थलांतराच्या नोटिसा दिल्याने ग्रामस्थांनी सावंतवाडी शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ आणि शिवसेना पदाधिकारी सुरेश शिर्के यांच्या नेतृत्वाखाली सावंतवाडी तहसील कार्यालयाला धडक देऊन स्थलांतराच्या नोटीस बाबत आणि प्रलंबित मागण्यांच्या प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत आपल्या संतप्त भावना मांडल्या. यावेळी रुपेश राऊळ यानीही या ग्रामस्थांना न्याय देण्याची मागणी केली.
यापूर्वी पावसाळ्यात भू उत्खलन होऊन दोन वेळा डोंगर खचल्यानंतर या वाडीचे स्थलांतर करण्यात आले होते.
याबाबत निवेदनाद्वारे पुनर्वसनाबाबत प्रशासनाचे अनेक वेळा लक्ष वेधले परंतु याबाबत कार्यवाहीच होत नाही. त्यामुळे पावसाळा भितीखाली काढण्यापेक्षा आमच्या पर्यायी जागेत स्वेच्छा पुनर्वसन करावे अशी मागणी नायब तहसिलदार मनोज मुसळे यांच्याकडे केली.
यावेळी माजी सरपंच सुरेश शिर्के,प्रशांत कोठावळे, बाळकृष्ण पेडणेकर,जीवन लाड, उत्तम शिर्के, वसंत घावरे, बाळकृष्ण घावरे, शुभम घावरे,यांनी पुनर्वसनाबाबत प्रशासनाच्या उदासीन भूमिकेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.
प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष देऊन नागरिकांचे पुनर्वसन वेळीच न केल्यास गोठवेवाडीतील ग्रामस्थांनी जन आंदोलनाचा इशारा दिला आहे.
________________________
____________________
*▪️प्रवेश मार्गदर्शन सुरू▪️*
*📖१०वी, १२वी, पदवीधर 🧑🏻🎓विद्यार्थी, नोकरदार, व्यावसायिक व महिलांसाठी 👩🏻🎓शिक्षणातील सर्वोच्च संधी…*
*🔳उपलब्ध शिक्षणक्रम:-*
*👉🏻बी. ए.*
*👉🏻बी. कॉम.*
*👉🏻एम. कॉम.*
*👉🏻एम. बी. ए.*
*👉🏻रूग्ण सहायक*
*👉🏻एम.ए. (अर्थशास्त्र)*
*👉🏻एम.ए. (लोक प्रशासन)*
*👉🏻एम.ए. (इंग्लिश)*
*👉🏻एम.ए. (हिंदी)*
*◼️सिंधुदूर्ग जिल्हयातील विद्यापीठ मूल्यांकन ‘A श्रेणी’ प्राप्त अभ्यासकेंद्र🗞️📘*
*🗂️प्रवेश अर्ज व माहितीसाठी संपर्क📱 :-*
*📒यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ📚📖*
*डॉ. जे.बी.नाईक आर्टस् अँड कॉमर्स कॉलेज*
*🏬आरपीडी ज्युनि. कॉलेज कॅम्पस, गेट नं. २ समोर,🛣️*
*सावंतवाडी नगरपालिके जवळ, सावंतवाडी.*
*📲मोबा- 8605992334*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

