“भारत देशाला जर महासत्ता बनवायचे असल्यास प्रत्येक गावाचा सरपंच व ग्रामसेवक हुशार बनायला हवा.”
🟥”भारत देशाला जर महासत्ता बनवायचे असल्यास प्रत्येक गावाचा सरपंच व ग्रामसेवक हुशार बनायला हवा.”
🟥पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरेपाटील यांचा सरपंच व ग्रामसेवक यांना सल्ला व आव्हान
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,२५: “भारत देशाला जर महासत्ता बनवायचे असल्यास गावाचा सरपंच व ग्रामसेवक हुशार बनायला हवा.” असा सल्ला पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरेपाटील यांनी दिला.तसेच त्यांनी , “सरपंच व ग्रामसेवक या दोघांचाही विकासाबाबत ठोस व ठाम विचार असायला हवा.या दोघांनी ग्रामस्थांची कामे प्रामुख्याने करावीत. सरपंच विठ्ठला सारखा व गाव पंढरपूर सारखा असल्यास कोणतेही काम अडणार नाही.” असा विश्वास व्यक्त केला. जिल्हा परिषद सिंधुदुर्ग च्या जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्षा मार्फत स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून स्वच्छ भारत मिशन ग्रामीण व जनजीवन मिशन अंतर्गत आयोजित एक दिवसीय सरपंच व ग्रामसेवक कार्यशाळा या मळगांव येथील भगवती हाॅल मध्ये संपन्न कार्यक्रमात ते कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात बोलत होते.
सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग व कुडाळ या चार तालुक्यातील सरपंच व ग्रामसेवक यांच्या मार्गदर्शनासाठी आयोजित या कार्यक्रमावेळी औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे आदर्श सरपंच भास्करराव पेरेपाटील यांच्या सहीत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य.कार्य.अधिकारी प्रजित नायर, जल जीवन मिशन प्रतिनिधी युनिसेफ मुंबई मंदार साठे, उप मुख्य कार्य. अधिकारी (ग्रामपंचायत विभाग) तनपुरे साहेब, उप मुख्य कार्य अधिकारी (पाणी व स्वच्छता विभाग)
विनायक ठाकूर, गटविकास अधिकारी सावंतवाडी व्ही. एम. नाईक, गट विकास अधिकारी दोडामार्ग बेहेरे साहेब , गट विकास अधिकारी वेंगुर्ले सुतार साहेब, सहाय्यक गट विकास अधिकारी कुडाळ परब साहेब,सहाय्यक गट विकास अधिकारी दोडामार्ग
जाधव साहेब तसेच सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यातील सर्व गावांचे सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
यावेळी आपल्या मिश्किल शैलीतील मार्गदर्शनपर भाषणात पुढे बोलताना पेरेपाटील यांनी उपस्थित सरपंच व ग्रामसेवक यांना सल्ला दिला की, कोणतीही माहिती ऐकीवात आल्यावर त्या माहितीची खात्री केली पाहिजे,गावातील प्रत्येक माणूस किमान १०० वर्षे जगला पाहिजे याचा विचार प्रत्येक सरपंचानी करायला हवा, आपल्या गावातील लोकांना स्वच्छ व भरपूर पाणी मिळावे यासाठी पाण्याची व्यवस्था व नियोजन करायला हवे,शुद्ध हवा मिळावी यासाठी वृक्षारोपण करायला हवे,गावात किमान २० हजार झाडे असावीत यासाठी वृक्षतोड थांबवावी,तसेच ग्रामस्वच्छता रहावी यासाठी गावात शौचालये निर्माण करावीत, खाद्य वस्तू जसे मसाले-तेल-दूध यांची भेसळ टाळाण्यासाठी दक्षता घ्यावी, गावातील प्रश्न गावपातळीवर सोडवावेत, सरपंच हा गावचा प्रमुख असतो व धनादेशावर सही करण्याचा अधिकार जिल्हाधिकारी यांना नसला तरी सरपंचाला असतो, त्यामुळे सरपंचाने चांगले निर्णय घ्यायला हवेत, स्वतः चे नियम ( जीआर)स्वतः तयार करावेत, पुढील सरपंचाना व ग्रामसेवक यांना काम करायला अडचणी येणार नाहीत असे काम करावे, जेवढे अधिकार सरकारला असतात तेवढे अधिकार सरपंचाना असतात त्यामुळे त्या अधिकारांचा योग्य वापर करुन गावाचा विकास करावा,गावातील कोणीही व्यक्ती सबसिडी वर अवलु राहू नये असे काम करावे, आपले गाव समृद्ध करावे, ग्रामपंचायतीचे स्वतः चे उद्योग निर्माण करावेत, गावाच्या विकासाला व नुकसानीला ग्रामसेवक नव्हे तर सरपंचच जबाबदार असतो त्यामुळे ती जबाबदारी चोख पार पाडावी, पाटोदा गावात आपण खत निर्मिती करतानाच धान्य दळण मोफत-तेल मोफत-प्लास्टीक भंगार नियंत्रण व नियोजन, गावात योग्य सिस्टीम अशा सुविधा दिल्या आहेत. गावातील लोकांनी अनधिकृत बांधकामे करु नयेत व त्यांना चांगले बांधकाम करुन मिळावे यासाठी गवंडी नेमले आहेत. गावात नारळ लागवड केली आहे.त्यांना परवाने दिले आहेत. गावात प्रदुषण टाळण्यासाठी वृक्ष लागवड केली आहे. स्मशान भूमी बनविल्या आहेत. इतकेच नव्हे तर ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या वृध्द ग्रामस्थांना मसाज मशीन बसविल्या आहेत. निराधार ग्रामस्थांसाठी जेवण-स्वेटर-चप्पल आदी उपलब्ध करुन दिल्या आहेत. अशी माहिती दिली.
कार्यक्रमाच्या सकाळच्या सत्रातील प्रास्ताविकपर भाषणात विनायक ठाकूर यांनी या कार्यक्रमाची माहिती देताना सरपंच व ग्रामसेवका़ना या कार्यक्रमाच्या माध्यमातून चांगली संधी निर्माण झाली आहे. सरपंचानी गावातील विकास कामांना चालना द्यावी असा सल्ला दिला.तसेच त्यांनी हा केंद्र सरकारचा कार्यक्रम असून प्रत्येक व्यक्तीला किमान 55 लीटर पाणी देण्याचा संकल्प असल्याची माहिती दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मुख्य.कार्य.अधिकारी प्रजित नायर यांनी या कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट करताना गावातील विकास योजनांना चालना देण्यासाठी सरपंच व ग्रामसेवक यांनी पुढाकार घ्यावा. सिंधुदुर्ग जिल्ह्यात माॅडेल गाव निर्माण करण्यासाठी आपला गाव विकसित करण्याचे ध्येय बाळगावे. उपस्थित सर्व सरपंचानी आपला गाव आदर्श बनविण्यासाठी लोकांमध्ये चळवळ निर्माण करावीकरावी, असे आवाहन केले.
युनिसेफ चे प्रतिनिधी मंदार साठे यांनी, जनजीवन मिशन अंतर्गत येत्या तीस वर्षात कुठेही पाणी टंचाई निर्माण होणार नाही याचे नियोजन करण्यात आले असून यासाठी तसे ध्येय बाळगण्यात आले आहे.यासाठी मोठी गुंतवणूक केली जाणार आहे.या मिशनला अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत, असे स्पष्ट करताना जनजीवन मिशनची ओळख करुन देताना प्रत्येक व्यक्तीला पुरेसे शुद्ध पाणी नियमितपणे देण्यासाठी वर्ष 2024 पर्यंत संकल्प पूर्ण केला जाणार असल्याचे स्पष्ट करताना जनजीवन मिशनची ओळख, वेगळेपणा व आवाका, अंतर्भुत घटक, नळपाणी पुरवठा सध्यस्थिती, पाणी पुरवठा नियोजन, ग्रामीण पाणी पुरवठा आव्हाने व उपाययोजना, नियोजन व टप्प्यातील उपक्रम, योजना आराखडे, मंजुऱ्या व कार्यादेश, अंमलबजावणी व टप्प्यातील उपक्रम आदी बाबतची माहिती स्लाईड शोच्या माध्यमातून दिली.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन पदवीधर शिक्षक, शाळा कास नं.1 चे महेश पालव सर यांनी तर आभार प्रदर्शन विनायक ठाकूर यांनी केले. यावेळी सरपंच संघटनेच्या माध्यमातून भास्कर पेरेपाटील यांचे स्वागत व अभिनंदन करण्यात आले. तसेच यावेळी उपस्थित मान्यवर व पत्रकार यांना सुपारीचे रोप भेट म्हणून देण्यात आले. तसेच यावेळी महिला व पुरुष सरपंच प्रतिनिधीनी आपले मनोगत व कार्यक्रमा बद्दल आभार प्रदर्शन केले.
———————————————————–
*🛑राज्यात होणाऱ्या १००० हून अधिक तलाठी भरती व जिल्हा परिषद भरतीच्या जागांसाठी स्पेशल बॅच सुरू करत आहोत🛑*
*⚜️आमची वैशिष्ट्ये⚜️*
1. अनुभवी शिक्षक वर्ग
2. प्रवेश सोबत वाचनालयामध्ये बसण्याची संधी
3. कमी वेळात तलाठी व जिल्हा परिषद भरतीचे परिपूर्ण मार्गदर्शन
*🗣️🗣️प्रवेश सुरु – 22 जून 2022 पासून*
*शेवटची तारीख 👉🏻 – 26 जून 2022 पर्यंत*
*🔰प्रवेश फी फक्त* – 5000
*🛑बॅचचा कालावधी – 3 महिने*
*👬बॅच सुरू – 1 जुलै 2022 पासून*
*⏰लेक्चर्स टाईम संध्याकाळी 4.30 ते 6.30*
*(टीप – आठवड्यातून पाच दिवस लेक्चर्स होतील)*
*🏠आमचा पत्ता🏠* ,
*पहिला मजला , वसंत प्लाझा सिंधुदुर्ग बँक नजीक , राजपुरोहित इलेक्ट्रिकल्सच्या समोर गांधी चौक* *सावंतवाडी – 416510*
📞90226 86944
🪀7350219093
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

