कोकणसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर स्वतःउतरले मैदानात;विनाकारण फिरणाऱ्यांवर सुरु केली कारवाई

सावंतवाडी, दि.११:- कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासन राबवत आहे.याचपार्श्वभूमीवर सायंकाळी ४ नंतर बाजारपेठ पुर्ण बंद झाल्यानंतरही शहरात विनाकारण फिरणारे अनेकजण आढळत आहे त्यामुळे आज सायंकाळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर स्वतःमैदानात उतरले आणि विनाकारण फिरणाऱ्या ची चौकशी करुन कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. बाजारपेठा बंद झाल्यानंतरही कारण नसताना अनेक युवक सुद्धा विनाकारण फिरत आहेत त्यांच्यावरही धडक कारवाई करण्यात आली.यावेळी त्याच्या सोबत वाहतूक पोलिस सखाराम भोई,भुषण भोवर यासह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!