बीसीए पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु
🛑बीसीए पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु
🛑वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिचर्स सावंतवाडी जिल्ह्यातील पहिले महिला संगणक महाविद्यालय
🛑जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी प्रवेश घेण्याचे संतोष सावंत व मीनाक्षी पाटील यांचे आवाहन
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ
🎴सावंतवाडी,११: येथील सेंटर ऑफ एज्युकेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी सावंतवाडी या संस्थेने सन २००९ मध्ये सुरु केलेल्या वुमेन्स कॉलेज ऑफ कॉम्प्युटर स्टडीज अँड रिचर्स सावंतवाडी या जिल्ह्यातील पहिल्या महिला संगणक महाविद्यालयात शिकविला जात असलेल्या बीसीए या पदवी अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. जास्तीत जास्त विद्यार्थिनींनी या अभ्यासक्रमात प्रवेश घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष सावंत, महाविद्यालयाचे प्रभारी मीनाक्षी पाटील यांनी केले आहे.
देश २१ व्या शतकाकडे वाटचाल करत असताना सध्याच्या युगामध्ये संगणकीय शिक्षण घेणे ही गोष्ट जीवनाचा एक अविभाज्य भाग बनली आहे. या क्षेत्राचा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून सेंटर ऑफ एज्युकेशन अॅण्ड टेक्नॉलॉजी सावंतवाडी या संस्थेने हे संगणक महाविद्यालय सुरू केले. या संस्थेने राबविलेल्या उपक्रमामुळे सिंधुदुर्ग व नजीकच्या गोवा राज्यातील विद्यार्थ्यांना याचा बहुमोल फायदा झाला. हे महाविद्यालय उच्चतंत्र शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त व एलएनडीटी महिला विद्यापीठाशी संलग्नित असून या महाविद्यालयांमध्ये बीसीए हा तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम शिकविला जातो. हे महाविद्यालय सुरू होऊन आज बारा वर्षे पूर्ण होत आहेत. आजपर्यंत या महाविद्यालयातून २५० हून अधिक विद्यार्थ्यांनी पदवी संपादन करून आयटी क्षेत्रातील चांगल्या पदावर मुंबई, पुणे, गोवा या ठिकाणी कार्यरत आहेत. बीसीए या पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांना डेटाबेस अ डमिनीस्ट्रेटर, संगणक प्रयोगशाळा सहाय्यक,. तसेच आयटी क्षेत्रातील अनेक कंपन्यांमध्ये कॉम्प्युटर प्रोग्रामर म्हणून संधी उपलब्ध होते. याशिवाय स्वतःचा चा संगणक व्यवसायही करू शकतात. त्याचप्रमाणे बँकिंग क्षेत्र, एलआयसी, सरकारी क्षेत्र अशा अनेक क्षेत्रांमध्ये आपले करिअर घडवू शकते. बीसीए या पदवीनंतरही एमसीए, एमएससी, एमबीए, एलएलबी त्याचप्रमाणे एमपीएससी, यूपीएससी या स्पर्धा परीक्षांमध्ये आपले भविष्य उज्ज्वल करण्याकरिता प्रवेश घेऊ शकतात. या महाविद्यालयात अनुभवी व उच्च विद्याभुषित असा प्राध्यापक वर्ग आहे. त्याचप्रमाणे सुसज्ज वाचनालय, अद्ययावत कॉम्प्युटर लॅबोरेटरी, बॉडब्रॅण्ड इंटरनेट सुविधा, शासनाकडून मागासवर्गीय विद्यार्थिनींकरिता फी व शिष्यवृत्ती सवलत याशिवाय आर्थिकदृष्ट्या मागास विद्यार्थिनींना शैक्षणिक कर्ज सुविधा या सर्व प्रमुख गोष्टींचा अंतर्भाव केलेला आहे.
तरीही सेंटर ऑफ ऍण्ड टेक्नॉलॉजी या संस्थेचे अध्यक्ष संतोष सावंत, महाविद्यालयाचे प्रभारी मीनाक्षी पाटील यांनी बारावी परीक्षेत उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे, तसेच विद्यार्थिनींना बीसीए या पदवी अभ्यासक्रमांकरिता प्रवेश घेण्याकरिता ९३७१८२११२० व ०२३६३२७११२० या नंबरवर महाविद्यालयाच्या कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
________________________
👩🏻महिला वर्गांसाठी स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा आहे चला तर मग लगेच भेट द्या…👩🏻
👇🏻👇🏻👇🏻
*👸🏻Sunita’s Beauty parlour💄🎁🎊*
👸🏻सुनीता ब्युटी पार्लर👸🏻
🟣बेसिकसाठी प्रवेश खुला🟣
*👉🏻केवळ वेळेनुसार मर्यादित जागा..*
👉🏻अधिक माहितीसाठी खालील नंबर वर संपर्क करा
👇🏻👇🏻
*🔶आमचा पत्ता🔶* डी.एस-०३.पाटेश्वर, कॉम्प्लेक्स सालईवाडा सावंतवाडी
*🛑📱संपर्क📞🛑*
*▪️सुनिता:📱9422381516*
*📱7768894667*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*