अखंड राहो सौभाग्याचे लेणं सावित्रीनच वटवृक्षा कडे मागणं
🟥 अखंड राहो सौभाग्याचे लेणं सावित्रीनच वटवृक्षा कडे मागणं
🟥सावंतवाडीत वटपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न..
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,१४: हिंदू धर्मात वटपौर्णिमेला फारच महत्व आहे. आज सगळीकडेच वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. वट वृक्षाला ब्रम्हा, विष्णु, महेशाचं रुप मानलं जातं. अशी आख्यायिका आहे की, वटवृक्षाची पूजा केल्याने त्यांच्या पतीची रक्षा केली जाते.वटवृक्षाच्या फांद्यांना आणि पारंब्यांना सावित्रीचं रुप मानलं जातं. कारण देवी सावित्रीने तपस्या करुन पती सत्यवानाचे प्राण यमाकडून परत आणला होता, अशी आख्यायिका आहे.
येथील एक मुखी दत्त मंदिर परिसरामध्ये राहणारे नानिवडेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी हा वटवृक्ष पाच वर्षापर्यंत आपल्या घरी कुंडीमध्ये लावून त्याच्यावर विधीवत संस्कार केले होते. हा वटवृक्ष जसजसा मोठा घेऊ लागल्याने नानिवडेकर यांनी माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्याशी संपर्क साधून हा वटवृक्ष एका चांगल्या ठिकाणी लावण्यासाठी त्यांनी जागेची मागणी केली होती.त्यानंतर आठ वर्षांपूर्वी हा वटवृक्ष तत्कालीन माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर तसेच बांधकाम चे माजी एक्झिक्युटिव्ह ऑफिसर प्रदीप जोशी व तात्कालीन नगरसेवकांच्या उपस्थिती मध्ये मोती तलावाच्या काठी म्हणजे वटसावित्री मंदिर परिसरामध्ये हा वटवृक्ष लावला. आज हा वटवृक्ष मोती तलावाच्या काठी बहरला आहे.आणि आज अशाच पद्धतीने वटपौर्णिमेच्या दर वर्षी असंख्य सुहासिनी महिला या वटवृक्षाला फेर्या घालून आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी पारंपारिक पद्धतीने वटवृक्षाला प्रदक्षणा घालतात व त्या वटवृक्षाची पूजा करतात.
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

