कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

गोव्यात धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी

  • *🟥.गोव्यात धर्मांतर बंदी कायदा करण्यासाठी तातडीने पावले उचलण्याची मागणी !*_

*🟥राष्ट्रीय स्तरावर धर्मांतर रोखण्यासाठी कायद्यासह घटना दुरुस्तीची आवश्यकता !*

*_🎥 Kokan Live Breaking News_*

*✍🏻 ब्यूरो न्यूज : कोकण लाईव्ह*

*🎴सिंधुदुर्ग-दि१४जून*
आज देशामध्ये दर वर्षी हिंदूंचे लाखोंच्या संख्येने धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन तथा मुसलमान बनवले जात आहे. अनेक राज्यांत धर्मांतरविरोधी कायदा असला, तरी राजरोसपणे मोठ्या प्रमाणावर हिंदूंचे धर्मांतर करून भारताला तोडण्याचे षड्यंत्र चालू आहे. धर्मांतराची समस्या देशव्यापी असल्याने राज्यघटनेतील कलम 25 मध्ये सुधारणा करून त्यातील धर्माचा प्रचार करणे (Propagate Religion) हा शब्द काढला पाहिजे. त्यासोबत गोवा सरकारने विधानसभेत या संबंधीचा ठराव पारित करून केंद्रशासनाला पाठवला पाहिजे. तरच अवैध धर्मांतरणावरती संपूर्ण बंदी येईल. स्वत:च्या धर्माचे पालन करण्याला कोणतीही आडकाठी आणण्याची आवश्यकता नाही; मात्र इतरांना फसवून, जबरदस्ती करून किंवा त्यांच्या असाहाय्यतेचा अपलाभ घेऊन केल्या जाणार्‍या धर्मांतरावर प्रतिबंध लावण्याची आवश्यकता आहे, अशी मागणी *सीबीआयचे माजी हंगामी संचालक श्री. एम्. नागेश्वर राव यांनी पत्रकार परिषदेत* केली.
ते दशम ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या तृतीय दिनी फोंडा, गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थाना’तील विद्याधिराज सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. या वेळी व्यासपीठावर हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, ख्रिस्ती पंथ सोडून हिंदु झालेल्या तेलंगणा येथील श्रीमती एस्थर धनराज, छत्तीसगड येथे लाखो हिंदूंची घरवापसी करणारे भाजपचे प्रदेशमंत्री श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव आणि नेपाळ येथील विश्व हिंदु महासंघचे जिल्हाध्यक्ष श्री. शंकर खरेल उपस्थित होते.

या वेळी *समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) पिंगळे* म्हणाले की, धर्मांतर रोखण्यासाठी हिंदूंमध्ये धर्मजागृती करून त्यांना धर्मशिक्षण दिले पाहिजे. धर्मशिक्षण घेऊन धर्माचरण प्रारंभ केल्यास कोणीही धर्मांतर करू शकणार नाही. गोव्याचे मुख्यमंत्री श्री. प्रमोद सावंत यांनी धर्मांतर बंदी कायदा करण्याची घोषणा केली आहे. त्याचे आम्ही स्वागत करतो. तसेच गोव्यात डॉमनीक आणि अन्य ख्रिस्ती प्रचारकांकडून जे धर्मांतर चालू आहे, ते रोखण्यासाठी गोव्यात धर्मांतरविरोधी कायदा करण्यासह संविधानात पालट करायला हवा. *छत्तीसगड येथील भाजपचे प्रदेशमंत्री श्री. प्रबल प्रतापसिंह जुदेव* म्हणाले की, हिंदूंच्या धर्मांतर करणार्‍या विदेश शक्तींकडे प्रचंड पैसा आणि साधने आहेत. माझ्या वडीलांनी लाखो हिंदूंची, तर मी 15 हजार हिंदूंची घरवापसी केली आहे; मात्र हे करतांना आमच्यावर जीवघेणी आक्रमणे मिशनरी, नक्षलवादी यांच्याकडून झालेली आहेत. धर्मांतर रोखण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये धर्म समिती स्थापन करून धर्मसेना उभी केली पाहिजे. त्याने चांगला लाभ झालेला आहे. *नेपाळ येथील श्री. शंकर खरेल* म्हणाले की, नेपाळमध्ये 3 कोटी लोकसंख्येच्या देशात 30 लाख लोक धर्मांतरीत झाले आहेत. ही चिंतेची बाब आहे. हे धर्मांतर रोखण्यासाठी गरीबी, शिक्षण आणि अन्य मूलभूत गोष्टींवर काम करण्याची आवश्यकता आहे. *तेलंगणा येथील एस्थर धनराज* म्हणाल्या की, मी स्वत: ख्रिश्चन होते; मात्र अमेरिकेत गेल्यावर बायबलचा अभ्यास केल्यावर त्यात तर्कशास्त्र नसल्याचे लक्षात आले. पुढे भारतात आल्यावर मिशनरी लोकांकडून धर्मांतरासाठी चाललेली षड्यंत्रे पाहून त्याविरोधात जागृती चालू आहे. तसेच धर्मांतरीत हिंदूंना पुन्हा हिंदु धर्मांत आणण्याचे आणि युवकांना समुपदेशन करण्याचे काम करत आहे.

 

 

*_सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*
👇🏻👇🏻👇🏻

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!