आपत्कालीनकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

वाफोलीत डंपर पलटी होऊन अपघात..

🟥वाफोलीत डंपर पलटी होऊन अपघात..

🟥.. या अपघातात चालक रवी वालावलकर जखमी.. सुदैवाने कोणतीही जीवित हानी नाही.

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा,८जुन: बांदा-दाणोली रस्त्यावर वाफोली धरणानजीक डस्ट वाहतूक करणारा डंपर रस्त्याच्या खाली पलटी होऊन अपघातग्रस्त झाला. या अपघातात चालक रवी वालावलकर (रा. आकेरी) हा जखमी झाला. याठिकाणी पुलाचे काम सुरु असून पावसात मातीचा भराव वाहून गेल्याने हा अपघात झाल्याचा आरोप करत स्थानिकांनी ठेकेदाराला धारेवर धरले. अखेर मातीचा भराव तत्काळ काढण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले. बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरु होते.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वाफोली धरणानजीक नळपाणी योजनेच्या शेजारी मुख्य रस्त्यावर पुलाचे काम सुरु आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ठेकेदाराने मातीचा भराव टाकल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. बुधवारी सायंकाळी पाऊस पडल्याने भरावाची सर्व माती रस्त्यावर आली. त्यामुळे रस्ता पूर्णपणे निसरडा बनला होता. बांद्यातून वाफोलीच्या दिशेने जाणारा डम्पर घसरल्याने रस्त्याच्या खाली पलटी झाला. यामध्ये चालक जखमी झाला. त्याला उपचारासाठी सावंतवाडी येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भर पावसात मातीचा भराव टाकण्यात आल्याने स्थानिक संतप्त झाले. विनेश गवस,मंगलदास गवस,रुपेश गवस,मंथन गवस,सुशील गवस,प्रदीप आयकर, विलवडे सरपंच दिनेश दळवी, वाफोली, विलवडे ग्रामस्थांनी व स्थानिकांनी ठेकेदाराला घेराव घालत जाब विचारला. त्यावेळी तत्काळ भराव काढण्याचे आश्वासन ठेकेदाराने दिले.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!