तहसीलदार राजाराम म्हात्रे सहीत अव्वल कारकून श्रीमती एम.एम.पटवर्धन सुद्धा चौकशीत दोषी..
🟥 तहसीलदार राजाराम म्हात्रे सहीत अव्वल कारकून श्रीमती एम एम पटवर्धन सुद्धा चौकशीत दोषी..
🟥 जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी केलेल्या कारवाई निर्णयाचे जिल्हाभरातून स्वागत
🎥 Kokan Live Breaking News
✍🏻 कार्यकारी संपादक :आनंद धोंड
🎴सावंतवाडी,१जुन: आपल्या अधिकाराचा गैरवापर करीत कुळ सर्वसामान्य भूधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी सावंतवाडी तहसीलदार राजाराम म्हात्रे हे त्रिसदस्यीय समितीने केलेल्या चौकशीमध्ये पूर्णपणे दोषी आढळल्याने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी राज्य अप्पर महसूल सचिवांकडे पाठवला आहे. तसेच म्हात्रे यांच्या कारभाराची विभागीय चौकशी करण्याचे आदेशही के मंजुलक्ष्मी यांनी दिल्याने महसूल वर्तुळात खळबळ उडाली आहे.
तसेच वरीष्ठ लिपीक सौ पटवर्धन यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याही खातेनिहाय चौकशीचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी याही पुढे जात म्हात्रे यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्वच्या सर्व कुळवहीवाट दावे रद्द करण्याचे आदेश दिले आहेत, तर कुळ वहिवाटीच्या अव्वल कारकून एम. एम.श्रीमती पटवर्धन यादेखील चौकशीमध्ये दोषी आढळल्याने त्यांची मुख्यालयातील भूसंपादन विभागात बदली करण्यात आली आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्या कारवाईच्या आदेशाचे सर्व स्थरातून स्वागत होत आहे , दरम्यान, या प्रकरणाची व्याप्ती पाहता जिल्हाधिकारी के मंजुलक्ष्मी यांनी केलेली कारवाई आणि दिलेल्या आदेशाचे जिल्हाभरातून स्वागत होत आहे. आदेशामुळे महसूल खात्यावरचा विश्वास दृढ होण्यास निश्चितपणे मदत होणार आहे. तसेच यापुढे शासकीय स्तरावर सर्वसामान्यांची फसवणूक व पिळवणूक करण्याचे धाडस सहजासहजी करणार नाही, अशी अपेक्षा आहे.
– ॲड. विक्रम भांगले , या फसवणूक प्रकरणाला सर्वप्रथम वाचा फोडणारे तसेच ही घोर
फसवणूक निदर्शनास आणणारे, त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडे आपल्या अशिलाच्या माध्यमांतून थेट तक्रार नोंदवणारे अॅड. विक्रम भांगले यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या आदेशाचे व कारवाईचे स्वागत केले आहे. म्हात्रे यांच्या कार्यकाळातील सर्वच प्रकरणांच्या फेरचौकशीच्या दिलेल्या आदेशामुळे फसवणूक झालेल्या सर्वांनाच न्याय मिळेल. त्यामुळे हा निर्णय ऐतिहासिक असल्याचे ते म्हणाले. ही फसवणूक करोडो रुपयांची असल्याने, त्याविरुद्ध कारवाई करताना महसूल विभागावर दबाव येणं साहजिकच होतं. परंतु कोणत्याही दबावाला भिक न घालता जिल्हाधिकाऱ्यांनी जी कारवाईची भूमिका घेतली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचा महसूल यंत्रणेवरील विश्वास निश्चितपणे वाढणार आहे, असे ते म्हणाले. अखेर सत्याचाच विजय झाला. कायद्यापुढे सर्व समान आहेत हे या प्रकरणावरून दिसून आल्याचे ते म्हणाले.
_________________________
*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*
*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*
*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*
*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*
*♦संपादक : सीताराम गावडे*
*📱संपर्क : +919423304856*
*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*
*📱संपर्क : +919423958828*
*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*
*📱संपर्क : +919405475712*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

