विद्युत वितरण कंपनीने शहरातील विजेच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात..
🟥विद्युत वितरण कंपनीने शहरातील विजेच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात..
🟥..अन्यथा उद्रेक झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार.. माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी,२जुन: वीज वितरणचा सावळागोंधळ सुरू आहे. त्यामुळे त्यात बदल करून ग्राहकांना सेवा द्यावी अन्यथा वीज वितरण कंपनी विरोधात आंदोलन छेडावे लागेल असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी दिला. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर वीज वितरण कंपनीने वीज वितरण सुरळीत व सुरक्षित होईल अशी तजवीज करावी असे आवाहन त्यांनी केले.
विद्युत वितरण कंपनीने शहरातील विजेच्या समस्या तात्काळ सोडवाव्यात, अन्यथा उद्रेक झाल्यास त्याला सर्वस्वी संबंधित अधिकारी जबाबदार राहतील, असा इशारा माजी नगराध्यक्ष बबन साळगावकर यांनी विद्युत वितरणचे अभियंता संदीप भुरे यांना दिला. शहरात वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दुर्लक्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्याला वेळीच आळा घालण्यात यावा, अन्यथा मागच्या आंदोलना सारखी परिस्थिती या ठिकाणी पुन्हा उद्भवेल, असेही त्यांनी यावेळी सांगितले. शहरात सुरू असलेले अनिमित भारनियमन आणि विविध समस्यांवर आवाज उठवण्यासाठी श्री. साळगावकर यांच्यासह माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आज येथील विद्युत वितरणच्या कार्यालयाला धडक दिली.
यावेळी माजी उपनगराध्यक्ष अन्नपूर्णा कोरगावकर, माजी नगरसेवक विलास जाधव, अफरोज राजगुरू, सुरेश भोगटे, उमेश कोरगावकर, उमाकांत वारंग, शुभांगी सुकी, इफ्तिकार राजगुरू आदी उपस्थित होते.
यावेळी श्री. साळगावकर म्हणाले, गेले दोन-तीन महिने शहरात अनियमित भारनियमन सुरू आहे. त्याचा फटका व्यावसायिकांसह नागरिकांना बसत आहे. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे विद्युत उपकरणे निकामी होत आहेत. तर यावर आवाज उठविणाऱ्या नागरिक वर सुद्धा गुन्हे दाखल करून विज वितरणचे अधिकारी कर्मचारी मुजोरी करत आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाल्यास आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. तर शहरात अनेक ठिकाणी विद्युत उतारावर झाडी वाढली आहे. मात्र ती हटविण्याची कोणतीही कार्यवाही संबंधित प्रशासनाने केलेली. पावसाळ्यात झाडांच्या फांद्या विद्युत तारांवर तुटून पडल्यानंतर पुरवठा खंडित होऊन त्याचा नाहक त्रास नागरिकांना सोसावा लागणार आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी झाडी हटवा, अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी बबन साळगावकर, उमेश कोरगावकर, विलास जाधव, सुरेश भोगटे, उमाकांत वारंग यांनी शहरातील वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याबाबत नाराजी आहे. ते सुरक्षित सेवा देत नाहीत. प्रभागातील वीज समस्या आहेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करावा असे त्यांनी सांगितले ते म्हणाले, मागे विज वितरण खंडीत झाल्यानंतर लोक हैराण झाले त्यामुळे आंदोलन झाले. आंदोलनप्रकरणी फौजदारी कारवाई करण्यात आली आहे त्या केसेस मागे घ्या. नागरिकांच्या समस्यांवर आवाज उठवला जाईल. केसीसना घाबरून आंदोलन थांबणार नाही. बबन साळगावकर म्हणाले, शहरात वीज वितरण कंपनीने मेंटेनन्स राखावा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर झाडे तोडून वीज वितरण सुरळीत करावे. शहरातील ग्राहकांना वीज सेवा देताना सावळागोंधळ झाला तर गप्प बसणार नाही.
———————————————
*😊खुशखबर! खुशखबर! खुशखबर!😊*
*▪️Admission Open !! Admisision Open !! 2022-23 (STD 6 to 9 & XI Sci.)▪️*
🏢 “ An Award Winning School ”👮🏻♂️👮🏻♀️
“Government Recognised Residential English Medium School”
Integrated Aprroach to Education for Overall Development of Student Emphasis On Physical Fitness, Knowledge Enhancement & Character Development for Imbibing Leadership Values.
*📖🖊️महाराष्ट्रातील एका नामवंत सैनिक शाळेत प्रवेश घेऊ इ्छिणाऱ्यां पालकांसाठी खुशखबर!*
Sindhudurg District Ex Servicemen Association, Sawantwadi 🛣️ *संचलित सिंधुदुर्ग सैनिक स्कूल, आंबोली ता. सावंतवाडी जि.सिंधुदुर्ग या इंग्रजी माध्यमाच्या निवासी 🏬शाळेत इ.६वी च्या वर्गासाठी एकूण ४५जागा व इ.७वी ते ११ वी (विज्ञान) मधील काही रिक्त जागांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.*
यासाठी ची प्रवेश परीक्षा खालील दिवशी घेण्यात येणार आहे.
*▪️दिनांक-* २९ मे व ०५ जून २०२२
*▪️ठिकाण-* सिंधुदुर्ग सैनिक स्कूल,आंबोली
*⏰वेळ -* सकाळी ठीक ११वा.
*🔴आमची वैशिष्ट्ये🔴*
*👉🏻आदर्श गुरुकुल पद्धतीचे निवासी सैनिकी शिक्षण*
👉🏻सुरक्षित निसर्गरम्य शालेय परिसर,भव्य क्रिडांगण
*👉🏻आधुनिक व सुसज्ज प्रयोगशाळा, संगणक कक्ष ,ग्रंथालय🏠*
*👉🏻उच्चशिक्षित अनुभवी 👨🏻🎓👩🏻🎓शिक्षक व प्रशिक्षक, दर्जेदार शिक्षण🖥️📚📖
*👉🏻निवासी वैद्यकीय अधिकारी सुविधा🏘️🏨*
👮🏻♂️👮🏻♀️NCC Junior Division👮🏻♂️👮🏻♀️
*🔖करियर मार्गदर्शन, सैन्यदल प्रवेश परीक्षा, NDA, JEE, NEET, MHT-CET इ.स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन*
🔴प्रवेश परीक्षा नोंदणीसाठी अथवा अधिक माहितीसाठी खालील नंबरवर संपर्क करा..
👇🏻👇🏻👇🏻👇🏻
*▪️दीपक राऊळ:📱* 9423304518
*▪️राजेंद्र गावडे:📱* 9403366229
*▪️संतोष गावडे:📱* 9423250065
*अथवा*
www.sindhudurgsainikschool.com या वेबसाईटला visit करा.
*👉दि. २९ मे व ०५ जून रोजी परिक्षेला उपस्थित राहणे शक्य नसलेल्या पण प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना सिंधुदुर्ग सैनिक स्कुल, आंबोली येथे येऊन प्रवेश परीक्षा दयावी लागेल…धन्यवाद !!!*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_