देवगड मधील भाजपा कार्यकर्त्यांचा उद्या शिवसेनेत जाहीर प्रवेश; शिवसेना नेते संदेश पारकर
▪️शेकडो कार्यकर्ते शिवबंधन बांधणार असल्याची पारकर यांची माहिती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.२९: देवगड तालुक्यातील सात ते आठ गावातील भाजपाचे शेकडो कार्यकर्ते उद्या शुक्रवार दि. ३० ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता कुणकेश्वर सडा येथील वैजयंती व्हीला येथे शिवसेनेत जाहिर पक्षप्रवेश करणार आहेत. दरम्यान शेकडो कार्यकर्ते शिवबंधन बांधणार असल्याची माहिती शिवसेना नेते संदेश पारकर यांनी दिली.
खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँके अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते अतुल रावराणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. यावेळी देवगड संपर्कप्रमुख राजु फाटक, सतिश मोतलींग, उपजिल्हाप्रमुख विलास साळसकर, तालुकाप्रमुख मिलींद साटम आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
देवगड तालुक्यातील मुनगे, हिंदळे, मिठमुंबरी, कुणकेश्वर, तांबळडेग, कातवण गावातील कार्यकर्ते तसेच रापण संघाचे सदस्य आदींचा हा भव्य प्रवेश सोहळा होणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडी सरकारच्या कामकाज पद्धतीवर विश्वास ठेऊन हे कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहणार असल्याचे संदेश पारकर यांनी सांगितले.
_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

