जानवलीत बॉक्सवेल मंजुरीसाठीच्या ग्रामस्थांच्या लाक्षणिक उपोषणस्थळी शिवसेना नेते संदेश पारकर यांची भेट..
▪️खासदार विनायक राऊत यांना फोनवरून दिली उपोषणकर्त्यांच्या मागण्यांची माहिती..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली,दि.०३: राष्ट्रीय महामार्ग क्र.६६ वर जानवली येथे बॉक्सवेल मंजुर होऊन मिळणेसाठी जानवली ग्रामस्थांनी केलेल्या लाक्षणिक उपोषणस्थळी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसोबत भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली. तसेच श्री.संदेश पारकर यांनी त्वरीत खासदार विनायक राऊत यांच्याशी फोनवरुन संपर्क साधुन उपोषण संदर्भातील मागण्यांची माहिती दिली.
यावेळी श्री.पारकर यांच्यासोबत उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, अँड. हर्षद गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.
जानवली ग्रामस्थांनी मागण्यांच्या निवेदनात म्हटले आहे की, सध्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. सदर रस्ता जानवली च्या हद्दीतून जात असून (१) केंद्रशाळा मारुती मंदिर हे रस्त्याच्या पलिकडे आहे. सदर शाळेत आमचे (शाळेतील मुलांची पटसंख्या १०० च्या वर असून रस्त्याच्या पलिकडून येणाऱ्या मुलांची संख्या ५० ते ६० एवढी आहे बालवाडी ते सातवी पर्यंत) शिवाय ग्रामस्थांनाही जावे लागते. (२) बाल शिवाजी मंदिर स्कूल या दोन्ही शाळेच्या मुलांना बॉक्स वेल मुळे ये-जा करणे शक्य होणार आहे. (३) मशानभुमी होडी साना येथे आहे. (४) एस.टी.च्या दररोज आठ फेऱ्या होतात. (५) जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पशुसंवर्धन दवाखाना आहे. (६) जिल्हा कृत्रिम रेतन केंद्र पशुसंवर्धन दवाखान्यात शेतकऱ्यांच्या जनावरांना ने-आण करणे सोयीचे होईल. (७) ग्रामपंचायत कार्यालय, रेशनिंग दुकान, तलाठी कार्यालय आहे. (८) नियोजित होडीचे सांना या नदीवर फूटब्रिज होणार आहे. त्यामुळे कणकवली शहराकडे जाण्याचा मार्ग होणार आहे. (९) जानवली ग्रामदैवत वार्षिक जत्रोत्सव होळीचा सण येथे असलेल्या ब्राह्मणदेव भेटीसाठी जाण्याचा मार्ग आहे.
यासाठी रेसिडेंट इंजिनियर महेश उटके यांना ग्रामस्थांच्या समवेत बैठक घेऊन जानवली गट क्रमांक ७५५ व ७५६ येथे बॉक्स वेल साठी जागा निश्चित करावी, अशी विनंती केली होती. मात्र, त्यांनी आश्वासन देऊन काहीच कार्यवाही केलेली नाही.
त्यानंतर दिनांक ५ फेब्रुवारी २०२० रोजी सर्व ग्रामस्थांनी काम बंद आंदोलन केले. त्यावेळी पोलीस खात्याचे अधिकारी त्याठिकाणी बॉक्स वेलची गरज असल्याचे स्पष्ट केले. दिनांक ६ फेब्रुवारी २०२० रोजी कणकवली उपविभागीय अधिकारी यांच्या संदर्भ २० फेब्रुवारी २०२० च्या नोटीस मधील संदर्भ क्रमांक १ चे पत्र देण्यात आले. सदर पत्र व त्यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी संदर्भ २० फेब्रुवारी २०२० रोजी च्या नोटीस मधील क्रमांक २ च्या अन्वये कार्यवाहीचे निर्देश दिले. परंतु राष्ट्रीय महामार्ग कार्यकारी अभियंता यांनी अद्याप कोणतीही कार्यवाही केलेली नाही.
सदर ठिकाणी जानवली, साकेडी मार्गे फोंडा तिठा चॅनेल नंबर २३६/ ९०० येथे बॉक्स वेल न झाल्यास शासनाचा व प्रशासनाचा लक्ष वेधण्यासाठी दिनांक ३ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत सर्वश्री शिवराम राणे, अमोल राणे, संतोष सावंत, दामोदर सावंत आदी ग्रामस्थ कोविड-१९ चे नियम व अटी शर्तींचे पालन करून कायद्याचे उल्लंघन न करता लोकशाहीच्या माध्यमातून लक्षणीय उपोषण करणार आहोत. यासाठी सहकार्य करावे. असे जानवली ग्रामस्थांनी निवेदनात नमूद केले आहे.
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*
*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*
*💫आमची वैशिष्ट्ये:*
*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻♂️मळगाव रेल्वे स्टेशन(टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड किमी..अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*
*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938
*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/HKNbObeMG6u2NeWl0XWuM4
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_