अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी पटाची कहाणी..
▪️कणकवली बेळणे पुलाच्या जवळील आरपार बागेतील पट रात्रौ दहा वाजताच गुंडाळला..
▪️कोकण लाईव्ह च्या दणक्याने पोलीस यंत्रणा झाली खडबडून जागी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 विशेष प्रतिनिधी
🎴कणकवली,दि.२९: ‘भातुकलीच्या खेळामधली राजा आणिक राणी अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी’ या ओळींची आठवण कणकवली येथील बेळणे पूलापासून अर्धा किलोमीटर अंतर असलेल्या आर-पार च्या बागेतील रात्रीच्या चाललेल्या जुगाराच्या प्रसंगातून आली, कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने या जुगाराची पोलखोल करताच काही झाले तरी जुगार सुरू ठेवायचा असा आदेश देणारे अधिकाऱ्यांना जुगार गुंडाळण्याचा फोन करावा लागला. रात्री पावणे दहा वाजता जुगार बंद करून पट चालक पसार झालेत.
कणकवली बेळणे पूलापासून अर्धा किलोमीटर अंतरावर आर पारांच्या बागेत संध्याकाळी सात ते पहाटे चार पर्यंत तीन पत्ती जुगार चालतो व या अंदर बहार जुगारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. जवळपास शंभरच्या वर खेळी त्या ठिकाणी उपस्थित असतात. गोवा-सिंधुदुर्गातील धन्याठ्य व्यक्ती या तीन पत्ती जुगारासाठी खास कणकवली जातात. याबाबतचे वृत्त कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ने काल संध्याकाळी सात वाजता जुगाराच्या जागेसहित प्रसिद्ध करताच पोलिस यंत्रणा खडबडून जागी झाली.
ज्या अधिकाऱ्याने कोणीही बातमी छापली तरी आम्ही फोन केल्याशिवाय तीन पत्ती जुगार बंद करायचा नाही. असे सांगितले होते. त्याच अधिकाऱ्याला रात्रौ पावणे दहा वाजता जुगार गुंडाळा पुढे काही घडले तर त्याला आपण जबाबदार, आम्ही नाही. असा फोन करावा लागला व अर्ध्यावरती डाव मोडला.
हा तीन पत्ती जुगार खेळताना जुगार चालकांची तक्षीम काढली जाते. २० पैसे अ ग्रुप, ३० पैसे ब ग्रुप, २० पैसे एम ग्रुप, २० पैसे पी ग्रुप व बाकीच्या सर्वांसाठी ६० पैसे असे पस्तीस लोक मिळून हा तीन पत्ती जुगार चालू होता.
पावणे दहा वाजता एम ग्रुप ने जेवणाची व्यवस्था केली. चिकन-मटण बिर्याणी यावर ताव मारण्याचे काम सुरू असताना एका वरिष्ठ अधिकार्याचा फोन या पट चालकाला आला व जुगार बंद करण्याचे आदेश दिलेत. सुरु असलेल्या डाव अर्ध्यावर मोडून जेवण आणलेले तसेच टाकून या प़ंटराना लोकांना पळ काढावा लागला. काही झाले तरी तुम्ही जुगार चालू ठेवा. असे संबंधित अधिकाऱ्यांनी जुगार चालकांना सांगितले होते.
काल संध्याकाळी सात वाजता पट सुरू झाल्यावर दीड लाख रुपये जमा झालेत. त्यात बाहेरचे ५०,००० व आतील १००,००० असे पैसे बाजूला करण्यात आले. बाहेरचे पन्नास हजार म्हणजे हा हप्ता.. एका दिवसाचा ५०,००० हप्ता असेल तर महिन्याला किती म्हणजे महिन्याकाठी विविध लोकांचे भागविण्यासाठी दीड कोटी रुपये हप्ता दिला जातो. एवढी मोठी उलाढाल हप्त्याची होत असेल तर पट चालक किती कोटी उलाढाल करत असेल याचा हिशोब लागणे अशक्य आहे. एवढा मोठा हप्ता मिळत असल्यानेच तुम्ही काहीही करा आम्ही तुम्हाला सांभाळून घेतो. अशाप्रकारची वचने दिली. काल जुगार गुंडाळताना उद्या पुन्हा सर्व भेटू असे आश्वासन पी ग्रुप ने पंटरांना दिले व सर्वजण मार्गस्थ झालेत. मात्र, सगळ्यांच्या तोंडी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल ची चर्चा होती.
_*🛵😍टु-व्हिलर घ्यायची आहे कशाला चिंता???ग्राहकांचा विश्वास जिंकलेल्या टीव्हीएस कंपनीची दुचाकी खरेदी करा..🛵😍*_
*♦️आमच्या लोकप्रिय टीव्हीएस ज्युपिटर गाडीची वैशिष्ट्ये:-*
*▪️टेलिस्कोपिक सस्पेंशन*
*▪️सिंक ब्रेकिंग टेक्नोलॉजी*
*▪️12″ ट्युबलेस टायर विथ ॲलोय व्हील्स*
*💡LED हेड लॅम्प*
*🔌📱2L ग्लोव्ह बॉक्ससोबत फ्रंट मोबाइल चार्जर*
*▪️लार्ज लेग स्पेस*
*⏲️डिजिटल स्पीडोमीटर*
*🧑🦼आरामदायक सीट*
*🛵मजबूत मेटल बॉडी*
*▪️21L चा मोठा युटिलिटी बॉक्स*
*🔮बुट लॅम्प*
*🚨LED टेल लॅम्प*
*⛽ 6L चा फ्युएल टॅंक बाहेरून इंधन भरण्याची सुविधा*
*🖐️5 वर्षांची इंजिन वॉरंटी*
*⛽ ETFI टेक्नोलॉजी मूळे 15% जास्त माइलेज.*
*💸 फायनान्स सुविधा उपलब्ध*
*🔁 एक्सचेंज सुविधा उपलब्ध.*
*😍🛵चला तर मग वाट कसली पाहतायआपली मनपसंत टिव्हीएस दुचाकी खरेदी करून सामील व्हा टिव्हीएस च्या आनंदी कुटुंबात…🏍️🏍️*
*🏢 संपर्क :*
*नेक्स्ट ड्राईव्ह टीव्हीएस शोरुम कुडाळ*
*📱9623440050*
*🛑 कणकवली : 7517590050*
*🛑 देवगड : 9403051451*
*🛑 मालवण : 9823781206*
*🛑 वेंगुर्ले : 9404803765*
*🛑 सावंतवाडी : 9421148555*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

