करियरशैक्षणिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

आॉनलाईन पाककला स्पर्धेत मुगाचे सॅलेड सर्वोत्तम..

▪️बांदा केंद्र शाळेच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी आयोजित स्पर्धेचा निकाल जाहीर..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : अंकुश नाईक

🎴बांदा,दि.२९: मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्या तरी बांदा नं.१ केंद्र शाळेत सहशालेय उपक्रमांचे आँनलाईन आयोजन करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या कृती शिलतेला वाव देण्यासाठी अनेक स्पर्धात्मक उपक्रम राबविण्यात येत आहेत. दरवर्षी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच शाळांमधून मोठ्याने साजरा होणारा शारदोत्सव यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांमधून साधेपणाने साजरा करण्यात आला या शारदोत्सवदिवशी शाळांमधून मुलांसाठी अनेक उपक्रमाचे आयोजन करण्यात येत असायचे चालूवर्षी शाळा बंद असल्याने बांदा केंद्रशाळेच्या वतीने विद्यार्थी व पालकांसाठी घरातूनच मूग या कडधान्यासून पाककृती बनवायची स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये पालकांनी मुगापासून पदार्थ बनविले तर या बनविलेल्या पदार्थाचे सादरीकरण विद्यार्थ्यांनी आॉनलाईन सादरीकरण केले. दरम्यान या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून विजेत्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत.

सर्वोत्तम-दीप प्रशांत गोसावी (मुगाचे सॅलेड) प्रथम-सानवी शैलेश महाजन (मुलाचा हेल्दी डोसा) द्वितीय क्रमांक-किमया संतोष परब (मुगाचे वडे) तृतीय क्रमांक-(विभागून) धीरज सतिश पटेल (मुगाचे आप्पे) व दुर्वा दत्ताराम नाटेकर (मुगाचे डोसे) चतुर्थ क्रमांक-(विभागून)  नैतिक निलेश मोरजकर (मुगाचे पौष्टिक आप्पे) व पांडुरंग सदाशिव सावंत (मुगाचे डोसे) पाचवा क्रमांक (विभागून)-मानसी हनुमंत सावंत (मुगाची तिखट खिचडी) व भिकाजी राजेंद्र देसाई (मुगाची गोड उसळ) अशी विजेत्यांची नावे आहेत.

या स्पर्धेचे परीक्षक तेजा ताटे उपशिक्षिका सासोली नं.१ ता. दोडामार्ग, मेदिनी सावईकर उपशिक्षिका आंबडगाव नं. १ ता.दोडामार्ग, भावना सबनीस उपशिक्षिका चाटे नं. २ प्रियंका केंबळकर पाटील (आहारतज्ज्ञ) कोल्हापूर यांनी केले .

या स्पर्धेची  संकल्पना उपशिक्षक श्री. जे.डी पाटील यांनी राबविली, या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सरोज नाईक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निलेश मोरजकर, बांदा सरपंच अक्रम खान यांनी कौतुक व अभिनंदन केले आहे.

_*😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’..*_

     *🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_

*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*

🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.

*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!