विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी..
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 प्रतिनिधी : हार्दिक शिंगले
🎴सिंधुदुर्गनगरी,दि.२९: कोकण विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी १० वी व १२ वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी. असे आदेश, सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी दिले आहेत.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी १० वी व १२ वी विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कापोटी जमा होणारी रक्कम माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांच्या बँक खात्यामध्ये जमा करावी आणि ऑनलाईन चलन डाऊनलोड केल्यानंतर चलनावर नमूद असलेली रक्कम विहित मुदतीत त्यांच्या त्याच बँकेच्या खात्यामधून एनईफटी/आरटीजीएसव्दारे चलनावरील नमूद बँक अकाऊंटनंबर (Alpha Numeric) व आयएफएससीकोड UTIBOCCH274 (युटीआयबी शून्य सीसीएच274) प्रमाणे मंडळाकडे वर्ग करावयाची आहे.
कोकण विभागीय मंडळ कार्यकक्षेतील सर्व माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय अंतर्गत माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा (इ. १२ वी) नोव्हेंबर व डिसेंबर २०२० करिता विद्यार्थ्याची आवेदनपत्रे ऑनलाईन पध्दतीने सादर केल्यानंतर माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा, शुल्काचे ॲक्सीस बँकेचे चलन ऑनलाईन तयार होणार आहे. ते संबंधितांनी डाऊनलोड करुन घ्यावयाचे आहे. परीक्षा शुल्क प्रचलित पध्दतीने बँक ऑफ इंडिया मध्ये भरणा न करता ॲक्सीस बँकेत भरणा करण्यात यावी.
माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांनी एनईएफटी/ आरटीजीएस केलेली रक्कम त्यांच्या खात्यातून वजा झाली आहे. किंवा नाही तसचे अकाऊंट नंबर व आएफएससी कोड चुकीचा नमूद केल्यास सदरची रक्कम परत त्यांच्या खात्यात जमा झाली किंवा नाही याची खातरजमा करण्याची जबाबदारी संबंधित मुख्याध्यापक, प्राचार्य यांची राहील तसेच माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयाचे शुल्क मंडळाकडे जमा झाल्याशिवाय त्यावरील पुढील प्रक्रीया होणार नाही याची दक्षता सर्व मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी घ्यावी असे आवाहन, सचिव महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांनी केले आहे.
*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*
*💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*
⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻♀️
⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻♂️
*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*
*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*
_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._
_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._
*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*
_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
_*💁🏻♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804
_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_