कणकवली पासून सहा किलोमीटर अंतरावर पोलिसांच्या वरदहस्ताने चालतो अंदर बाहर जुगार..
▪️एका रात्रीत होते करोडो रुपयांची उलाढाल; पोलिसांना मिळतोय मोठा हप्ता
▪️ग्रामस्थ करणार जुगाराची पोलखोल; पोलिसांचे पितळ पाडणार उघडे
🖥️ Kokan Live Breaking News
✍🏻 विशेष प्रतिनिधी
🎴कणकवली,दि.२८: शहरापासून अवघ्या सहा किलो मीटर आसा किलोमीटर अंतरावर बेळणे पूलापासून तीन किलोमीटरवर एका बागेत संध्याकाळी सात वाजल्यापासून अंदर बाहर जुगार चालत आसून एका रात्रीत लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
गोवा-सिंधुदुर्गातील खेळी हा अंदर बाहर जुगार खेळण्यासाठी खास कणकवली गाठत आहेत. कणकवली बेळणे फुलापासून अर्ध्या किलोमीटर अंतरावर एका बागेत हा अंदर बाहर जुगार चालत असून यासाठी मोठा हप्ता ठरवून दिल्याने याकडे पोलीस प्रशासन डोळेझाक करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
गेले अनेक दिवस या बागेत हा तीन पत्ती जुगार चालत आहे. या जुगारासाठी नजीकच्या गोवा राज्यातील खेळी सिंधुदुर्गातील खेळी संध्याकाळी सात वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत उपस्थित असतात. या जुगारात लाखो रुपयांची उलाढाल होत असल्याची चर्चा आहे. मोठ्या प्रमाणात पोलिसांना हप्ता मिळत असल्याने तेरी भी चूप.. मेरी भी चुप.. अशा पद्धतीने हा प्रकार राजरोसपणे सुरू असल्याचे समजते.
आम्ही पोलिसांना मोठा हप्ता देत असल्याने कोणीच आमचे काही वाकडे करू शकत नाही. असे जुगार चालवणाऱ्या प़टरा़चे म्हणणे आहे. त्यातील एक पट बहादूर आप्या दात पडका असून दुसरा पट बहाद्दूर तडीपार झालेला इसम आहे. या अंदर बाहर जुगारात या दोघांनी अमाप संपत्ती गोळा केली आहे. यातील आप्या दात पडक्या दारूची तस्करी करीत असल्याचे वृत्त आहे. पोलिसांच्या वरदहस्ताने राजरोसपणे सुरु असलेल्या या जुगाराचे व्हिडिओ शूटिंग करून पोलिसांचे पितळ उघडे पाडण्याचे येथील ग्रामस्थांनी निश्चित केले आहे. अशी माहिती तेथील ग्रामस्थांनी कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलला बोलताना दिली आहे.
_😍🎛️ गॅस शेगडी,गिझर,मिक्सर रिपेअरींग करायच असेल किंवा नवीन घ्यायच आहे ना कशाला चिंता करताय आहे ना उत्तम सर्व्हिस देणारे ‘सुर्या गॅस’.._
*🧰सुर्या गॅस🧰*
_सेल्स अँड सर्विस_
*▪️गॅस गिझर*
*▪️गॅस शेगडी*
*▪️चिमणी*
*▪️हाँटेल भट्टी*
*▪️हाँब*
*▪️मिक्सर/कुकर*
🍱🔧आमच्याकडे सर्व वस्तूंचे सर्व्हिसिंग व विक्री केली जाते.
*🏪आमचा पत्ता व संपर्क●*
*सूर्या गॅस*
_सेल्स अँड सर्विस_
गाळा नं.४,बाळकृष्ण टॉवर,मिलाग्रीस चर्च समोर,सालईवाडा सावंतवाडी.
📱9420170607
📱9763532209
☎️(02363)271320
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_