राज्यातील शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात यावीत…

🟥राज्यातील शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात यावीत…

🟥महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांचे शासनाला निवेदन

🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला

✍🏻 ब्युरो न्युज :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी,१९मे: राज्यातील शिक्षण विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख पदे स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्याबाबत तसेच भरतीप्रक्रियेत जिल्हा परिषद शिक्षकांचा ही समावेश होण्यासाठी राज्याचे ग्रामविकास मंत्री मान नामदार श्री हसनजी मुश्रीफ ,मान नामदार श्री प्रविणजी दरेकर विधानपरिषद विरोधी पक्षनेते महाराष्ट्र राज्य,मान आमदार श्री संजयजी केळकर संस्थापक म रा शि प प्रा वि, मान आमदार डॉ रणजित पाटील विधानपरिषद सदस्य तथा माजी गृह राज्यमंत्री ,अवर मुख्य सचिव ग्राम विकास विभाग मुंबई मान श्री राजेश कुमार यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभागाचे निवेदन सादर….

महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक राज्यभरात अतिशय दुर्गम भागात वाडी-वस्तीवर प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करत आहेत, दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण गोरगरीब वंचित घटकातील कष्टकरी लोकांच्या मुलांना मिळावे यासाठी अहोरात्र झटत आहेत, दिनांक १० जून २०१४ ग्रामविकास विभागाच्या अधिसूचनेनुसार महाराष्ट्र राज्य तांत्रिक सेवा वर्ग -३ मधील विस्तार अधिकारी (शिक्षण )व केंद्रप्रमुख या पदाबाबत भरतीचे निकष देण्यात आलेले आहेत. सद्यस्थितीत महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी ५० % पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत त्या बरोबरच केंद्रप्रमुख ७० % पेक्षा अधिक पदे रिक्त आहेत. प्रशासन व्यवस्थेमधील महत्त्वाची दोन पदे बहुसंख्य रिक्त असल्यामुळे शिक्षण विभागातील प्रशासन नियंत्रण प्रशिक्षण आणि गुणवत्ता ,शालेय मूल्यमापन यावर प्रचंड प्रमाणात ताण पडत आहे.

या अधिसूचनेनुसार विस्तार अधिकारी पदे१) सरळसेवा नामनिर्देशन २५% २)विभागीय स्पर्धा परीक्षा निवड प्रक्रिया २५% ३)पदोन्नती ५० % या प्रकारे सेवा प्रवेश निकष आहेत .

सन २०१४ च्या अधिसूचने नंतर नामनिर्देशन व विभागीय परीक्षा यामधील ५०% पदावर भरती प्रक्रिया झाली नसल्याने, राज्यभर मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत.
तसेच केंद्रप्रमुख पदे १)सरळ सेवा नाम निर्देशन ३०% २) विभागीय स्पर्धा परीक्षा निवड प्रक्रिया ३० %,पदोन्नती ४० टक्के या प्रकारे सेवा प्रवेश निकष आहेत.
सदर अधिसूचने नंतर नामनिर्देशन व विभागीय परीक्षा यामधील ६०% पदावर भरती प्रक्रिया झालेली नसल्याने मोठ्या प्रमाणात राज्यभरात पदे रिक्त आहेत.
दिनांक ५मे २०२२ चे मान अवर सचिव ग्रामविकास विभाग महाराष्ट्र शासन क्रमांक संकीर्ण २०२२ /प्रकरण क्र २१५/ आस्था- १४ या पत्रानुसार शिक्षण विस्तार अधिकारी व केंद्रप्रमुख पदाची सरळ सेवा भरती करण्यासाठी सूचित केलेले आहे, त्यामुळे राज्यभरात गुणवत्ताधारक शिक्षकांमध्ये चैतन्याचे वातावरण झाले आहे. पण; १० /०६/ २०१४ च्या अधिसूचनेनुसार सरळ सेवा भरती प्रक्रियेतून फक्त जिल्हा परिषद शिक्षकांना परीक्षे करिता अपात्र ठरवण्यात आलेले आहे, हा पात्रताधारक जि प शिक्षकांवर खूप मोठा अन्याय आहे,तसेच २०१४ पासून एकदा ही पद भरती झालेली नाही की परीक्षा झालेली नाही त्यामुळे पात्र उमेदवारांना वयामध्ये सवलत मिळावी वयाची अट शिथिल व्हावी.
तरी या विषय संदर्भाने १० जून २०१४ च्या अधिसूचनेत योग्य तो बदल होऊन पात्रताधारक जिल्हा परिषद प्रशिक्षकांना पात्र ठरून व वयाची सवलत देऊन शक्य तितक्या लवकर सरळ सेवा स्पर्धा परीक्षेद्वारे विस्तार अधिकारी व केंद्र प्रमुख पदांची भरती करण्यात यावी.
वरील परीक्षेकरता शैक्षणिक पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना पात्र समजण्यात यावे या बाबत संदर्भ :-क्रमांक :- ३ M.A.T निर्णय.
अशी लेखी निवेदनाद्वारे मागणी मान श्री राजेश सुर्वे सर राज्य अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग यांनी केली असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग शाखा सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष गणेश नाईक यांनी सांगितले आहे.

———————————————

*😍🧥🥼घरात लग्न समारंभ, शुभकार्य कार्यक्रम आहेत आता कशाला बेळगांव, कोल्हापूर ला जातंय.. त्यापेक्षा सुद्धा उत्तम कपडे, आकर्षक दरात आपल्या सावंतवाडीत…🥻🥻*

सावंतवाडीतील *”रोवस्त्रा”🥼* व *”राऊत आणि कंपनी”🥻* मध्ये नक्की एकदा भेट द्या …आणि *१० हजाराच्या💰* खरेदीवर मिळवा *आकर्षक भेटवस्तू🎁* सोबत खरेदी वर मिळवा *१० ते ३०% 🤩* सूट…!😍🥳💃

 

*_👔रोवस्त्रा🥼_*

*🔴आमच्या येथे उपलब्ध:-*
🔸पॅन्ट 🔹 शर्ट
🔹कुर्ता 🔸फेटा
🔸सुट 🔹शेरवानी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, तर दहा हजारच्या खरेदीवर मिळवा हमखास आकर्षक भेटवस्तू…!

*_🥻राऊत आणि कंपनी👗_*

*🟠आमच्या येथे “लग्न बस्ता” उपलब्ध:-*
🔹साडी 🔸वेस्टन गाऊन
🔸घागरा 🔹डिझाईन ड्रेस
🔹ज्वेलरी

*👉टीप:-* कोणत्याही खरेदीवर २० ते ३० टक्के सूट, दहा हजाराच्या खरेदीवर भेट वस्तू, तर पन्नास हजारावरील खरेदीवर “लकी-ड्रॉ” कुपन…!

*🎴आमचा पत्ता:-* भाट बिल्डिंग,गांधी चौक,सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग

*☎️संपर्क:-* ०२३६३-२७२२५४

———————————————————————–

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!