कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🟥 सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या मागील दोन वर्षाच्या कारभाराची चौकशी व्हावी..

🟥 ऑल इंडिया जर्नालिझम फाउंडेशन चे कोकण विभागिय अध्यक्ष सीताराम गावडे यांची बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे मागणी..

🎥 Kokan Live Braking News

✍ ब्युरो न्यूज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सावंतवाडी, दि-१९ :- सार्वजनिक बांधकाम विभागात बोकाळलेला भ्रष्टाचार ,निविदे मध्ये झालेला घोळ, काम न करताच कंत्राटदाराला बिले अदा केल्याचा आरोप,आणि एकाच ठेकेदाराला अनेक कामे यामुळे वादात सापडलेले अभियंता, यांची सखोल चौकशी होऊन संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी ऑल इंडिया फाउंडेशनचे कोकण विभागीय अध्यक्ष सीताराम गावडे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे.

गेल्या दोन वर्षात जिल्हा परिषद बांधकाम विभाग, व सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात निवेदे मध्ये घोटाळा झाला आहे ,मर्जीतील ठेकेदाराला अनेक कामे दिली गेली, कुडाळ फ्रड मधील कामे पूर्ण व्हायच्या अगोदरच कामाची पूर्ण रक्कम ठेकेदाराला अदा करण्यात आली, रस्त्याच्या साईट पट्ट्यांचा तर थांग पत्ताच नाही,त्यामुळे अंध, अपंग ,यांना धडपडत चालून आपल्या प्राणांना मुकावे लागत आहे, .म्हणून या प्रकाराची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी निवेदनात केली आहे.

गेल्या दोन वर्षात जो प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे आणि ज्यांनी हा भ्रष्टाचार केला आहे त्यांची खातेनिहाय चौकशी होणे गरजेचे आहे, शिवाय त्यांची कामावर रुजू होताना ची संपत्ती व आताची संपत्ती याबाबतचे विवरण शासनाला सादर केले की नाही केले नसेल तर त्यावर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्टाचारी कारभाराची पाळेमुळे कुठपर्यंत पसरली आहेत याची चौकशी त्रयस्थ यंत्रणेमार्फत करण्यात यावी तसेच कोणत्या कंत्राटदाराने आपल्या खात्यावरून त्या अभियंत्यांच्या खात्यावर रक्कम भरली आहे,त्याची चौकशी व्हावी अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे.

 

*_…………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा…._*

👇🏻👇🏻👇🏻

 

 

_________________________

 

*_💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥_*

 

*_💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥_*

 

*🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥*

 

*🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️*

*♦संपादक : सीताराम गावडे*

*📱संपर्क : +919423304856*

*♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड*

*📱संपर्क : +919423958828*

*♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे*

*📱संपर्क : +919405475712*

 

 

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*

https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

 

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*

_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!