कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध-अजित पवार
🟥कोकणच्या विकासासाठी कटिबद्ध-अजित पवार
🟥खरवते येथे स्वर्गीय शिक्षण महर्षी गोविंदराव निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे उद्घाटन
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,२५: कोकणात निसर्ग पुरक उद्योग आणण्याचे आमचे प्रयत्न असून कोकणाच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रविवारी खरवते येथील कार्यक्रमात केले.
सह्याद्री शिक्षण संस्थेच्या खरवते येथील शरदचंद्रजी पवार अन्न व तंत्रज्ञान महाविद्यालय व उद्यानविद्या महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन आणि प्रांगणात उभारण्यात आलेल्या शिक्षणमहर्षी स्व. गोविंदराव निकम यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी ते पुढे म्हणाले की, कोकणावर पवार साहेबांप्रमाणेच बाळासाहेब ठाकरे यांनीही प्रेम केले. आपल्यालाही हा परिसर आवडतो. कोकणाला निसर्गाने भरभरून दिले असल्याने येथील उपलब्ध साधनसंपत्तीचा विचार करून त्यादृष्टीने येथील विकासाला चालना देण्यासाठी सरकार प्रयत्न करीत आहे. रेवस ते रेड्डी सागरी महामार्गाला हजारो कोटीचा निधी लागला तरी तो देऊन तो महामार्ग पूर्ण करायचा आहे. चिपी विमानतळ सुरू झाले. आता रत्नागिरीतील विमानतळावर आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. पनवेलमध्येही आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारत आहोत. त्यामुळे कोकणात पर्यटन, रस्ते, रेल्वे, विमानतळ आणि निसर्गपुरक उद्योग उभारण्याच्यादृष्टीने आम्ही कटीबध्द आहोत. सिंधुरत्न योजना, कोकण कृषी विद्यापीठाला 50 कोटी दिले गेले आहेत, असे त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार शेखर निकम यांच्या कार्य अहवालाचे प्रकाशन झाले. अडीच वर्षात साडेतीनशे कोटींचा निधी त्यांनी या मतदारसंघात आणला. यातील पहिली दोन वर्षे ही कोरोनात जाऊनही त्यांनी मतदारसंघाच्या विकासाला गती दिली. यापुढेही त्यांना तसेच जिल्ह्याच्या विकासासाठी निधीची कोणतीच कमतरता भासू देणार नाही. ते जे जे विकासाचे प्रकल्प देतील ते ते पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू अशी ग्वाहीही ना अजित पवार पवार यांनी दिली.
स्वर्गीय गोविंदराव निकमांनी सह्याद्री शिक्षण शिक्षण संस्थेची स्थापना केली. आपण सर्वांनी त्यांना मदत केली. मात्र निकम साहेबांनंतर या संस्थेचे पुढे काय, असा प्रश्न पडला असतानाच संस्थेची धुरा त्यांचे चिरंजीव शेखर याने चांगलीच सांभाळली. एवढेच नव्हे तर तिची नेत्रदीपक प्रगती केली. आज निकम साहेबांचा पूर्णाकृती पुतळा उभा करून शेखर आणि त्यांच्या सहकाऱयांनी चांगले काम केले आहे. यातून येथे येणाऱयाना स्फुर्ती आणि नवीन प्रेरणा मिळणार आहे. विद्यार्थ्यांनीही या संस्थेतून बाहेर पडल्यानंतर मोठमोठ्या पदांवर गेल्यावर ज्या संस्थेने आपल्याला घडवले त्या सह्याद्री संस्थेला विसरू नका असा सल्ला अजित पवार यांनी यावेळी दिला.
सर्वांच्या अपार प्रेमातूनच उभारी
निकम साहेबांनी मोठ्या संघर्षातूनच या संस्थेची उभारणी केली. त्याला आपण सर्वानी मनापासून प्रेमाची जोड दिली. त्यांच्यावर जसे प्रेम केले तसेच प्रेम माझ्यावरही केले. अजितदादा आपल्याकडून आम्हाला काहीही नको, फक्त आपले प्रेम आमच्या पाठीशी कायम राहो, अशी सदिच्छा सह्याद्री शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम यांनी व्यक्त केली.
यावेळी खासदार सुनील तटकरे, आमदार भास्कर जाधव यांनीही स्वर्गीय निकम, सह्याद्री शिक्षण संस्था आणि आमदार शेखर निकम यांच्या कार्याचा गौरव केला.
यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांच्याहस्ते निकम यांच्या पुतळ्याचे अनावरण, तसेच महाविद्यालयाच्या अद्यावत व्यायामशाळा, उपहारगृह, महाविद्यालयाच्या मुख्य इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, माजी आमदार रमेश कदम, संजय कदम, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख राजू महाडीक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, अनिरूध्द निकम यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते.
———————————————
*🌴साई सावली क्लासेस🙏*
▪️आपणास कळविण्यात आनंद होतो की,आम्ही *सावंतवाडी,बिरोडकर टेंब सुर्वण काॅलनी येथे दत्ताराम शिरोडकर (विष्णू कृपा)🏡* यांच्या घरात साई सावली नावाने *👩🏻💼१ ली ते ७ वी 🧑🏻💼पर्यंत चे क्लास सुरू केले आहेत.*
तरी या सुवर्ण संधीचा बिरोडकर टेंब परिसरातील विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
*सौ,अन्वी आनंद धोंड*
*एम.ए.बी.एड*
*मो,९१४६७२९८९२/९४२३९५८८२८*
*🏢कोलगाव उच्च माध्यमिक विद्यालय कोलगाव*
आणि
*🏤कळसुलकर हायस्कूल मध्ये शिकवण्याचा अनुभव.*
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_