दिपक केसरकर यांच्या अडाणी नगरसेवकांच्या टिमने पालिकेचे दहा कोटीहून अधिक उत्पन्न खड्डयात घातले; नगराध्यक्ष संजू परब

▪️काही झाले तरी त्या पैशाची वसूली करणार, अन्यथा संबधितांचे गाळे पुन्हा ताब्यात घेवू; परब यांचा इशारा

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.२८: दिपक केसरकर यांच्या अडाणी नगरसेवकांच्या टिमने गेल्या काही वर्षात गाळ्याची भाडे वाढ वसूल न करता पालिकेचे दहा कोटीहून अधिक उत्पन्न खड्डयात घातले आहे, असा आरोप करीत काही झाले तरी त्या पैशाची मी वसूली करणार आहे. अन्यथा संबधितांचे गाळे पुन्हा ताब्यात घेवू, असा इशारा आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला.

दरम्यान पालकमंत्री उदय सामंत हे सगळ्यात निष्क्रीय पालकमंत्री आहेत.गेल्या काळात त्यांनी पाचशे रुपयाचा सुध्दा निधी दिला नाही. ही वस्तूस्थिती आहे.त्यामुळे आता त्यांच्या विरोधात आंदोलन उभारावे लागेल,असा इशारा त्यांनी दिला.

श्री.परब यांनी आज येथे पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते म्हणाले, सावंतवाडी पालिकेच्या मालकीच्या असलेल्या कॉम्पलेक्समधील गाळ्यांच्या २००८ मध्ये भाडेवाढ करण्यात आली होती.मात्र पालिकेतील शिवसेनेच्या अडाणी नगरसेवकांनी ती होवू दिली नाही. त्यामुळे तब्बल दहा कोटीहून अधिक रुपयाचे पालिकेचे नुकसान झाले आहे. त्यामुळे काही झाले तरी मी गप्प बसणार नाही. ज्या प्रमाणे स्टॉल हटाव मोहीम राबविण्यात आली, त्या प्रमाणे भाड्याची अतिरीक्त रक्मकेची अडीच लाखाची वसूली केली जाणार आहे.

ते पुढे म्हणाले, कॉप्ल्लेक्समधील व्यापारी माझे मित्र आहेत. परंतू मैत्री वेगळी आहे, आणि पालिकेचे उत्पन्नाचा विषय वेगळा आहे. त्यामुळे याबाबत मी कठोर निर्णय घेणार आहे,असे ते म्हणाले. येणाऱ्या काळात गोव्याच्या धर्तीवर सावंतवाडीतील मोकाट कुत्रे आणि माकड यांचे नसबंदी करण्यासाठी २८ लाखाची गरज आहे. त्यासाठी आवश्यक निधी आपण मागितला आहे,असे श्री.परब म्हणाले.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!