सामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

सावंतवाडीत ज्येष्ठ नगरसेवकाचे पाण्यासाठी घागर घेऊन नगरपालिकेत ठिय्या आंदोलन..

▪️सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकाचे ठिय्या आंदोलन सावंतवाडीत बनला चर्चेचा विषय..

🖥️ Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर

🎴सावंतवाडी,दि.१५: गेली ३५ वर्षे सावंतवाडी नगरपालिकेत नगरसेवक असलेले ज्येष्ठ नगरसेवक राजू बेग यांना आपल्या घरातील नळाला दोन दिवस पाणी येत नसल्याने रिकामी घागर घेऊन नगरपालिकेत येऊन ठिय्या आंदोलन करावे लागल्याने सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांचे हे आंदोलन सावंतवाडीत चर्चेचा विषय बनला आहे. सत्ताधारी पक्ष स्वतःच्या नगरसेवकाला न्याय देऊ शकत नसेल इतर नागरिकांना चौवीस तास पाणी काय देणार? अशा प्रतिक्रिया जनतेमध्ये उमटत आहेत.

लोकप्रतिनिधींना जनतेचे प्रश्न मांडण्यासाठी निवडून दिले जाते. मात्र, त्यांनाच आपल्या प्रश्नासाठी आंदोलन छेडावे लागले तर? गुरुवारी असेच घडले. सावंतवाडी पालिकेचे ज्येष्ठ आणि सत्ताधारी नगरसेवक राजू बेग यांनी रिकामी घागर घेत पालिकेत ठिय्या मांडला. त्यांचा हा पवित्रा पाहून प्रशासनाची धांदल उडाली. बेग हे माठेवाडा, बाहेरचावाडा भागाचे प्रतिनिधीत्व करतात. बुराण गल्ली माठेवाडा, दत्तनगर भागात पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने त्यांनी हे आंदोलन केले. त्यानी पालिका प्रशासनाला धारेवर धरले. २४ तास पाणीपुरवठा करण्याचा टेंभा  मिरवणारी पालिका नागरिकांना दोन तास पाणी देण्यास अपयशी ठरल्याचा आरोप बेग यांनी केला. सत्ताधारी नगरसेवकाने अनोखे आंदोलन केल्याने त्याची चर्चा सुरू होती.

*_🔥सावंतवाडी-मळगाव रेल्वे स्टेशन परिसरात फक्त 13 लाखात फ्लॅट.._*

       *💥 न्यू-मॅक्स डेव्हलपर्स 💥*

⚡घेऊन आले आहेत, दसऱ्यानिमित्त खास ऑफर..🤷🏻‍♀️

⚡तेही अगदी बजेटमध्ये; विशेष म्हणजे तयार ताबा आणि सोसायटीची स्थापना; त्यामुळे आता नो टेंशन!🤷🏻‍♂️

*🌈1BHK 556 sqft rs.12,99,850/-*
*🌈1BHK 644 sqft rs. 16,50,661/-*
*🌈2BHK 817sqft rs.19,38,573/-*

*_🔮कोणतेही अतिरिक्त छुपे चार्ज नाहीत.._*

_💫अवश्य या! आणि तुमच्य कोकणातील घराचे स्वप्न पूर्ण करा.._

_💫सावंतवाडी रेल्वे स्टेशन पासून अवघ्या हाकेच्या अंतरावर.._

*🔴टीप: ही योजना फक्त दसऱ्यापर्यंतच मर्यादित..*

_*🏚️आमचा पत्ता*_
सिल्वर एकर्स-निरवडे,
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.

_*💁🏻‍♂️मोबाईल नंबर*_
📱9324657477
📱9653693804

_*📧हाॅटमेल अॅड्रेस*_
newmaxdevelopers@hotmail.com

*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/Bx91uOMj9QE8lHvxMTcAbF

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!