केळूस येथील १० गरजू कुटुंबांना माजी सभापती निलेश सामंत यांच्यावतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप..
निलेश सामंत व त्यांचे कुटुंब कोरोना पाॅझिटिव्ह असूनही सुरू आहे समाजकार्य..
प्रतिनिधी-समीर चव्हाण
माजी सभापती भाजपा जिल्हा चिटणीस निलेश सामंत आणि त्यांचं कुटुंब कोरोना महामारीच्या विळख्यात अडकले असून ते स्वतः हॉस्पिटल मध्ये ऍडमिट आहेत. केळूस गावातील बौद्ध वाडीमध्ये एका कुटुंबातील 3 सदस्य पॉझीटीव्ह आल्यामुळे आजूबाजूची 10 कुटुंबे कॉरंटाईन केली आहेत.
ही सर्व कुटुंबे मोलमजुरी करून आपला चरित्रार्थ चालवतात, त्यामुळे त्यांचे अतोनात हाल झाले आहेत. ही बातमी निलेश सामंत यांना समजताच सामाजिक बांधिलकी जपून तातडीने युवा मोर्चा तालुकाध्यक्ष प्रसाद पाटकर आणि म्हापण माजी सरपंच नाथा मडवळ यांच्याकडे जीवनावश्यक साहित्य पाठवून त्या कुटुंबाना दिलासा दिला.
या त्यांच्या समाजकार्यातून जनसामान्यांच्या बद्दल त्यांच्या मनातील तळमळ पुन्हा एकदा दिसून आली. ग्रामस्थांनी ही त्यांचे आभार मानले तसेच म्हापण पंचक्रोशीतून निलेश सामंत यांचे कौतुक केलं जात आहे.
यावेळी केळूस तंटामुक्ती अध्यक्ष मनोहर पावसकर राजू पावसकर सचिन केळुस्कर, आनंद केळुस्कर, गोपाळ केळुस्कर, सूदन केळुस्कर, सुनील केळुस्कर, संदीप कोलगावकर, गुरुनाथ केळुस्कर, सोमकांत केळुस्कर,संदीप केळुस्कर अशोक केळुस्कर यांसह भाजपा कार्यकर्ते तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.