मतदार संघ माझा नसला तरीही मी तुमचा पूर्वीचाच मित्र आ.भास्करशेठ जाधव यांची जुन्या सहकारी मंडळींना भावनिक साद..
🟥मतदार संघ माझा नसला तरीही मी तुमचा पूर्वीचाच मित्र आ.भास्करशेठ जाधव यांची जुन्या सहकारी मंडळींना भावनिक साद..
🟥रामवरदायिनी केदारनाथ क्रीडा मंडळ आयोजित सुवर्ण भास्कर भव्य खुला गट कब्बडी गट स्पर्धेत विजयी संघाचा आ.जाधव यांच्या हस्ते सन्मान
🎥 KOKAN LIVE BREAKING
अचूक बातमी थेट हल्ला
✍🏻 प्रतिनिधी :ओंकार रेळेकर
🎴चिपळूण,३: मी कुठेही कार्यक्रमाला असलो तरी माझ्या पूर्वीच्या सहकाऱ्याना आवर्जून विचारतो चिपळुणात राहत असलो तरीही येथे अर्धा मतदार संघ माझा आहे जोडलेली नाती मी कधीही राजकारणाकरिता ,मतांकरीत मानली नाहीत माझ्या आयुष्यात अनेक पदे भूषविली अनेक उंचीपर्यंत गेलो कल्पना करता येणार नाही एवढ्या अंतरापर्यंत पोहचलो परंतु माझे पाय अजूनही जमिनीवर आहेत हा मतदार संघ माझा नसला तरीही मी तुमचा पूर्वीचाच भास्करशेठ आहे.अशी भावनिक साद आमदार भास्करशेठ जाधव यांनी आपल्या जुन्या सहकारी मंडळींना घातली.चिपळूण तालुक्यातील निरबाडे येथे श्री रामवरदायिनी केदारनाथ क्रीडा मंडळ आयोजित सुवर्ण भास्कर भव्य खुला गट कब्बडी स्पर्धेच्या अंतिम बक्षीस वितरण सोहळा रविवारी सायंकाळी माजी पालकमंत्री आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.या वेळी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात आ.भास्करशेठ जाधव बोलत होते.दि.२९ एप्रिल ते १ मे या कालावधीत सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
निरबाडे येथील बी.डी शिंदे,नितीन महाडिक आणि मित्रमंडळींनी पुढाकार घेऊन श्री रामवरदायिनी केदारनाथ क्रीडा मंडळ यांच्या वतीने निरबाडे गावी भव्य कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते. या सामन्यात सुकाई क्रीडा मंडळ खेर्डी प्रथम विजयाचा मानकरी ठरला आमदार भास्करशेठ जाधव यांच्या हस्ते पारितोषिक ,सन्मानचिन्ह देऊन मंडळाला सन्मानित करण्यात आले.माजी पालकमंत्री आ.भास्करशेठ जाधव,जि.प अध्यक्ष विक्रांत जाधव,खेडचे माजी सभापती मोहन आंब्रे, मुंबई कांजूरमार्ग शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण महाडिक,बी.डी शिंदे,नितीन महाडिक,प्रदीप शिंदे,प्रवीण शिंदे आदी मान्यवर
या वेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
चौकट : कोरोना संकटकाळ म्हणजे विरोधकांसाठी जणू सत्ता मिळविण्याचे साधनच आ.भास्करशेठ जाधव यांची विरोधकांवर सडकून टीका
……. कोरोना संकट काळात सुरुवातीला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब नवखे होते हीच संधी साधून
अनेकांनी कोरोना संकट काळात टीका केल्या आरोप केले वेगवेगळ्या प्रकारे त्यांना कात्रीत पकडण्याचे प्रयत्न केले ही अडचण जणूकाही आम्हाला सत्ता मिळविण्याचे साधनच निर्माण झाले आहे अशी विरोधकांची भावना निर्माण झाली आणि त्यांनी संधी मिळेल तेव्हा कारण नसतांना टीका करत राहिले.आपल्या महाराष्ट्राची एक परंपरा आहे एक इतिहास आहे ज्या ज्या वेळेला आपला महाराष्ट्र अडचणीत येतो त्या वेळेला प्रत्येकजण आपला पक्ष,पंत,धर्म बाजूला सारतो आणि संकटाचा सामना एकत्र खांद्याला खांदा लावून करीत असतो पण हि परंपरा काही मंडळींनी धुळीस मिळविली ही परंपरा तो इतिहास त्याला काळिमा फासण्याचा काही लोकांनी प्रयत्न केला आणि जणू हे आलेले संकट आम्हाला सत्ता मिळवून देण्याकरिता आलेले संकट आहे असाच एक विचार करून काही लोकांनी मुख्यमंत्र्यांना अडचणीत पकडण्याचा प्रयत्न केला.अनेक आरोप झाले जिथे चूक झाली न्हवती तिथे भ्रष्ट्राचाराचा आरोप झाला परंतु मुख्यमंत्री महोदय यांनी तोंडातून एक भ्र सुद्धा काढला नाही किंबहुना टिकेला उत्तरही दिले नाही विरोधकांचा विचार न करता आपले ध्येय एकच आहे आपल्या महाराष्ट्राला संकटातून बाहेर काढणारच हाच निश्चय करून उद्धिष्ट साध्य करून दाखविले.आणि जे जे टीका करणारे होते ते टीका करीत राहिले पण संपूर्ण जगाने, सुप्रीम कोर्टाने,उच्च न्यायालयाने,केंद्र सरकारने नोंद घेतली की देशामध्ये कोरोना संक्रमण काळात राज्यात उत्तम प्रकारे काम कोणी केले असेल तर ते मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांनीच एवढेच नव्हे तर देशातून आदर्श काम करणाऱ्या मुख्यमंत्री यादीत सतत चार वेळा झालेल्या सर्वेक्षणात उद्धवजी ठाकरे साहेब यांचे नाव पहिल्या पाच आदर्श मुख्यमंत्री यादीत कायम राहिले हीच मोठी टीका करणाऱ्याना चपराक आहे.राज्यात कोणी भुकी राहू नये म्हणून काही लोकांनी घंटा वाजवायला लावाली,रिकाम्या थाळ्या दिल्या,मेणबत्या लावल्या परंतु आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी सर्व गरिबांना मोफत जेवणाची थाळी देण्याचे काम केले असे आमदार भास्करशेठ जाधव यांनी आपल्या भाषणात बोलताना सांगितले.माजी पालकमंत्री आ.भास्करशेठ जाधव,जि.प अध्यक्ष विक्रांत जाधव,खेडचे माजी सभापती मोहन आंब्रे, मुंबई कांजूरमार्ग शिवसेना शाखाप्रमुख प्रवीण महाडिक,बी.डी शिंदे,प्रदीप शिंदे,प्रवीण शिंदे ,रवींद्र शिंदे,रवींद्र महाडिक आदी
या वेळी उपस्थित होते.उत्कृष्ट रीत्या कबड्डी स्पर्धेचे आयोजन केल्या बद्दल आ.भास्करशेठ जाधव यांनी आयोजकांचे कौतुक केले.
———————————————
*सुंदरवाडीत आपल्या सुसज्ज 🏡घराचे स्वप्न पूर्ण करा….!*
*”दर्पण कन्स्ट्रक्शन” सावंतवाडी*
🔴घेऊन आले आहेत…! माठेवाडा, भागीरथी मंदिर येथे देवगिरी हाईटस्” हा आठ मजली गृहप्रकल्प…!
*👉🏻25 लाखात 1bhk तर 35 लाखात 2 bhk फ्लॅट सर्व सुविधांनी युक्त…! (अन्य कोणतेही छुपे दर नाहीत)*
🏞️नरेंद्र डोंगराच्या कुशीत…..
*👉🏻🚌विशेष म्हणजे बस स्टॅन्ड आणि बाजारपेठ अगदी हाकेच्या अंतरावर…!*
*🔴आमची वैशिष्टे:🔴*
■ वॉटर प्युरिफायर🫧🌊
■ केअर टेकर रूम आणि सोसायटी ऑफिस🏠
● प्रत्येक सदनिकेला २०० लिटर
दैनंदिन गरम 🌊💧
■कार व टू-व्हीलरसाठी प्रशस्त
पार्किंग🚗🛵🏍️
*फक्त १ लाख रुपये द्या…!💵 अन् अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर बुकींग करा…!*
*🏠ऑफिस :-* 003 दिवाकर रेसिडन्सी, विठ्ठल मंदिर जवळ, सावंतवाडी-सिंधुदुर्ग
*बुकिंगसाठी संपर्क: श्री. उदय पारळे (B.E.Civil)*
📱9422436090
📱9403144090
*श्री.शरद सावंत*
9422436775
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

