कोकणरत्नागिरी

उद्योजक सुहास राजेशिर्के यांच्या वतीने वेहेळेतील ६० ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे किटस वाटप..

_*🛑 उद्योजक सुहास राजेशिर्के यांच्या वतीने वेहेळेतील ६० ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तूंचे किटस वाटप..*_

_*🛑 सामाजिक दातृत्व निभावत राजेशिर्के यांनी जल्मभूमी वर व्यक्त केले प्रेम..*_

*🎥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज*
_अचूक बातमी थेट हल्ला_

*✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर*

*🎴चिपळूण, दि-३१ :-* वेहेळे गावचे सुपुत्र सातारा जिल्ह्यातील उद्योजक मधील उद्योजक सुहास राजेशिर्के यांनी रविवारी आपल्या गावाकडील गरजर्वंतांना जीवनावश्यक घरगुती वस्तूंचे वाटप केले.कोरोनाच्या महामारीत सडून मरण्यापेक्षा लढून मरा, असे सांगतानाच, आपल्या मूळ गावाच्या हितासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम करणार असल्याची ग्वाही सातारचे माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांनी दिली.
चिपळूण तालुक्यातील वेहेळे गावचे सुपुत्र असणारे सुहास राजेशिर्के यांनी आज वेहेळे गावामधील अत्यंत गरजू व्यक्तींना धान्याचे आणि संसारोपयोगी वस्तूंच्या किटचे वाटप केले. गावच्या मातीचे समरण ठेवून राबवलेल्या या उपक्रमाचेचे गावकऱ्यांनी मनःपूर्वक कौतुक केले.
कोरोनाच्या काळात एकमेकांना मदत करूनच या संकटाशी दोन हात करणे गरजेचे आहे. ज्या मातीला, ज्या माणसांना मी लहानपणीच दुरावलो, त्यांची आठवण या संकटकाळात मला आवर्जून झाली. माझ्या परीने मी माझ्या मातीचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करीत आहे, असे सुहास राजेशिर्के यांनी सांगितले.यावेळी वेहेळे गावचे सरपंच श्री. दिलीप (नाना) राजेशिर्के, माजी उपसरपंच श्री. प्रकाश भोजने, सौ. लंबाडे, ग्रा. पं. सदस्य श्री. रोहितजी गमरे, सौ. निकिता राजेशिर्के, सौ. मृणाली कदम, सौ. जंगम, सौ. लाड, श्री .उदय भोजने,तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री. अनंत लंबाडे, श्री. नितीन राजेशिर्के, राम राजेशिर्के, संजय जाबरे, शांताराम जाबरे, बाळा घाणेकर, मंदार राजेशिर्के, उदय शिर्के, संतोष कदम, संदेश महाडिक, सुशील खेडेकर, सतीश राजेशिर्के, संजय पडयाल, संजय होडे, यतीराज होडे आदी ग्रामस्थ उपस्थित होते. सरपंच दिलीपनाना राजेशिर्के यांच्या हस्ते सुहास राजेशिर्के यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर सुमारे ६० ग्रामस्थाना धान्यकिटचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे नियोजन श्री. उदय भोजने व राम राजेशिर्के यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!