कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

धरण परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन..

🟥धरण परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे पाटबंधारे विभागाचे आवाहन..

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴सिंधुदुर्ग,७ जुलै : जिल्ह्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्पांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे हे प्रकल्प येत्या एक ते दोन दिवसात पूर्ण क्षमतेने भरून पाणी धरणाच्या सांडव्यावरून ओसंडून वाहणार आहे. अशावेळी धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे व सांडव्याच्या तसेच धरण क्षेत्रामध्ये जाऊ नये असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, अंबडपालचे कार्यकारी अभियंता गो.ह.श्रीमंगले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, अंबडपाल या विभागाच्या अधिपत्याखाली जिल्ह्यातील २३ ल.पा. योजना असून काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरुन सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वाहत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून, पावसाचा जोर पाहत धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधून येणाऱ्या पाण्याचा येवा मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील १ ते २ दिवसांत सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरुन पूर्ण संचय पातळीवरील अतिरिक्त पाणी धरणाच्या सांडव्यावरुन मोठ्या प्रमाणात ओसंडुन वाहणार आहे.
सध्या मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे धरणावरील नदीमधून वाहणाऱ्या जोरकस प्रवाहामुळे नदीच्या आजूबाजूच्या दरडी कोसळण्याची भिती असून प्रवाहाच्या पाण्याबरोबर जंगलातील जीवजंतू, साप, अजगर सारखे सरपटणारे प्राणी धरण जलाशय परिसरात वावरण्याची दाट शक्यता आहे. तसेच विभागाच्या अधिपत्याखालील माडखोल धरण जलाशयातून मोठ्या मगरीने नदीमध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. याशिवाय जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये मगरीचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
यासर्व बाबींचा विचार करता धरण क्षेत्र परिसरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होऊ नये म्हणून कोणत्याही परिस्थितीत सांडवा परिसर आणि धरण क्षेत्रामध्ये पोहणे, जलक्रीडा करणे, नौकाविहार करणे तसेच पर्यटन आणि जमावांचे सहलीचे आयोजन करणे इ.बाबी करण्यात येऊ नये असे आवाहन धरण परिसर, सांडवा, पुच्छ कालवा परिसरा लगतच्या आणि आजूबाजूच्या रहिवाश्यांना, नागरिकांना करण्यात येत आहे. तसेच यासर्व बाबींकरिता धरण क्षेत्रामध्ये वावरणेस प्रतिबंध करण्यात येत आहे. तरी धरण परिसरातील जनतेने याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

_________________________
*😍☺️🏠बस झाली जीवाची मुंबई..*
आता हवी जिवाभावाची सावली.. लाल माती आणि गोड शहाळी.. शांतता आणि समाधानाची खात्री.. आपल्या हक्काचं घर निसर्गरम्य कोकणात असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते.. हे स्वप्न साकारायचं आहे ना? मग चिंता कशाला? आहे ना आपल्या हक्काचं *आदित्य ग्रीन्स..*

*🚆🏕️सावंतवाडी रोड रेल्वे स्टेशन जवळ निसर्गरम्य परिसरात तीन ते पाच गुंठ्याचे एन ए प्लॉट्स उपलब्ध*

*💫आमची वैशिष्ट्ये:*

*▪️भूखंडला फक्त अकरा लाखा पासून सुरवात*
*🛣️9 -12 मीटर रुंदीचे प्रशस्त अंतर्गत रस्ते…*
*💡विद्युत पुरवठ्याची सोय ..*
*🚰 प्रकल्पांची स्वतःची अशी पाणीपुरवठा योजना*..
*📑सर्व सरकारी परमिशन सहीत…*
*🧾प्रत्येक प्लाॅट चा स्वतंत्र सातबारा*
*💷राष्ट्रीयीकृत बँकांचे आर्थिक सहाय्य उपलब्ध..*
*🏠आवश्‍यकतेनुसार घर बांधून देण्याची सुविधा उपलब्ध..*
*🥦प्रत्येक प्लॉटमध्ये फळझाडांची लागवड.*
*🏝️आबालवृद्धांच्या मनोरंजनासाठी सुसज्ज पार्क ..*
*🚶🏻‍♂️मळगाव रेल्वे स्टेशन (टर्मीनस) पासुन एक किमी अंतरावर..*
*▪️मुंबई-गोवा हायवे पासून दिड कि.मी. अंतरावर कोकणातील घर साकार करणारी आर्थिक दृष्ट्या फायदेशीर व प्रसन्न वातावरणात असणारी मनःशांती देणारी गुंतवणूक..*

*🎴विकासक श्री. अतुल लक्ष्मण नाखरे, सावंतवाडी*
7820800938

*🏬 ऑफिस*
शॉप नंबर 4 पहिला मजला आदित्य बिजनेस सेंटर गांधी चौक सावंतवाडी. जिल्हा सिंधुदुर्ग.
संपर्क : 9420204505
9404740679
*👨🏻‍🎓कायदेशीर सल्लागार*
अॅड. एम. एस. भांगले.
ता.सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग.
मोबाईल : 9422374276

___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!