वनविभागाच्या आंबोली परिक्षेत्रामध्ये निधीचा मोठ्या प्रमाणात गैरवापर, अधिकारी व ठेकेदारांचे संगनमत-बाळा पालेकर* *🛑 शेतकऱ्यांना सोलर कुंपण देण्याऐवजी तुटपुंजी नुकसान भरपाई……स्थानिक वनसमिती केवळ कागदोपत्रीच….*
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी : त्रिविक्रम सावंत*
*🌄 सावंतवाडी:दि११एप्रिल** वनविभागाच्या आंबोली परिक्षेत्रामध्ये करण्यात येणारी विकास कामे एकाच ठेकेदाराकडून होत असल्याने अधिकारी व ठेकेदार यांच्यात संगनमत असून शासनाचा निधी लाटण्याचा प्रकार होत आहे. या कामांमध्ये फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याची तक्रार भाजपचे आंबोली मंडळाचे प्रभारी तालुकाध्यक्ष बाळा पालेकर यांनी आज सावंतवाडी येथे उपवनसंरक्षक यांच्याकडे केली आहे. गेल्या तीन-चार वर्षांमध्ये आंबोली येथे मोठ्या प्रमाणात वनविभागाकडून निधी खर्च केला जात आहे मात्र या निधीचा सामान्य लोकांना कुठलाही उपयोग नाही. एवढा मोठा निधी खर्च करण्यापेक्षा शेतकऱ्यांची नुकसान भरपाई वाढवणे खूप गरजेचे आहे किंवा शेतकऱ्यांना सोलर कुंपण देणे खूप गरजेचे आहे वन्यप्राण्यांकडून होत असणाऱ्या नुकसान हे मोठ्या प्रमाणात असून वनविभाग तुटपुंजी भरपाई देत आहे .एखाद्या शेतकऱ्याने पाच वर्ष राबून तयार केलेले झाड गवारेड्याने मोडल्यास परत पुढची पाच वर्ष ते झाड कोणत्याही प्रकारचे फळ देत नाही .पंचनामा करून प्रती झाड पाचशे ते सहाशे रुपये एवढी तुटपुंजी रक्कम देऊन शेतकऱ्यांची थट्टा वनविभागाकडून सुरू आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम वाढवण्याऐवजी हा विभाग मात्र विकास कामाच्या नावाखाली लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करत आहे. आंबोली येथे ऊस शेतीचे मोठ्या प्रमाणात हत्ती गवे, डुक्कर या प्राण्यांकडून नुकसान केले जाते. आणि या ठिकाणची जमीन महाराष्ट्र शासन असल्यामुळे पंचनामे करताना मोठ्या प्रमाणात अडचणी येतात. शेतकऱ्यांना कुठलेही नुकसान भरपाई मिळत नाही. मात्र या शेतकऱ्यांना वनविभागाने सोलर कुंपण व झटका मशीन पुरवल्यास मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टळू शकते. प्रत्येक गावात गठीत केलेली वनसमिती ही फक्त कागदोपत्री असल्याने त्यांच्या नियमित बैठक न झाल्याने किंवा या वन समितीतील सदस्यांना विचारात न घेता ही विकास कामे प्रत्येक ठिकाणी सुरू आहेत. आंबोली मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतो हे माहीत असून देखील लोखंडी निरीक्षण मनोरे उभे करून ते दोन-तीन वर्षात पुन्हा तुटून पडल्याने चे चित्र सध्या आहे. पुन्हा या ठिकाणी काँक्रीटचे निरीक्षण मनोरे बांधण्याचं काम सुरू आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने भविष्यात या ठिकाणी अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण ? तरी वरील सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्यास भारतीय जनता पक्षाच्या वतीने वन विभागाच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल असा इशारा बाळा पालेकर यांनी दिला आहे यावेळी रवी माडगावकर, पंढरी राऊळ, शशिकांत गावडे, प्रकाश गावडे. दत्तू नार्वेकर ,काशीराम राऊत मनोहर बंड ,अंकुश गवस, गेळे सरपंच अंकुश कदम,सुनील गावडे, उल्हास गावडे, रामचंद्र गोविंद गावडे, सुरेश विठ्ठल गावडे, विजय मनोहर राऊत तुकाराम अर्जुन पडवळ, इत्यादी शेतकरी उपस्थित होते
*सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा*
👇🏻👇🏻👇🏻
________________________
*_🛵Deals On आपल्या पसंतीची कोणतीही e -baik एक लाख किंमतीची फक्त १५०००/-रुपयांत🛵_*
● super power electric scooter
● polution Free
● Hig Speef e-baik
● Smiles for miles
*_😱Deals on देत आहे आपल्या पसंतीची कोणतीही टू व्हीलर,फोर व्हीलर.. फक्त ५०टक्के किंमतीत😍_*
*आमचा पत्ता :*
Shop no-4,1st Floor,Aaditya Business Centre Building Gandhi Chowk sawantwadi
*📲Mob : 9421471159 | 9403367839*
_इलेक्ट्रिक गाड्यांची व्हाट्सअप व फेसबुक वर ऑनलाइन जाहिरात करण्यासाठी मुले ,मुली ,पाहीजेत, वेतन ५०००/-ते १०,०००/- रुपये_
___________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/KOW4KDbrVIR5XnoJcgBgAB
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/G4Eze9woWlw7ngXJwQ6iTo
*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*
*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/
*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive
*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*
Tweets by LiveKokan
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
*अचूक बातमी थेट हल्ला*

