कोकणक्रीडामहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

मळगांवचा सुपूत्र प्रथमेश कातळकर ठरला ज्युनियर मास्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी

🟥मळगांवचा सुपूत्र प्रथमेश कातळकर ठरला ज्युनियर मास्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदकाचा मानकरी

🟥राष्ट्रीय स्पर्धेत मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदनाचा वर्षाव

🎥 Kokan Live Breaking News

✍🏻 प्रतिनिधी :सुखदेव राऊळ

🎴सावंतवाडी,११: मळगांवचा सुपुत्र प्रथमेश कातळकर याने आग्रा येथील एकलव्य स्पोर्टर्स स्टेडियमवर संपन्न झालेल्या ज्यूनिअर मिस्टर इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे. इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी सुनिल कुमार चौधरी आयोजित व फिटलाईन प्रायोजित ५६ व्या मास्टर मॅन्स् फिजिक चॅम्पियन स्पर्धेतील ६० किलो वजनी गटात त्याने हा किताब प्राप्त केला आहे.
या स्पर्धेत देशभरातील एकूण २० स्पर्धक सहभागी झाले होते. ८ एप्रिल,९ एप्रिल व १० एप्रिल २०२२ असे सलग तीन दिवस ही स्पर्धा संपन्न झाली. त्याच्या यशानंतर सुनिल कुमार चौधरी व मान्यवरांच्या हस्ते त्याला सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्रातील टीम शिवाजीच्या माध्यमातून प्रथमेश या स्पर्धेत सहभागी झाला होता. या साठी त्याला त्याचे प्रशिक्षक व मार्गदर्शक शिवाजी राजन जाधव यांचे मोलाचे सहकार्य लाभले. प्रथमेश कातळकर हा सावंतवाडी तालुक्यातील मळगांव गावचा सुपुत्र असून त्याने यापूर्वीही अनेक स्पर्धांमध्ये मोठे यश प्राप्त केले आहे. सिधुदुर्ग ‘श्री ‘, वेंगुली ‘श्री ‘ कट्टा ‘श्री ‘ असे अनेक मानाचे किताब त्याने प्राप्त केले आहेत.
प्रथमेशच्या या यशाबद्दल त्याचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.

———————————————

*🎂वाढदिवस🎂 साजरा करायचा आहे काळजी करु नका घरपोच केक उपलब्ध होईल चिंता कसली…..🎂*

सावंतवाडी मध्ये आपल्या हक्काचे *😍हाऊस आँफ केक😍*

*▪️ब्लॅक फॉरेस्ट*
*▪️व्हाईट फॉरेस्ट*
*▪️पायनॅपल*
*▪️बटरस्कॉच*
*▪️मॅंगो*
*▪️स्ट्रॉबेरी*
*▪️ब्लॅक करंट*
*▪️चॉकलेट क्रीम*
*▪️रसमलाई*
*▪️फोटो केक*
*▪️स्पेशल थीम केक*
*▪️पिनाटा केक*

_🎊अगदी माफक दरात केक खरेदी करा आणि आपल्या हिंतचिंतकाचे वाढदिवस साजरे करा🎊_
*संपर्क:-* *सुरज लाड*
बिरोडकर टेंब सावंतवाडी
7307367856/7385501506
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!