प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे छपराचे पत्रे उडाल्याने आतील भागात पाणी
माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांची जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे छप्पर तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी
*प्रतिनिधी सुनील आचरेकर*
*सिंधुदुर्ग*
मालवण तालुक्यातील काल झालेल्या अचानक पाऊस आणि वादळात प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे केंद्राच्या छपराचे निम्म्यापेक्षा जास्त भागाचे पत्रे उडाल्याने पत्र्यांचे नुकसान झाले व आतील भागात पाणी शिरले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या छपराची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी माझी जिल्हा परिषद बांधकाम सभापती महेंद्र चव्हाण यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे. यावेळी याठिकाणी पाहणी करताना माजी सरपंच रघुनाथ धुरी , विश्वनाथ परब, रामचंद्र पवार, तलाठी पोलीस पाटील ग्रामसेवक आदी उपस्थित होते.

