मालवणच्या युवकाची कर्तव्यतत्परता
*मालवणच्या युवकाची कर्तव्यतत्परता*
मालवण :- शहरातील एस . स्टँड येथे चंद्रशेखर वासुदेव सावंत रा .सुकळवाड राऊळवाडी यांची महत्वाच्या कागदपत्रांची पिशवी हरवली होती. सदर पिशवी मध्ये त्यांची महत्वाची कागदपत्रे होती . येथील युवक ऐश्वर्य जनार्दन मांजरेकर याला सदर पिशवी बस स्टँड नजीक रस्त्यावर पाण्यात पडलेली आढळली. त्याने सदर पिशवी घरी आणून आतील कागदपत्रे सुकवून सावंत यांच्या आधारकार्ड वरील मोबाइल नंबर द्वारे त्यांना संपर्क केला. त्यांनी लगेचच शहानिशा करून सदर पिशवी आपली असल्याचे सांगितले. ऐश्वर्य मांजरेकर यांच्या तत्परतेमुळे मला सदरची महत्वाची कागदपत्रे काढण्यासाठी लागणारा वेळ व पैसा वाचला अशी भावना चंद्रशेखर सावंत यांनी व्यक्त केली. ऐश्वर्य मांजरेकर यांच्या तत्परतेमुळे मालवण शहरात सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे .

