कोकणसिंधुदुर्ग

वादळी पावसात चालत्या गाडी वर कोसळल्या विद्युत वाहिन्या

 

सावंतवाडी, दि ०५:- शहरात रात्री साडेआठच्या सुमारास अचानक वादळी वाऱ्यासह दाखल झालेल्या पावसामुळे मोठी हानी झाली. चिटणीस नाका येथे चालत्या बोलेरो पिकप गाडीवर अचानक पणे विद्युत वाहिन्या कोसळून पडल्या. यावेळी मोठा स्फोट होत प्रचंड आवाज झाला. या गाडीत यावेळी चालक असूनही सुदैवाने कोणतीही हानी झाली नाही. बीएसएनएल कार्यालयात कडेही रस्त्यावर मोठी वर्दळ सुरू असताना अचानक पणे झाड व विद्युत वाहिन्या कोसळल्या मात्र तेथेही सुदैवाने जीवितहानी टळली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!