ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले

🟥ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढले

🟥सुशिक्षित लोकांचीच सर्वाधिक फसवणूक यातून बोध कधी घेणार

_🎥 Kokan Live Breaking News_

✍🏻 प्रतिनिधी :सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग,४:आजच्या ऑनलाईनच्या युगात बरीच कामे सहज आणि सोपी झाली असली तरी या ऑनलाईनच्या युगात फसवणूक झालेल्यांची संख्या चिंता वाढवणारी आहे. क्राईमच्या गुन्हे यामध्ये ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्ह्याची संख्या वाढली आहे. दर महिन्याला किमान एक दोन घटना ऑनलाईन फसवणूकिचे वाचनात येत असतात. विशेष म्हणजे यात फसवणूक झालेले सुशिक्षित असून या सततच्या घटनांमधून ही मंडळी बोध घेणार की नाही हा खरा प्रश्न आहे. ऑनलाईन फसवणूक करणारे गुन्हेगार विविध क्लुप्त्या लढवून फसवणूक करत असल्याने असे गुन्हे उघड करण्याचे आव्हानही पोलिसांसमोर आहे .अशा फसवणूक करणारे नोकऱ्या ,लॉटरी विक्री, वाहन विक्री , कर्ज प्रकरणे अशा विविध आमिषांपोटी कोणतीही खातरजमा न करता सुशिक्षित मंडळी यामध्ये आहेत. हे दुर्दैवच म्हणावे लागेल आता प्रत्येकाच्या हातात विविध कंपन्यांचे मोबाईल आले आहेत .शिवाय इंटरनेटची सुविधाही बर्‍यापैकी उपलब्ध होत असल्याने इंटरनेटचा वापर वाढला आहे. यातूनच ऑनलाईन फसवणूक करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे .आमच्या कंपनीकडे अमुक-अमुक पदावर नोकरी उपलब्ध आहे. पण यासाठी तेवढे पैसे द्यावे भरावे लागतील तुम्हाला लॉटरी लागली आहे पण यासाठी आधी इन्कम टॅक्स चे पैसे भरावे लागतील कधी विक्रीची जाहिरात देऊन आमचे वाहन विकायचे आहे यासाठी आधी तुम्हाला डिलिव्हरी चार्जेस भरावे लागतील सिक्युरिटी चार्जेस भरावे लागतील अशा प्रकारचे मेसेज येतात यामध्ये मोठ्या प्रमाणावर सुशिक्षित नागरिक ऑनलाईन फसवणुकीच्या जाळ्यात सहजपणे फसले जातात. फसवणूक करणारे विविध क्लुप्त्या यासाठी वापरतात आणि जाळ्यात अडकलेल्या यांचा विश्वास संपादन करतात आणि सुशिक्षित मंडळी अलगदपणे यावर विश्वास ठेवतात
तुम्ही तुमची शैक्षणिक कागदपत्रे पाठवा, तुमच्या अकाउंट डिटेल, आधार कार्ड, पॅन कार्ड याबाबतची माहिती पाठवा आधी तुम्हाला नोकरीसाठी एवढे पैसे भरावे लागतील ते भरल्यानंतर अमुक एक रक्कम आणखी भरावी लागेल ते भरल्याशिवाय तुमची पहिली अपडेट होणार नाही ते पैसे भरल्यानंतर आणि किती पैसे भरावे लागतील असे सांगत तरुणांना जाळ्यात ओढले जातात शेवटी फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस स्थानकात धाव घेतली जाते कधी लॉटरीचे आमिष दाखवून अशी फसवणूक केली जाते तर काहीना आपली दुचाकी विकायची आहे असेच सांगितले जाते गाड्यांचे रक्कम निश्चित करण्यात आली यानंतर त्या तरुणांना आधार कार्ड पासपोर्ट फोटो व्हाट्सअप वर मागविण्यात येतो आणि मग होम डिलिव्हरी चार्ज म्हणून एवढी रक्कम भरल्यानंतर डिलिव्हरी सिक्रेट चार्ज म्हणून एवढी रक्कम भरा असे सांगण्यात येते ते भरल्यानंतर गाडीचे सर्व कमेंट भरावे लागेल तसा मेसेज येतो हे सर्व प्रकार पाहिल्यानंतर प्रश्न निर्माण होतो की कोणतीही खातरजमा न करता आलेले मेसेज वर किंवा कॉल वर पैसे भरले जातात या वस्तूची किंमत किती आहे .आणि आपण पैसे किती भरत आहोत त्या पैशाची मागणी कशासासाठी केली जात आहे. याचा गांभीर्याने विचारच केला जात नाही आणि ही मंडळी सहजपणे या फसवणूक करणारे यांच्या अकाउंट वर पैसे परत जातात आणि खूप मोठी रक्कम भरून झाल्यानंतर फसवले गेल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतात ऑनलाईन फसवणूक करणारे बोगस आधारकार्ड किंवा अन्य माहिती देऊन सिमकार्ड घेतात बोगस आधार कागदपत्राच्या आधारे बँकेत खाते उघडले जाते मग अशा पर्यंत पोलीस पोहोचणार कसे हा खरा प्रश्न आहे एक काहीवेळा कोणाच्या तरी दुसऱ्या अकाउंटचा आधार घेतला जातो माझे बँकेत अकाऊंट नाही मात्र मला एका कडून एक लाख किंवा जास्त रक्कम मिळणार आहे यातील काही टक्के आपणास देतो आपला अकाउंट नंबर द्या असे सांगितले जाते आणि अशा समस्यांसाठी बँक खातेदारांना फसवले जातो यावेळी पोलिस खाते दारापर्यंत पोचतात यावेळी असे प्रकार उघडकीस येतात आणि मुळ फसवणूक करणारा मोकाटच राहतो बँकाही अशा प्रकरणांमध्ये कोणतीही जबाबदारी घेत नाहीत शिवाय मानवाधिकारामुळे पोलीस कोणाचीही संशयित म्हणून चौकशी करू शकत नाही. त्यामुळे असे गुन्हे उघडकीस आणताना पोलिसांसमोर मर्यादा येतात तरीही पोलीस शर्तीचे प्रयत्न करतात फसवणूक करणार्‍यांच्या मोबाईलचे सीमकार्ड खरोखरच याचे असेल तर पोलिस यांच्या पर्यंत पोचतात आणि असे गुन्हे उघडकीस आणलेले आहेत. मात्र सर्व काही पोलिस करतील अशा भ्रमात राहणे चुकीचे आहे. आपणही अशा घटनांमधून बोध घेण्याची गरज आहे ऑनलाईन कोणताही व्यवहार करताना प्रत्येकाने सावध राहणे आवश्यक आहे. आपली फसवणूक तर होत नाही ना याची पुरेपूर काळजी घेणे आवश्यक आहे मात्र अनेक सुशिक्षित मंडळी सहजपणे अशा फसवणूक करणार्‍यांच्या जाळ्यात ओढले जातात एवढे पैसे भरा असे सांगितले की कोणताही विचार न करता पैसे भरले जातात या मध्ये फसवणूक करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढ्यात विश्वास ठेवणाराही तेवढाच जबाबदार असतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही या ऑनलाईनच्या व्यवहारातून मोबाईल नंबर बँकेचे अकाउंट नंबर मिळवून परस्पर खात्यामधून रक्कम लंपास होण्याचे प्रकारही अधून मधून वाचनात येत असतात यासाठी प्रत्येकाची सावधगिरी महत्त्वाची आहे . दर महिन्याला अपवाद वगळता ऑनलाईन फसवणुकीच्या एक दोन तरी घटना वाचनात येत असतात हे शंभर टक्के साक्षर असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याला निश्चित भूषणावह नाही आजच्या काळानुसार प्रत्येकाने ऑनलाईन असणे आवश्यक आहे परंतु तेवढी जागृकता देखील महत्त्वाची आहे .

———————————————
*_सायकल उत्सव… 🎉सायकल उत्सव…🎉सायकल उत्सव…🎉_*
🎀२ एप्रिल ते १० एप्रिल २०२२ मे🎀
पेडणेकर सायकल कंपनी सावंतवाडी, घेवून आले आहे ६९व्या वर्षानिमित्त
*_🚴‍♀️भव्य सायकल महोत्सव🚴‍♀️_*
_🪔उत्सव मराठी अस्मितेचा उत्सव गुढीपाडव्याचा_
_🌳पर्यावरण आणि आरोग्य रक्षणाचा दिवस संस्कृती जपण्याचा._
🏃‍♀चला तर मग ..नववर्षारंभ करूया नवीन सायकल खरेदी करूया..🚴‍♀️

● जागतिक व आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकल व स्पेअर पार्ट ,एसेसरीज, मिळण्याचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव विश्वसनीय ठिकाण.

*_~~🚴‍♀️~~मे पेडणेकर सायकल कंपनी.~~🚴‍♂️~~_*
◆ मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.

*💁🏻‍♂️ वैशिष्ट्ये :*
● योग्य दर. टिकाऊ माल.
● सर्व वयोगटासाठी सायकल उपलब्ध
● जीएसटी बिल मिळेल
● घरपोच डिलिव्हरी मिळेल
● बजाज फायनान्सची सुविधा उपलब्ध
● घाऊक ,सामाजिक संस्था ,शाळेतील मुलांसाठी सायकल योग्य दरात मिळेल.

*_🚴‍♂️सायकल नेहमी चालवाआणि आरोग्यदायी 💚फायदे मिळवा…आजच आपली नवीन सायकल खरेदी करा .._*

*📞संपर्क – श्री शरद चंद्रशेखर पेडणेकर*
*📲93568836*
*📲931082828*

*📞पत्ता -* मे पेडणेकर सायकल कंपनी मेन रोड सालईवाडा सावंतवाडी.
सिंधुदुर्ग 416510
___________________________

*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🎴कोकण लाईव्ह ब्रेकिंग व्हाट्सअप ग्रुप*
https://chat.whatsapp.com/FlfSnzCIRRn7YNI3VaCzyj

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!