कोकण

आरोस गिरोबा रंगमंचावर नाट्यप्रयोगांची मेजवानी 

आरोस गिरोबा रंगमंचावर नाट्यप्रयोगांची मेजवानी

बांदा : प्रतिनिधी

श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ, आरोस आयोजित गिरोबा रंगमंच आरोस गिरोबावाडी येथे रामनवमीनिमित्त शनिवार 2 एप्रिल ते 11 एप्रिलपर्यंत रोज रात्री 7.30 वाजता हरिदास सुबोध गोविंद मराठे यांचे किर्तनाचा कार्यक्रम व नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार 2 एप्रिल रोजी 9.30 वाजता महापुरुष दशावतार नाट्य मंडळ, सावंतवाडी यांचा ‘प्रलयंकारी गणेश’, रविवारी 3 रोजी रात्री 9.30 वाजता नाईक दशावतार नाट्य, मोचेमाड यांचा ‘लिला गौरी हराच्या’, सोमवार 4 रोजी रात्री 9.30 वाजता कलेश्वर दशावतार नाट्य मंडळ, नेरुर यांचा ‘इच्छापूर्ती गणेश’, मंगळवार 5 रोजी रात्री 9.30 वाजता दत्तमाऊली दशावतार नाट्यमंडळ,सिंधुदुर्ग यांचा ‘देवी कामाख्या’, बुधवार 6 रोजी रात्री 9.30 वाजता अमृतनाथ दशावतार नाट्य मंडळ, म्हापण यांचा ‘पापनाशिनी’, गुरुवार 7 रोजी रात्री 9.30 वाजता अष्टविनायक दशावतार नाट्य मंडळ, निरवडे यांचा ‘रक्ताळलेले हात’, शुक्रवार 8 रोजी रात्री 9.30 वाजता जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ, आरोस यांचा ‘कालचक्र’, रविवार 10 रोजी दुपारी 12 वाजता रामजन्म त्यानंतर श्री देव गिरोबा युवक नाट्यमंडळ, आरोस यांचा विनोदी नाटक ‘गेले भजनाक पोचले लग्नाक’ सोमवार 11 रोजी रात्री 9.30 वाजता चेंदवणकर दशावतार नाट्य मंडळ, चेंदवण यांचा ‘स्मशान योगी महाकाल’ नाट्यप्रयोग होणार आहे. परिसरातील नाट्यप्रेमी व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.

———

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!